Mumbai News Today : नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ही हवाई पाहणी होती. तसंच शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. हिंदू आणि मुस्लिम समाजांत तेढ निर्माण केली जाते आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लव्ह जिहादसारख्या फाजील गोष्टींपेक्षा अनेक महत्त्वाच्या समस्या आणि प्रश्न देशात आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. देशातील दंगलींवर बोलताना शरद पवार म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही. यासह विविध घटना राज्यात घडत आहेत.
Maharashtra Live News Today | ‘देशात मोदीविरोधी वातावरण’ या पवारांच्या वक्तव्याची फडणवीसांकडून खिल्ली आणि महत्त्वाच्या घडामोडी
औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा आता नितेश राणे यांनी दिला आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करायला हे काही महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
भंडारा – वरठी मार्गावरील जमनी येथे भंडारा नगरपालिकेचे डम्पिंग यार्ड आहे. येथे बांधकाम सुरू असून यासाठी चोरीची वीज वापरली जात असल्याचे गंभीर प्रकरण आज उघडकीस आले. महावितरणचे अधिकारी दुपारी डम्पिंग यार्ड मध्ये जेव्हा रीडिंग घ्यायला गेले तेव्हा त्यांना ही चोरीची बाब लक्षात आली.
जळगाव: वनविभागाच्या रावेर वनपरिक्षेत्रातील चोरवड सीमा तपासणी नाक्यावर मध्यरात्री विनापरवाना १८ हजारांचे वीस घनमीटर जळाऊ लाकूड व पाच लाख रुपये किमतीची मालमोटार, असा सुमारे पाच लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. मावळमधून तीनवेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी शहर पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी असताना महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
वर्धा जिल्ह्यातील नऊ महिन्यांच्या दुर्धर हृदयविकार असलेल्या बालकाला दूध पिताना दम लागून श्वास थांबत होता. न्यू ईरा मदर ॲन्ड चाईल्ड हाॅस्पिटलच्या बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. संदीप खानझोडे आणि डॉ. आनंद संचेती यांच्या चमूने गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने बालकाला जीवदान मिळाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज कुमार (३५) हा मूळचा जबलपूर-मध्यप्रदेशचा आहे. बेरोजगार असलेल्या मनोजने कामाच्या शोधात नागपूर गाठले. दोन दिवस फुटपाथवर दिवस काढल्यानंतर त्याने प्रदीप नावाच्या मित्राला फोन केला. त्याने मित्राला घरी नेले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यासाठी डिसेंबर २०२४ मुदत देण्यात आली आहे. मात्र विमानतळ उभारणीचा वेग पाहता हा प्रकल्प मुदती पूर्व मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव: पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नशिराबाद येथे ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावात महिनाभरातून अवघे तीन वेळा तासभर पाणी मिळते.
दिवा परिसरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या फलकावरुन शिवसेनेने राज्यातील सत्तासहयोगी मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डोंबिवलीचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या छब्या गायब केल्याने येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वर्धा येथील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामास एक तासापूर्वी भीषण आग लागली असून त्यावर नियंत्रणाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहे. तूर्तास तीन अग्निशमन गाड्या आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पुलगाव येथील सैन्य दलाच्या भांदारातून गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. वासिम यांचे हे गोदाम असल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. विद्यार्थ्यांनी बारावी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्यांना १० हजार ते २० हजार रुपये दरम्यानची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला ५० हजारापर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदु्त्त्वावादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जातेय. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. “शिंदे फडणवीस सरकारच्या काळात औरंगजेबाचे फोटो कसे नाचवले कसे जातात?” असा सवाल विचारतच हे तुमच्या सरकारचे अपयश आहे, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आज संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर ठेवलेल्या वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी आक्रमक भूमिका घेऊन विरोधकांना लक्ष्य केलं आहे. “अचानक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण फूस लावतंय याची चौकशी सुरू झाली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्याकरता गेले होते. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताचारी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आलाय. ठाकरे गटातील नेते मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर, शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. परंतु, तरीही राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार केला जात नसल्याने ठाकरे गटाने हल्लाबोल केला. तसंच, राज्यात रखडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बेंबळा प्रकल्पावरील अमृत योजनेच्या पाणी पुरवठ्यासाठी ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडरच्या निविदा प्रक्रियेत बोगस कागदपत्र व अनुभव प्रमाणपत्र जोडून सात कोटींचा अपहार झाला होता. या प्रकरणात अधिकारी, कंत्राटदार आदींसह १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
अहमदनगरच्या उरुसमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुण नाचले. त्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. तसंच कोल्हापूरमध्ये याच घटनेचा निषेध नोंदवत हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
काॅंग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्याविरोधात काॅंग्रेसमधल्या एका गटाने वज्रमुठ बांधली आहे. काँग्रेस भोला भवनात साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रदेश नेतृत्वाचे लक्ष वेधले. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे हे काल उपोषणस्थळी येऊन गेले. पुढील १० दिवसात तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
मालेगाव: धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा सलग तीन निवडणुकांमध्ये झालेला पराभव तसेच या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीत धुळ्याची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढविण्यात यावी म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करून घरी परत जाणाऱ्या नांदुरा येथील शेतकऱ्याला पोटे कॉलेज मार्गावरील जकात नाका परिसरात अडून त्याच्यावर सामूहिक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी शेतकऱ्याजवळील रोख २ लाख ७१ हजार रुपयांसह हातातील अंगठी, सोनसाखळी, मोबाईल फोन हिसकावून घेतला.
शरद पवार यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला की लव्ह जिहादची प्रकरणं देशात वाढत आहेत अशी चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे. कारण नसताना समाजा-समाजात तेढ वाढवतो. या सगळ्या गोष्टींसंबंधी मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये.”
आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या दरम्यान पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहाने साडेचार किलोमीटरची अपेक्षित उंची गाठली आहे. मान्सूनच्या आगमनासाठी आता सलग पावसाची प्रतीक्षा आहे. वादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर, केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल, तेव्हा मान्सूनचे आगमन जाहीर करण्यात येईल, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले.
“ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहात आहेत. २०१४, २०१९ लाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही स्वप्न पाहिलं. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत. तसंच मी तुम्हाला सांगतो हे जे डायलॉग तुम्ही पवारसाहेबांचे सांगत आहात असेच २०१४ मध्ये होते, २०१९ मध्ये होते. निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे म्हणत आहेत कुठे आहे मोदीविरोधी वातावरण? ३०० पेक्षा जास्त लोक निवडणून आले तरीही मोदीविरोधी वातावरण दिसतं आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बोलत आहेत. “
मालेगाव: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. बंदरे, खनिकर्म तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निर्मिती होईल, अशी ग्वाही दिल्यामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक: पोलीस कारवाईत मदत करण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची मागणी करून त्यातील तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना येवला तालुका पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक विजय शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ही हवाई पाहणी होती. तसंच शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. हिंदू आणि मुस्लिम समाजांत तेढ निर्माण केली जाते आहे असं त्यांनी म्हटलं आहे.