Maharashtra News Updates: महाराष्ट्रात द केरला स्टोरी सिनेमावरून वाद सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उशिरा यावरून प्रतिक्रिया दिली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरूनही वाद होतो आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधले नेते एकमेकांवर टीका करत आहेत. नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवर असा वाद रंगला आहे. तर आज कर्नाटक विधानसभा निवडणूक होते आहे. याबाबतही विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करत कर्नाटक निवडणुकीत बदल घडणार असं म्हटलं आहे. तर कर्नाटकातही काँग्रेसकडून सत्ता बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Update| ‘द केरला स्टोरी’वरुन आव्हाड विरुद्ध फडणवीसांचा ‘सामना’, महाराष्ट्रातल्या इतर घडामोडी
ठाणे: महापालिका शाळांमधील सहावी ते दहावी च्या वर्गातील विद्यार्थांची क्षमता वाढवून त्यांना अधिक स्पर्धात्मक वातावरण मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे.
अमरावती: येथील बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आरोपीला हुडकून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
चंद्रपूर: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या लंडन दौऱ्यावर होते. दरम्यान, भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला.
बुलढाणा: एरवी संकटातही धीरगंभीर व संयमी राहणारे शिंदे गटाचे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ‘बाप तो बाप होता है’ या गाण्यावर सुहास्य मुद्रेने ठेका धरला अन दंडही थोपटले.
पुणे: ज्येष्ठांची देखभाल करणाऱ्या महिलेने साडेतीन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना पाषाण भागात घडली. या बाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे: भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी रेल्वेने भारत गौरव यात्रा सुरू केली आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेत असलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
नवी मुंबई : तरूणांमध्ये क्रेझ असलेल्या रॉयल इनफिल्ड बुलेट व बजाज पल्सर २२० या मोटारसायकल वाहनांची चोरी करणाऱ्या त्रिकुटास नेरूळ पोलीस पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : राज्यभरात खासगी विकासक मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करीत आहेत. आजघडीला ४१ लाख घरांच्या ताब्याची १.६ कोटी नागरिकांना प्रतीक्षा असल्याची माहिती महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यानी दिली. एमसीएचआय-क्रेडायच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पुणे: रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा कायापालट करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत प्रत्येक रेल्वे विभागातील १५ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे.
सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेसाठी कथित अडथळा मानल्या जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचे बांधकाम सोलापूर महापालिका प्रशासनाने बेकायदेशीर ठरविले आहे. ही चिमणी ४५ दिवसांच्या मुदतीत कारखान्याने स्वतःहून पाडावी. अन्यथा महापालिकेकडून चिमणी पाडून त्याचा खर्च कारखान्याकडून वसूल केला जाईल, असे पालिका प्रशासक शीतल तेली-उगले यांनी स्पष्ट केल्यानंतर चिमणीविरोधक आणि चिमणी समर्थकांनी पुन्हा उचल खाल्ली आहे.
धुळे: साक्री येथे सत्यशोधक महिला सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला परिषदेत आदिवासी विरोधी वन कायदा रद्द करावा, वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे आणि वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास त्याची भरपाई मिळावी यांसह अन्य ठराव मांडण्यात आले.
नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते मणिकांत राठोड यांच्यावर करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे शहर सरचिटणीस डाॅ. गजराज हटेवार यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी केली.
वर्धा : आज खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांप्रती विशेष काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना केली. बाजारात या हंगामात नकली बियाणे येण्याची शक्यता असते. म्हणून खरेदी केलेल्या बियाणे खरेदीच्या पावत्या शेतकऱ्यांनी जपून ठेवाव्या. तशी माहिती शेतकऱ्यांना द्या. बियाणे नकली आढळून आल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याची सूचना त्यांनी सभेत दिली.
मालेगाव: मालेगाव तालुक्यातील निंबायती येथे दरोडेखोरांचा प्रतिकार करताना एका दरोडेखोराची हत्या केल्याच्या आरोपातून एकूण १५ जणांची येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
अकोला : मान्सूनपूर्व कापूस लागवडीतून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून पश्चिम विदर्भातील अनेक भागात शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व कापूस लागवड करण्यात येते. त्यामुळे १ जूननंतरच कपाशी बियाणे विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
पिंपरी : आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, लढवली तर कोणत्या पक्षाकडून, कोणत्या मतदारसंघातून लढायची, या विषयी अद्याप काहीही ठरवलेले नाही. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन, असे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी सांगितले. तसेच एखादा मतदारसंघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे. कधीतरी बदल होणारच आहे, असेही मत त्यांनी मांडले.
ठाणे : बेसुमार पाणी वापराला लगाम बसावा आणि पाणी वापराप्रमाणे देयकांची वसुली व्हावी या उद्देशातून शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जलमापके बसविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या नळजोडणीधारकांना यंदाच्या आर्थिक वर्षात जलमापकांच्या नोंदीप्रमाणेच देयक आकारले जाणार आहे. उर्वरित २० टक्के जलमापके बसविण्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
अकोला : केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘यूआयडीएआय’ (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेले आधार कार्ड नव्याने अद्ययावत करावे लागणार आहे. अद्ययावत न केलेले आधार कार्ड रद्द केले जाणार आहेत.
डोंबिवली – पंडित राम मराठे यांचे शिष्य, गायक सुधीर तथा अविनाश देवधर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झोपेत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. त्या निवृत्त आहेत.
वर्धा : राज्य शासनाने वर्धा येथे रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्यासाठी वर्धेलागत सातोडा येथे जागाही निश्चित केली. मात्र, हे महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून आंदोलन सुरू झाले. आधीच दोन महाविद्यालये सुरू असल्याने वर्धेत तिसरे महाविद्यालय कशाला, असा युक्तिवाद करीत हिंगणघाट बंद पाळण्यात आला. आता आर्वीकरांनीही या महाविद्यालयाची मागणी करीत रेटा देणे सुरू केले आहे.
अमरावती: बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा या गावानजीक घडली.
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील ग प्रभाग हद्दीत कल्याण डोंबिवली पालिकेच्या खेळाचे मैदान आरक्षण असलेल्या एका भूखंडावर भूमाफियांनी मोबाईल मनोरा उभारणीस परवानगी देऊन त्याचे भाडे घेण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आयरे भागातील ग्रामस्थांनी केल्या आहेत.
पिंपरी: घरगुती कारणावरून विवाहितेला त्रास देत गळा दाबून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेला घरात १५० उठाबशा काढायला लावल्या.
वर्धा : सदैव वादाने चर्चेत राहणारे स्थळ म्हणून अलीकडे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाचे नाव दुमदुमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे डावे व उजवे म्हणजे हिंदुत्ववादी असे दोन गट उघड पुढे आले आहे. त्यातूनच आता धार्मिक वाद रंगू लागले आहे.
नागपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्षाच्या अधिकारालाच आव्हान दिले, तर नाना पटोले यांनी उत्तर देण्याइतपत वडेट्टीवार मोठे नेते नसल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या या दोन नेत्यांमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.
चंद्रपूर : माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे पदमुक्त अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या बचावासाठी समोर आले आहेत. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आवाहन देत बाजार समितीच्या निवडणुकीत भंडारासह राज्यात २२ जिल्ह्यांत भाजपा – काँग्रेस युती झाली होती. मग देवतळे यांच्यावरच पदमुक्तीची कारवाई का केली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, आता हा वाद दिल्ली दरबारी जाणार आहे.
सांगली : नागठाणे (ता. पलूस) येथील महादेव शिंदे यांच्या शेतात मेंढ्यांच्या कळपावर अज्ञात प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार झाल्या. तसेच या हल्ल्यात एक कुत्राही ठार झाला. ही घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
नाशिक: नवीन नाशिक विभागात पंधरवड्यात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी २९ जणांविरोधात कारवाई करून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये भाकरी फिरविण्यास सुरुवात केली असून, स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन बळ दिले आहे.