Maharashtra Breaking News Today, 16 October 2023 : ‘जनता दल संयुक्त’चे आमदार कपिल पाटील यांनी रविवारी वांद्रे येथे आयोजित केलेल्या समाजवादी जनता परिवार बैठकीला उद्धव ठाकरे हजर होते.  या बैठकीला राज्यातील २१ हून अधिक समाजवादी जनता परिवारातील संघटना तसेच ‘आरजेडी’ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानाच्या अपडेट्ससह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

13:26 (IST) 16 Oct 2023
समृध्दीवर महिन्याला ९५ अपघात; नऊ महिन्यांत ११२ जणांचा मृत्यू

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील अपघातांचा आलेख उंचावत असून नऊ महिन्यांत या महामार्गावर एकूण ८६० अपघात झाले आहेत.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 16 Oct 2023
‘त्या’ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी – आमदार रोहित पवार

पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांनी येरवड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला. तसेच त्याला त्यांनी विरोध केल्याचंही नमूद केलं आहे. मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील मुद्दे समोर येताच राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 16 Oct 2023
आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीचे समर्थन करीत नाही – आमदार रोहित पवार

पुणे : भाजपाचे नेते तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी रात्री सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते, त्यावेळी शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करित त्यांच्या अंगावर शाई फेकून निषेध नोंदविला. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी पक्षाचे नेता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 16 Oct 2023
ठाणे: देवी आगमन मिरवणुकीत दोन मंडळात राडा; दगडफेक आणि फटाके पेटविल्याने पाच जखमी

ठाणे: वागळे इस्टेट येथील रोड नं. ३४ भागात देवी आगमन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये झालेल्या राड्यात फटाके पेटविल्याने आणि दगडफेक झाल्याने पाचजण जखमी झाले. या प्रकरणात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 16 Oct 2023
पुणे: बनावट प्रमाणपत्रांद्वारे पोलीस दलात भरतीचा प्रयत्न फसला; १० तरुणांविरुद्ध गुन्हा

पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दहा उमेदवारांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 16 Oct 2023
कोळी समाजाच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक; गिरीश महाजन यांचे जळगावात आंदोलनकर्त्यांना आश्वासन

जळगाव: आदिवासी कोळी समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व अधिकारी यांच्यासोबत समाजाच्या शिष्टमंडळाची तीन-चार दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी देत पदाधिकार्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 16 Oct 2023
ऊस दरावरून कोल्हापूरमध्ये राजकारण तापले

ऊस निर्यात बंदीच्या निर्णयाच्या कोंडीची निरगाठ राज्य शासनाने स्वतःहून सोडवून घेतली असताना आता ऊस दराचा तिढा सोडवण्याचे आव्हान शासन आणि राज्यकर्ते साखर कारखानदारांसमोर आहे.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 16 Oct 2023
बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, मनसेची मागणी

बुलढाणा : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे यांनी केली आहे. मोझॅकग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची पूरक मागणीही त्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

12:24 (IST) 16 Oct 2023
ललित पाटीलवरून नाशिकमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नाशिक – नाशिकचा अंमली पदार्थ माफिया ललित पाटीलने पोलिसांना गुंगारा देणे किती सहजशक्य आहे, हे ससून रुग्णालयातून गायब होऊन दाखवून दिल्यानंतर या प्रकरणाचे अनेक कंगोरे हळूहळू उघड होऊ लागले आहेत. ललित पाटील अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नसताना या पाटलांमुळे आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुरळा मात्र चांगलाच उडाला आहे.

सविस्तर वाचा…

12:23 (IST) 16 Oct 2023
वाशिम : सरकारकडून पदवीधर बेरोजगारांची थट्टा, आमदार धीरज लिंगाडे म्हणतात, कंत्राटी भरती…

वाशिम : राज्यात शेकडो पदवीधर बेरोजगार आहेत. शिकूनदेखील नोकऱ्या नाहीत. बेरोजगारीची भीषण समस्या आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना सरकार कंत्राटी नोकर भरती काढून पदवीधर युवकांची थट्टा करीत आहे. त्यामुळे कंत्राटी नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी आमदार धीरज लिंगाडे यांनी केली.

सविस्तर वाचा…

12:23 (IST) 16 Oct 2023
जरांगे पाटील यांच्या सभेनंतर ओबीसी आक्रमक, विविध ओबीसी संघटना नागपुरात एकत्र

नागपूर : जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी सरकारला ८ दिवसांचा अवधी दिला आहे, त्यामुळे ओबीसी समाज संतप्त असून आज नागपुरात विविध ओबीसी संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 16 Oct 2023
देशाच्या काही भागांत येत्या २४ तासांत पावसाची शक्यता! हवामान विभागाचा अंदाज काय? जाणून घ्या…

नागपूर : भारतात अनेक राज्यांतून मान्सूनने माघार घेतली असली तरीही येत्या २४ तासांत राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढेच नाही तर १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 16 Oct 2023
जम्बो कोविड घोटाळाप्रकरणी आयकर विभागाकडून छापेमारी

मुंबईतील जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आयकर विभागाने समोवरी विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबई, गुजरात, प्रयागराज, दिल्ली, पुण्यातील विविध ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली असून कोविड सेंटरसंदर्भातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे.

12:06 (IST) 16 Oct 2023
बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक, २ लाखांचे नुकसान; कंपनीविरुद्ध न्यायालयात…

कंपनीचे अधिकारी बोरगाव येथील शेती पाहायला ९ ऑक्टोबर रोजी आले. त्यांनी पाहणी केली व मान्य सुद्धा केले की खबरा ९० टक्के आहे.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 16 Oct 2023
समीर भुजबळ नाशिकच्या राजकारणातून बाहेर?

कधीकाळी नाशिक लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यामागे पक्षाचे नेमके काय समीकरण आहे, याचा अंदाज स्थानिक पदाधिकारी आपल्यापरीने बांधत आहेत.

सविस्तर वाचा

11:50 (IST) 16 Oct 2023
गोकुळ दूध संघाचे सिलिंग सेंटर ‘आंदोलन अंकुश’ने बंद पाडले; शिरोळ तालुक्यातील आंदोलनाने तणाव

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने दुध दर कपात मागे घेऊन दर पूर्ववत करावे, या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील चिलिंग सेंटर आज आंदोलन अंकुश संघटनेने बंद पाडले. दुधाची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्या.

वाचा सविस्तर…

11:44 (IST) 16 Oct 2023
पाच जणांच्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला; एकाच कुटुंबातील चार तर अंत्यविधीसाठी…

एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असे पाच जणांच्या लागोपाठ झालेल्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला आहे.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 16 Oct 2023
राज्यातील पहिला “हत्ती कॅम्प” दुर्लक्षित; परराज्यांतील हत्तींसाठी मात्र लाखोंची उधळण

या संपूर्ण प्रकल्पाची किंमत ८० लाख रुपयांच्या जवळपास आहे. चोरबाहुली येथील बोरबन येथे हत्तींच्या संगोपनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 16 Oct 2023
जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव राज्यात प्रथम

प्राप्त निधी वितरित ३१.२५ टक्के झाला असून, वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथमस्थानी आहे.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 16 Oct 2023
‘आधार’नंतर आता विद्यार्थ्यांचा ‘अपार’ क्रमांक

अपार आयडीद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार असून, विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास त्यात साठवला जाणार आहे.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 16 Oct 2023
चंद्रपूर : ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान राबविणार

ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान १ नोव्हेंबर पासून राबविणार आहे. रविवारी मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना व जात संघटनायांची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली.

सविस्तर वाचा

11:39 (IST) 16 Oct 2023
विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

तक्रारदार तरुणी पुण्यात राहायला आहे. आरोपी भिसे आणि तिची विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन ओळख झाली होती.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 16 Oct 2023
बृहन्मुंबईत कोट्यवधींची चोरी अन् आरोपी अकोल्यात…

बृहन्मुंबईतील कोट्यवधींच्या चोरी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी शहरात जेरबंद बंद केले. आरोपीकडून चोरीतून ३६.५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बृहन्मुंबई येथील ओसीवारा पोलीस ठाण्यांतर्गत करोडो रुपयांची चोरी झाली.

सविस्तर वाचा

11:39 (IST) 16 Oct 2023
ट्रॅक्टर, दुचाकी चोरी प्रकरणात १८ संशयितांना अटक, १३ वाहने जप्त; यावल पोलिसांची कारवाई

ट्रॅक्टरचोरीचा तपास करीत असताना यावल येथील पोलिसांना चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असून, १८ संशयितांना अटक करुन १३ दुचाकी हस्तगत केल्या.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 16 Oct 2023
नागपूरसह वाराणसी, मुंबईत छापे; विदेशातून तस्करीचे ३१ किलो सोने जप्त

महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या पथकाने विदेशातून तस्करीच्या सोन्याची वाहतूक करणाऱ्या टोळीतील ११ तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून १९ कोटी रुपये किंमतीचे ३१.७ किलो सोने जप्त करण्यात आले.

सविस्तर वाचा

11:38 (IST) 16 Oct 2023
नवी मुंबई महापालिका अभियंता स्वप्निल देसाई यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व स्तरांतून अभिनंदन, नक्की कारण काय?

नवी मुंबई महानगरपालिकेचे अभियंता  स्वप्निल देसाई यांचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मलनिःस्सारण व्यवस्थापनावरील शोधनिबंध इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (IRJET) यासारख्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला असून त्याबद्दल महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांचेसह सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी यांचे कौतुक केले आहे तसेच त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदनही करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

11:37 (IST) 16 Oct 2023
पडघा गोळीबार प्रकरण उघडकीस; कर्ज फेडण्यासाठी पोलिसाकडून चोरीच्या उद्देशाने गोळीबार

भिवंडी येथील पडघा भागात शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना उघडीस आली. हा गोळीबार मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरज ढोकरे (३७) याने केल्याचे समोर आले असून त्याला अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा

11:36 (IST) 16 Oct 2023
भाजप आमदाराच्या दाव्यानुसार सांगली सुधारेल का?

सांगली मतदार संघासाठी गेल्या चार वर्षामध्ये तब्बल २६५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. याच कालावधीत महापालिकेच्या तिजोरीतून सांगलीच्या वाट्यासाठी वार्षिक दोन अडीचशे कोटींचा निधी धरला तर चार वर्षात एक हजार म्हणजे केवळ सांगलीसाठी साडेतीन हजार कोटींचा निधी मंजूर झाला असेल तर सांगलीचे शांघाय झाल्याचे दिसले असते.

सविस्तर वाचा

11:00 (IST) 16 Oct 2023
मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या विचारा – संजय राऊत

या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहीत आहे का विचारा. समाजवादाची व्याख्या विचारा. ज्या शिवसेनेमध्ये ते होते, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं पाईक वगैरे म्हणतात ते त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे संबंध विचारा काय होते? जॉर्ज फर्नांडिस, एस. एम जोशी असतील. या सगळ्यांनी एकमेकांवर टीका जरूर केली आहे. पण महाराष्ट्राच्या हितासाठी समाजवादी नेते आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले – संजय राऊत

महाराष्ट् ब्रेकिंग न्यूज