Maharashtra Breaking News, 10 March 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याशिवाय बुधवारी संध्याकाळी मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी केलेल्या राजकीय टोलेबाजीवरूनही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत असून त्याचे पडसाद अधिवेशनातही दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान आणि एक रुपयांमध्ये पीक विमा योजना या शेतकऱ्यांच्या हिताच्या दोन योजनांमुळे आगामी निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात भाजपला फायदा होऊ शकतो. या दोन योजनांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटातही काहीसे चिंतेचे वातावरण होते.
विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या कोणत्या बाजूने अध्यक्षांनी यावं, यावर भास्कर जाधवांनी मांडला मुद्दा. भर विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्षात आणून दिली चूक.
मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने उडवल्याची घटना समोर आली असून त्या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना पाच मार्च रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे. अपघात अत्यंत भीषण होता, सुदैवाने यात डॉक्टर असलेले बळीराम बाबा गाढवे वय- ४७ रा. केशव नगर चिंचवड हे बचावले आहेत.
कोणत्याही सरकारने जातीची अटक घालण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही – सुधीर मुनगंटीवार
सांगलीतल्या प्रकारावरून अजित पवारांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली आहे. खतांची खरेदी करताना सांगलीत शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. मशीनमध्ये जातीचा रकाना भरल्याशिवाय प्रक्रिया पुढे जात नाहीये. याप्रकरणी सरकारने तातडीने पावलं उचलावीत. यामध्ये कोण मुद्दाम गडबड करतोय, त्याचा आढावा सरकारने घ्यावा – अजित पवार
सरकारमध्ये एक असे मंत्री आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला शिव्या दिल्या आहेत. तरी ते मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा विषय महत्त्वाचा ठरला आहे – आदित्य ठाकरे
देशात विरोधी पक्षात बसलेला किंवा सत्याच्या बाजूने बोलतो त्यांच्यावर अशा कारवाया होत असतात. इथे कुठेही घाबरण्याचं काहीही कारण नाही. कारण ही भीती सरकारच्या मनात आहे. देशात राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाही जिवंत आहे का? – आदित्य ठाकरे
आपली जात किंवा धर्म हिंदुस्थानी म्हणून लिहिलं तरी त्यात काहीही गैर नाही – आदित्य ठाकरे
पक्षचिन्ह आणि नावासाठी ठाकरे गटासमोर संघर्षाची स्थिती उद्भवली असताना गेल्या आठवड्यात शिवगर्जना अभियानाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला नवसंजीवनी देण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचं म्हणत निषेध केला. तसेच यामुळे समाजात जातीभेद वाढेल, असा इशारा दिला. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची झुंबड आहे. आगामी एप्रिल अखेरपर्यंत महत्वाच्या गाड्यांचे आरक्षण ‘ फुल्ल ‘ झाल्याची माहिती असून नागपूर- पुणे हा मार्ग अत्यंत व्यस्त असल्याची आकडेवारी आहे.
शिवाजी पार्कवर शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राज ठाकरेंनी सहकुटुंब उपस्थिती लावली होती. यावेळी राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
हा तपास यंत्रणांच्या कामकाजाचा भाग आहे. त्या चौकशी करून त्यासंदर्भात निर्णय घेतील – शंभुराज देसाई
साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जणार आहे.
संजय राऊत म्हणतात, “कोण काय म्हणतं त्यावरून शिवसेनेची भूमिका ठरत नाही. तुम्ही तुमचं काम करा. शिवसेनेनं नेहमी…!”
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. हे सरकार कोसळण्याच्या भितीनेच शिंदे-फडणवीसांनी अनेक घोषणांचा समावेश असणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच घोषणा केल्या, पण निधी कुठं आहे? असा सवालही केला. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
हुचर्चित बारावी गणित पेपर फूटप्रकरणी साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) पोलिसांनी गुरुवारी आणखी एका युवकाला अटक केली. यामुळे आता आरोपीची संख्या आठ झाली आहे. दानिश खान फिरोज खान (२१, रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेडराजा) यास पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका असे आवाहन केले आहे. तसेच खाद्यपदार्थ टाकताना आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. यासंदर्भात पालिकेने शहरभर लावलेल्या फलकांमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कबुतरांना खाद्यपदार्थ टाकणे बंदी योग्य आहे का, कायदा काय सांगतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
खामगावातील या घटनेने सामान्यजनच काय पोलिसही सुद्धा चक्रावून गेले. सोळा वर्षीय मुलीचे परिसरातील १८ वर्षीय मुलासोबत प्रेम जुळले. याची कुणकुण लागताच पालकांनी तडकाफडकी दूरवरच्या रत्नागिरी येथील युवकासोबत लग्न ठरविले. तारीख ठरली, लग्नपत्रिका वाटल्या, नातेवाईक जमले. महिला दिनाच्या मुहूर्तावर हळद लागली.
समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने महामार्ग चिंतेचा विषय बनला आहे. सोमवार २ मार्च रोजी ईरळा परिसरात एका चहा विक्रेत्याचा ट्रॅक अपघातात मृत्यू झाला होता. तर ६ मार्च रोजी औरंगाबाद कडून नागपूरकडे जात असलेल्या फॉर्च्यूनर गाडीचा भीषण अपघात झाला होता.
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४९ लाख ६५ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोना केंद्रातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगरपालिकेत कार्यरत सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नुकतीच चौकशी केली. याप्रकरणात माहिती घेण्यासाठी या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली.
कुर्ला परिसरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दहा दिवस चालणार असून हे काम प्रत्येक शनिवारी केले जाणार आहे. त्यामुळे ११ मार्च रोजी पाणीपुरवठा दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.
पुण्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एका आजीबाईंच्या गळ्यातील दागिणे चोरण्याचा साखळीचोराचा प्रयत्न १० वर्षांच्या नातीने उधळून लावला. साखळीचोर आजीच्या गळ्यातील दागिणे ओढत असल्याचं दिसताच या १० वर्षाच्या मुलीने धाडसीपणे तिच्या हातातील बॅगने चोरावर हल्ला चढवला. आजी आणि या मुलीच्या प्रतिकारामुळे चोराला काही वेळ प्रयत्न करूनही दागिणे घेता आले नाही. त्यामुळे अखेर त्याला तसाच पळ काढावा लागला.
शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन अभिवेक्षण (टॅपिंग) केल्याचा आरोप असलेल्या राज्यातील अतिवरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची केंद्र सरकारने सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई व पुण्यात बेकायदा अभिवेक्षणप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील गुन्ह्यात आरोपपत्र दाखल झाले असले तरी या कारवाईला केंद्राने मंजुरी नाकारली आहे. तर पुणे न्यायालयाने प्रकरण बंद करण्याचा पोलिसांचा अहवाल नाकारला आहे. अशातच केंद्राने त्यांना महासंचालकपदी बढती दिली आहे. इतकेच नव्हे तर नियुक्तीही केली आहे. या नियुक्तीचा अर्थ काय याचा हा आढावा…
शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला मालवाहू भरधाव ट्रक ने पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात होऊन २० ते २५ शिवभक्त जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुंबई- बेंगळुरू महार्गावर पहाटे पावणे चार च्या सुमारास ताथवडे येथे हा अपघात झाला.
वाट्याला जाण्याइतका राज ठाकरेंचा पक्ष मोठा नाही – संजय राऊत
राज ठाकरेंनी मनसे वर्धापन दिनी बोलताना “मी म्हटलं होतं आमच्या वाट्याला जायचं नाही. गेलं ना मुख्यमंत्रीपद?” असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला होता..
विरोधक वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचं ते पेल्यातलं वादळ ठरत आहे. तुम्ही त्याकडे फार काही लक्ष देऊ नका – गोपीचंद पडळकर
विरोधी पक्षांनी सरकारकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना भोपळा आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे. विधिमंडळात विरोधी पक्षाचे काही आमदार डोक्यावर भोपळा घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले.