Maharashtra News Updates: महाराष्ट्रात द केरला स्टोरी सिनेमावरून वाद सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उशिरा यावरून प्रतिक्रिया दिली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरूनही वाद होतो आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधले नेते एकमेकांवर टीका करत आहेत. नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवर असा वाद रंगला आहे. तर आज कर्नाटक विधानसभा निवडणूक होते आहे. याबाबतही विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करत कर्नाटक निवडणुकीत बदल घडणार असं म्हटलं आहे. तर कर्नाटकातही काँग्रेसकडून सत्ता बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Update| ‘द केरला स्टोरी’वरुन आव्हाड विरुद्ध फडणवीसांचा ‘सामना’, महाराष्ट्रातल्या इतर घडामोडी
कल्याण: सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची कल्याण रेल्वे स्थानकातील गर्दी वाढली आहे. हातामध्ये पिशव्या, मोबाईल, एक्सप्रेसमध्ये चढण्याची गडबड अशा वातावरणाचा गैरफायदा घेत कल्याण रेल्वे स्थानकात काही भुरटे चोर प्रवाशांच्या हातामधील मोबाईल चोरुन नेत आहेत.
वाशीम : जिल्हा प्रशासनात प्रदीर्घ काळ ठाण मांडून बसलेले निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची अखेर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी या पदावर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
धुळे: सातबारा उताऱ्यावरील चूकीने झालेली विहिरीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी मंडळ अधिकाऱ्याला अटक केली.
बुलढाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून पुण्याकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून पैनगंगा नदी पात्रात कोसळल्याने एक महिला ठार, तर २० प्रवासी जखमी झाले.
अमरावती : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केल्याने उत्साह संचारलेल्या कार्यकर्त्यांना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. निवडणुकीचा बिगुल केव्हा वाजणार, याची इच्छूक उमेदवारांना प्रतीक्षा आहे. त्याच वेळी भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांचीही अस्वस्थता वाढली आहे.
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडीगड्डा धरणग्रस्तांना योग्य मोबदला लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन हिवाळी अधिवेशनादरम्यान दिले होते. परंतु सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने त्यांना पुन्हा पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे आम्ही आणखी कधीपर्यंत आंदोलन करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
अमरावती : दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या हातातील मोबाइल घेऊन वडिलांनी तो खाली आपटला. त्यामुळे मोबाईल फुटला. मोबाईल फोडल्याचा राग मनात धरून दहाव्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. या प्रकरणी कुटुंबीयांनी तळेगाव पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.
पिंपरी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडतील, असे विधान करणारे राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. कोल्हे यांची मंगळवारी मुलाखत पार पडली. पिंपरी- चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत आयोजित केली होती.
वर्धा : वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वास गेला असल्याने डिसेंबरच्या अखेरीस रेल्वे धावायला सुरुवात होणार आहे. खासदार रामदास तडस यांनी नागपूर विभागीय रेल्वेचे प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, उपमुख्य अभियंता प्रशांत नेलिकवार व अन्य अधिकाऱ्यांसोबत या मार्गाची पाहणी केली.
अकोला : कृषी विभागाच्या योजनांसंदर्भात समाजमाध्यमांवर अफवांचे पीक आले आहे. ‘महाडिबीटी पाेर्टल’वर दोन ते तीन महिने अर्ज भरवण्याची व सोडत होणार नसल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. ती माहिती चुकीची असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
नागपूर : व्यसनाधीन वडिलांचे मुलाकडे होणारे दुर्लक्ष आणि घरातील कुटुंबाचे चोवीस तास ताण-तणावाचे वातावरण यामुळे १५ वर्षीय मुलगा नैराश्यात गेला. नैराश्य घालविण्यासाठी तो दारू-सिगारेटच्या आहारी गेला. त्या मुलाने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. विनय अमित मसराम (१५, पांढराबोडी) असे मृत मुलाचे नाव आहे.
नागपूर : पत्नी बाळंतपणासाठी माहेरी जाताच पतीचे मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर पतीच्या अनैतिक संबंधाचा उलगडा झाला. त्यामुळे दोघांचाही संसार विस्कळीत झाला. अवघ्या आठ दिवसांच्या बाळासह पत्नी रडतच भरोसा सेलमध्ये आली. परंतु, हा भावनिक गुंता भरोसा सेलने अलगद सोडवल्याने रडत आलेली पत्नी पतीच्या दुचाकीवरून हसत घरी परतली.