Maharashtra Mumbai News Today : औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर अशांत आहे. बुधवारी कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावरून राज्याच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी विरोधक याप्रकरणी आमने सामने आले असून एकमेकांवर आगपाखड केली जात आहे. दरम्यान, औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवणारे हे कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

11:19 (IST) 8 Jun 2023
नागपूर : कोराडीतील प्रस्तावित वीज संचावरून वाद? पर्यावरणवाद्यांचा गंभीर आक्षेप

नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन संचासाठी निवृत्त संचाची यादी वादात सापडली आहे. महानिर्मितीने राज्य वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) आणि प्रदूषण मंडळाकडे ६६० मेगावॅटच्या दोन नवीन संचाच्या बदल्यात निवृत्त करायच्या ६ संचांची यादी वेगवेगळी दिल्याचे वास्तव पर्यावरणवाद्यांनी पुढे आणले आहे.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 8 Jun 2023
धक्कादायक.. प्रत्येक पाचव्या गर्भवतीला मधुमेह! कारण काय?

नागपूर : राज्यासह देशात प्रत्येक पाचव्या गर्भवती महिलेला मधुमेह असल्याचे निरीक्षण मधुमेह तज्ज्ञांनी नोंदवले आहे. गर्भवतींमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 8 Jun 2023
बुलढाणा : संशयित चोरट्यांना गावकऱ्यांची लाठ्याकाठ्यांनी मारहाण; सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगविला

बुलढाणा : संशयित चोरट्यांना गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत चौघे संशयित जखमी झाले. यावेळी जळगाव पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून चौघांची सुटका केल्याने संभाव्य अनर्थ टळला.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 8 Jun 2023
नागपूरमध्ये गडकरींच्या दाव्याला भाजपाकडूनच खो!

नागपूर : शहरात चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून पाण्यासाठी मोर्चे काढणे बंद झाले, असा दावा भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करीत असले तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे आहे. बुधवारी भाजपाच्या नेतृत्वात उत्तर नागपूरमधील पाणी समस्येच्या मुद्यावरून महापालिकेच्या आशीनगर झोनवर मोर्चा काढण्यात आला व निदर्शने करण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 8 Jun 2023
शालेय पुस्तकातील कोरी पृष्ठे ठरणार पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधी !

र्धा : शालेय पुस्तकात जोडण्यात आलेली वह्यांची पाने पालकांसाठी पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधीच ठरणार आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यावर्षीपासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या रचनेत बदल करताना पुस्तकांना वह्यांची कोरी पाने जोडली. त्यावर महत्त्वाच्या नोंदी करणे अपेक्षित आहे. शिक्षकांना या नोंदींची यादीच पाठवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 8 Jun 2023
वर्धा : खाऊ घेण्यास आलेल्या चिमुरडीशी विकृत किराणा दुकानदाराने केले लैंगिक चाळे

वर्धा : आरोपी राजेंद्र रामराव झाडे याचे किराणा दुकान आहे. घटनेच्या दिवशी अकरा वर्षीय चिमुरडी आपल्या मैत्रिणीसोबत आरोपीच्या दुकानात पेप्सी व खाऊ आणण्यास गेली होती. त्यावेळी आरोपीने त्या दोघींना दुकानाच्या आत नेले. मी तुम्हाला खाऊ फुकटात देतो. कुणाला सांगू नका,असे आमिष देत लैंगिक चाळे सुरू केले.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 8 Jun 2023
Video : राड्यानंतर कोल्हापुरात आताची परिस्थिती काय? रहदारी सुरू पण…

समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे प्रसारित केल्याच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला हिंसक वळण लागले. जमावाने शहरातील अनेक भागांत केलेल्या दगडफेकीत वाहने, दुकानांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून रहदारी सुरू झाली आहे. परंतु, रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:04 (IST) 8 Jun 2023
भंडारा : ‘त्या’ भिक्षेकरांची स्व-जिल्ह्यात रवानगी, पोलीस अधीक्षकानी घेतली लोकसत्ताच्या वृत्ताची दखल

भंडारा : ‘ड्रग्स-गांजाचे सेवन आणि विक्री करणारी भिक्षेकारांची टोळी शहरात सक्रिय’ या मथळ्याखाली दै. लोकसत्ताने दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडाऱ्याचे ठाणेदार सुभाष बारसे यांना कारवाईचे आदेश दिले. अखेर काल रात्री या भिक्षेकऱ्यांच्या टोळीची त्यांच्या जिल्ह्यात रवानगी करण्यात आली. तसेच परत न येण्याची सक्त ताकीद देण्यात आली.

सविस्तर वाचा…

10:59 (IST) 8 Jun 2023
“औरंगजेबाच्या अवलादी…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचं टीकास्र, म्हणाले, “तथातकथित हिंदुत्त्वाचं…”

“अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल”, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आज त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर वाचा

महाराष्ट् न्यूज

Maharashtra News Today