Maharashtra Breaking News Today, 16 October 2023 : ‘जनता दल संयुक्त’चे आमदार कपिल पाटील यांनी रविवारी वांद्रे येथे आयोजित केलेल्या समाजवादी जनता परिवार बैठकीला उद्धव ठाकरे हजर होते. या बैठकीला राज्यातील २१ हून अधिक समाजवादी जनता परिवारातील संघटना तसेच ‘आरजेडी’ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानाच्या अपडेट्ससह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Mumbai News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
ड्रगमाफिया ललित पाटील याला पळवण्यामागे सरकारचाच हात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पाटील सापडला तर सत्ताधाऱ्यांपैकी अनेकांचे पितळ उघडे पडेल. त्यामुळे तो हाती लागू नये, असा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोलिसांच्या जमिनीचा हस्तांतरणाचा आदेश देण्यात आल्याचा गौफस्फोट करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
नाशिक: प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर, जिल्हा परिषद येथे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणामुळे आरक्षणाचा मुद्दा बाजूला जाऊ शकतो असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले. कंत्राटी भरती वरून जयंत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा…
नगरहून आष्टीकडे जाणाऱ्या प्रवासी डेमू रेल्वेला आग लागून ७ डबे जळून भस्मसात झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणास दुखापतही झाली नाही. घटना आज, सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास नगर शहराजवळील शिराढीण ते वाळुंज फाटा या दरम्यान घडली. सविस्तर वाचा…
नागपूर: पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेल्या ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा सध्या फरार असला तरी जाणार कुठे?
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते अजित पवार यांच्यावर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे. सोमवारी प्रथमच या प्रकरणी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून सुमारे १६ कोटी रूपये किंमतीचा ८ किलो उत्तेजक एमडी औषधांचा साठा जप्त केला.
दगड इंजिनच्या काचेला लागून सहाय्यक लोको पायलट शिंभू मिना यांच्या गळ्याला लागला.
वसई- विरारच्या श्री जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मंदिराच्या पायर्या चढतांना धाप लागून त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगिते. सविस्तर वाचा
अकोला : सणासुदीच्या काळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भोपाळ येथील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस पूर्वनियोजित वेळेनुसार धावेल.
अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, शिरडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला भीषण आग
देवळा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठाजवळील जंगलात नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे. हिंगणा पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे एवढ्या दिवस आरोपी फरार होता,
मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीचा पुरुच्चार केला. एवढेच नव्हेतर ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली आहे. यामुळे आज राज्यातील विविध ओबीसी संघटना आणि राजकीय पक्षाच्या ओबीसी सेलच्या बैठका होत आहे. सविस्तर वाचा
नागपूर: राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटीला गेलेले छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना संधी मिळेल काय याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची विक्रीही वाढली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये अशा ११४ घरांची विक्री झाली.
विविध दागिन्यांमध्ये भारत पुढे असून या दागिन्यांना जगभरात मागणी असल्याचेही प्राजक्ता माळी यांनी सांगितले.
मुंबई: नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खासगी गरब्याच्या बनावट प्रवेशिकांची विक्री करून आयोजकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना १२ तासात अटक करण्यात आली असून त्यांच्या दोन पसार साथीदारांचा शोध सुरू आहे.
नागपूर : नवरा-बायकोचं नातं काही वेगळेच असते, कधी प्रेमाचा बहार फुटतो तर कधी वादाचे फटाके. नागपूरमध्येही असेच काहीसे घडले. मागील तीन महिन्यांत नागपूर महापालिकेच्या समुपदेशन केंद्रात नवरा-बायको भांडणाची १५३ प्रकरणे आली. मात्र त्यानंतर ‘तुझ माझं जमेना, पण तुझ्या वाचून करमेना’ म्हणत ६९ जोडपी पुन्हा गुण्यागोविंदाने नांदायला लागली.
वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभाग भरती करणार आहे. दोन हजारांवर जागा भरल्या जात आहेत. त्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य या वर्गातील ५३२ तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वर्गातील १ हजार ३७८ जागा भरणे आहे. तसेच कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ, लघुलेखक, उद्यान पर्यवेक्षक, वाहनचालक, स्वछक, शिपाई व अन्य पदेपण भरल्या जाणार आहेत.
मुंबई: मालाड पोलिसांच्या हद्दीत दुधाचे ट्रे उतरवण्याऱ्यावरून झालेल्या वादातून २४ वर्षीय तरूणाच्या डोक्यात लोखंडी सळी मारून हत्या करण्यात आली.
बुलढाणा : गगनभेदी घोषणा, हाती बाबासाहेब आंबेडकर अन छगन भुजबळांच्या प्रतिमा, विविध संघटनाचा सहभाग, महिलांची लक्षणीय उपस्थिती अशा थाटात सिंदखेडराजा नगरीत आज सोमवारी ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला. मनोज जरांगे यांच्या जंगी सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा मोर्चा समस्त ओबीसी समाज घटकांच्या ऐक्याचे प्रदर्शन ठरला.
३७ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयाखाली दोन महिलांसह सहा जणांविरूद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीत सहभागी होण्यासाठी आता प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन सुनावणीचा प्रयोग सुरू केल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानेही यात पुढाकार घेतला आहे.
सहा वर्षाची तनुश्री अतिशय गोड मुलगी होती. ती नेहमी स्मितहास्य करत बागडायची. आसपासच्या घरांमध्ये तिचा मुक्तपणे वावर होता.
शहर परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असला तरी महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी ठाकरे गटातर्फे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चिता रचत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
अपघातग्रस्त झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची प्रवासी क्षमता १७ अधिक एक म्हणजे चालक धरून १८ अशी होती. वाहनात तब्बल ३५ प्रवासी होते.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील संकेत क्रमांक ४१२ मधील विजेत्यांसाठी मंडळाने एक आनंदाची बातमी दिली आहे. मंडळाने या संकेत क्रमांकातील पंतप्रधान आवास योजनेतील ( अत्यल्प गट) घरांच्या ताबा प्रक्रियेस अखेर सुरुवात केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला आता कुठे वेग येत होता. अशातच सोमवारी सकाळी ८.३० वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर तुटले.
Mumbai News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा