Maharashtra Mumbai News Today : औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर अशांत आहे. बुधवारी कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावरून राज्याच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी विरोधक याप्रकरणी आमने सामने आले असून एकमेकांवर आगपाखड केली जात आहे. दरम्यान, औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवणारे हे कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गावठाण या ठिकाणी आरोपी संजय मोहन शिंदे हा गेल्या काही महिन्यापासून राहत असून त्याने ३१ किलो गांजाचा साठा जमा केला होता अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पथकाने त्या ठिकाणी छापा मारून त्याच्याकडून ३१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) लक्ष्य आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्याच्या कामाला एमएमआरसीने वेग दिला असून आतापर्यंत या टप्प्याचे ८८.२ टक्के काम पूर्ण झाल्याचे एमएमआरसीने जाहीर केले आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४, खराडी मधील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी येत आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळावर सातपैकी बाहेरील पाच विश्वस्त नेमल्याने सुरू असलेले आंदोलन स्थानिक चार विश्वस्तांची नेमणूक करण्याच्या निर्णयानंतर मागे घेण्यात आले. त्यामुळे जेजुरीमधील तणाव निवळला असून स्थानिक चार विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार असल्याने विश्वस्तांची संख्या ११ होणार आहे.
इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूह आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याविषयी उन्मेश गुजराथी आणि स्प्राऊट्स प्रकाशनाने त्यांचे संकेतस्थळ आणि विविध समाजमाध्यम व्यासपीठावर प्रसिद्ध केलेला आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने गुजराथी आणि स्प्राऊट्स प्रकाशनाला दिला आहे.
मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्यांनी पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य दिसले.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या पदांची समाज विकास विभागाला आश्यकता असल्याने महापालिकेने या पदांची निर्मिती करणे आणि त्या पदांवर सेवकांना सामावून घेण्यास मान्यता दिली होती. महापालिका प्रशानसाने १८७ पदांची निर्मिती करून त्यावर १६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता.
नवी मुंबई : चोरटे तेच चोरी करतात ज्याला भाव चांगला मिळतो. फार झाले तर ज्याची गरज आहे, अशी वस्तू चोरी करतात, असे नेहमीच पोलीस वर्तुळात म्हटले जाते. शहरी भागात मातीला आता मोठी किंमत मिळत असली तरी माती चोरी हा प्रकार समोर आला नाही. मात्र नवी मुंबईतील एन.आर.आय पोलीस ठाणे हद्दीत मोठा खड्डा खोदून मागणी असलेली लाल माती चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपी मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघेही अनाथ असल्याचं निमित्त होत ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहू लागल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे: शिळफाटा येथील शेळ महापे रोड परिसरात रस्ता ओलांडत असताना १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भंडारा : साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे.

वर्धा : जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आकस्मिक तपासणी करीत खाद्य विक्रेत्यांचा धांडोळा घेतला. त्यात काही गाड्यांमध्ये खाण्यास अयोग्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच मान्यताप्राप्त नसलेल्या पेयजल बॉटल, फ्रूट ज्यूस जप्त करण्यात आले.
यवतमाळ – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी, ‘गेल्या वर्षी राज्यात राजकीय उलथापालथ झाली तेव्हा आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत राहावे लागेल, असा सल्ला समाजातील संत, महंतांनी दिला. त्यामुळे अखेर गुवाहाटीला शिंदे यांच्या गटात गेलो’, असे वक्तव्य बीड जिल्ह्यातील गेवराई येथे बंजारा समाज मेळाव्यात केले.
“निलेश राणे जबाबदार नेते आहेत. माजी खासदार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाचा त्यांना अभ्यास आहे, अनुभव आहे. त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्विटरवरून ते ट्वीट आल्यामुळे त्यांनी जबाबदारी ते ट्वीट केलं असेल असा मला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
आर्यन खान ड्रग्सप्रकरणी एनसीबीचे विभागीय माजी संचालक समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले आहेत. त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. हा जामीन आता २३ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच, त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी समीर वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे.
Sameer Wankhede extortion case | Bombay High Court extends the interim relief from arrest granted to former Mumbai NCB Zonal Director Sameer Wankhede for the next two weeks till 23rd June. Meanwhile, Wankhede's counsel has requested the HC to allow him to amend the petition.… pic.twitter.com/x4kEM9lF0D
— ANI (@ANI) June 8, 2023
गोंदिया: गोंदियातील बाई गंगाबाई महीला रुग्णालय व गोंदिया वैद्यकिय महाविद्यालयातील रक्तपेढीमध्ये २०७५ युनिट इतका मोठ्या रक्तसाठ्याची क्षमता असून सुद्धा बुधवार ७ जून २०२३ पर्यंत फक्त ८८ युनिट रक्त साठा उपलब्ध आहे, तर दररोज २० ते २५ युनिट रक्ताच्या पिशव्या रुग्णांसाठी आवश्यक असतात.
Kolhapur Riots : कोल्हापुरात गेले दोन दिवस अशांतता आहे. काही मुलांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ओरंगजेबाचे फोटो ठेवल्याप्रकरणी हा राडा सुरू झाला. मंगळवारी कोल्हापुरात दंगल उसळल्यानंतर बुधवारी कोल्हापूर बंद पाळण्यात आला. आताही कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांना अटक केली असून यामध्ये तिघेजण अल्पवयीन आहेत. त्यांना आज बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
वर्धा: वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट’ परीक्षेच्या निकालाची इच्छुकांना प्रतीक्षा आहे. असे असतांनाच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशभरातील ३८ वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द केली आहे.
पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द होणे, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून झालेला गोंधळ, नेत्यांमधील दुफळी, पहिल्या फळीतील काही नेत्यांची पक्ष सोडण्याची मानसिकता, तसेच आगामी निवडणुका या साऱ्या आव्हानांचा सामना करीत रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
धुळे: तालुक्यातील १५ गावे, शिंदखेडा तालुक्यातील पाच गावे तर, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील १६ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी मान्यता दिली.
ठाणे : उपवन येथील पवार नगर भागात एका भरधाव कारच्या धडकेत चाळीस वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. वरून शर्मा असे मृताचे नाव असून या घटनेप्रकरणी रात्री उशिरा चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
” …आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस! तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच. सरडा” असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी काल (७ जून) शरद पवारांवर टीका केली होती. त्या टीकाले अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
…आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस!
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2023
तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा pic.twitter.com/JwXDdRIH4M
नाशिक: नौदलातील वैमानिकाच्या जीवनावर आधारीत टॉप गन या हॉलिवूडच्या चित्रपटाने जगभरातील तरुणाईला भुरळ घातलेली असताना नाशिकचा पुष्कराज थोरात हा तरुण देखील भारतीय नौदलात वैमानिक होऊन आपले स्वप्न साकार करणार आहे.
भंडारा : भंडारा तहसीलमध्ये कोतवाल भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा स्क्रीनशॉट सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर आल्यानंतर तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात तीन आरोपींना अटक केली असून त्यापैकी एक फरार आहे.
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रांतर्गत ५०० पेक्षा अधिक ‘जिप्सी’तून वन पर्यटन सुरू आहे. या जिप्सीतून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने प्रदूषण होत आहे.
नवी मुंबई : एपीएमसी बाजारात लसूण, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिलपासून आवक घटत असून भाव वधारले आहेत. बाजारात आधी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांत उपलब्ध होता, आता ११० ते १५० रुपयांवर दर पोहोचला आहे. त्यामुळे महिलांची लसूण फोडणी चांगलीच महागली आहे.
नागपूर : राज्यात हवामान बदलामुळे विजेच्या मागणीतही चढ-उतार दिसत आहे. बुधवारी विजेची मागणी वाढून २८ हजार ‘मेगावॅट’वर आली. एकीकडे मागणी वाढली, तर दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पातील ६६० ‘मेगावॅट’च्या दोन संचात दुरुस्ती होऊन वीजनिर्मितीही वाढल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला नाही.
बुलढाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस शनिवारी (दि. १०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते रात्रीच मुंबईकडे रवाना होणार आहे.
Maharashtra News Today