विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. कारण आता काँग्रेस नेते नितीन राऊत होय आम्ही गाफिल राहिलो म्हणून आमचा पराभव झाला असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपाला २० दिवस उशीर झाल्याचं, जागावाटपात घोळ झाल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांना संजय राऊत यांनी तसंच उत्तर दिलं आहे. उशीर कुणामुळे झाला ते जरा वडेट्टीवार यांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Marathi News Live Updates महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या, राऊत विरुद्ध राऊत असा सामना! यासह महत्त्वाच्या घडामोडी

15:45 (IST) 10 Jan 2025

‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण

‘नाडी तरंगिणी’ची मूळ संकल्पना मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेचे कुलपती प्रा. जे. बी. जोशी यांची आहे.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 10 Jan 2025

योग्य मोबदला न मिळाल्यास रेल्वेमार्गासाठी जमीन न देण्याचा इशारा

नाशिक : धुळे जिल्ह्यात बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यास जमिनीचा ताबा देणार नाही, असा इशारा शिंदखेडा तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी निदर्शनेही केली असून १३ जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.

सविस्तर वाचा...

15:18 (IST) 10 Jan 2025

मुंबई महानगरपालिकेकडून औषध वितरकांची १२० कोटींची देयके थकीत, देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा

वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची सुमारे १२० कोटी रुपयांची देयके मुंबई महानगरपालिकेने चार महिन्यांपासून थकवली आहेत.

सविस्तर वाचा...

15:17 (IST) 10 Jan 2025

बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक

ब्लॉक कालावधीत बदलापूर - खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

15:17 (IST) 10 Jan 2025

राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

मुंबई किमान राहण्यायोग्य राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे. परंतु, राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांमुळे पर्यावरणीयदृष्ट्या तिचे नुकसान केले जात आहे.

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 10 Jan 2025

आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

आज, १० जानेवारीला सायंकाळी महाराष्ट्रासोबतच मध्य भारतातील विविध भागातून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र जात असल्याने त्याचे अधिक प्रकाशमान स्वरूपातील दर्शन निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी होईल.

वाचा सविस्तर...

14:57 (IST) 10 Jan 2025

निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..

चंद्रपूर : निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव टाकून अपमान केल्याची खंंत बाळगून सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित माजी मुख्यमंत्री तथा चंद्रपूरचे सुपुत्र कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे.

वाचा सविस्तर...

14:46 (IST) 10 Jan 2025

आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

आकाशात विविध ग्रह तारकासोबतच मानव निर्मित आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. आज, १० जानेवारीला सायंकाळी महाराष्ट्रासोबतच मध्य भारतातील विविध भागातून हे केंद्र जात असल्याने त्याचे अधिक प्रकाशमान स्वरूपातील दर्शन निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी होईल.

वाचा सविस्तर...

14:41 (IST) 10 Jan 2025

उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील वीज वितरण यंत्रणा जुनाट आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे बिघाड झाल्यास त्यात मोठा वेळ खर्ची जातो. सर्वाधिक दाटीवाटीच्या उल्हासनगरसारख्या शहरात ही यंत्रणा भूमिगत होण्याची मागणी आता पूर्ण झाली असून केंद्राच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) या कामासाठी १६ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 10 Jan 2025

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणारी महिलांची टोळी अटकेत

कल्याण : महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक भागात छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या १३ पीडित महिला, या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या चार गल्ला प्रमुखांना पोलिसांंनी अटक केली.

सविस्तर वाचा...

14:12 (IST) 10 Jan 2025

विशाळगडावर येणाऱ्यांच्या नोंदी ठेवाव्यात अतिक्रमणविरोधी कृती समितीची मागणी

कोल्हापूर : विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला असला तरी पर्यटक, भाविक यांच्या नोंदी ठेवाव्यात. गडावर गेलेले सर्वजण खाली येतात का हे तपासण्याची व्यवस्था करावी यांसह प्रशासनाने अन्य उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना गुरुवारी देण्यात आले.

महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, कृती समितीचे समन्वयक बाबासाहेब भोपळे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते.

14:03 (IST) 10 Jan 2025

समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती

रत्नागिरी : समुद्रात जवळपास ९३ टक्के कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. वर्षाला ३० टक्के कार्बन काढून टाकला जातो. पृथ्वीवरील ९३ टक्के उष्णतेचे नियंत्रणही येथेच केले जाते. समुद्रावरच मनुष्य जीवन अवलंबून आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.

सविस्तर वाचा...

14:01 (IST) 10 Jan 2025

कोल्हापूर : उपयुक्तता संपल्याने बाजार समित्या विसर्जित कराव्यात

कोल्हापूर : उपयुक्तता संपल्याने राज्यातील बाजार समित्या शासनाने विसर्जित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार संघटनांचे चेंबरचे सभापती मोहन गुरनानी यांनी पत्रकार परिषदेत केली. चेंबरचे अध्यक्ष डॉ. दीपेन अग्रवाल, कोल्हापूर ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी, चांगला दर मिळण्यासाठी बाजार समित्यांची रचना केली होती. त्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता ही सुरुवातीला दिसून आली. आता तशी कोणतीच आवश्यकता नाही. उलट त्याचा अकारण बोजा स्थानिक प्रशासनावर पडत आहे. मोठी जागा, इमारत, मनुष्यबळ यांवरही निष्कारण खर्च होत आहे. याचसमवेत बाजारसमित्यांचा करही भरावा लागतो. या सर्व परिस्थितीचा विचार करता त्या विसर्जित करणे योग्य ठरेल, असेही ते म्हणाले.

13:44 (IST) 10 Jan 2025

६५ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतरीत उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांची कामगिरी, १८० गुन्ह्यांची उकल

उल्हासनगर : विविध १८० गुन्ह्यांची उकल करत तब्बल ६५ लाखांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदार आणि फिर्यादींना देण्यात उल्हासनगरच्या परिमंडळ चारच्या पोलिसांना यश आले आहे. नुकताच परिमंडळ चारच्या वतीने रेझींग डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

13:42 (IST) 10 Jan 2025

‘महारेरा’चा दणका! पुण्यातील ४८७ गृहप्रकल्पांना स्थगिती

महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटून गेल्यानंतरही माहिती अद्ययावत न करणाऱ्या १० हजार ७७३ व्यापगत प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या होत्या.

सविस्तर वाचा...

13:42 (IST) 10 Jan 2025

पालकांच्या वादात अल्पवयीन मुलांना पारपत्रापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

पालकांमधील वैवाहिक वादामुळे अल्पवयीन मुलांचा पारपत्र मिळविण्याचा आणि परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा...

13:40 (IST) 10 Jan 2025

दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?

कृषी विषयक विविध योजनांच्या आर्थिक निकषांमध्ये दहा वर्षांनंतर वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

वाचा सविस्तर...

13:28 (IST) 10 Jan 2025

रत्नागिरी जिल्ह्यातील काताचे अवैध कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

चिपळूण : खैर तस्करी संबंधित कात निर्मिती कारखान्यांवर न्यायालयाने कारवाईचा बडगा उचलत चिपळूणसह परिसरातील सर्व १०२ कात कारखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. खैर तस्कर प्रकरणी प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कातव्यवसायिकांवर कारवाई करण्याची सूचना वनविभागाला न्यायालयाने केली आहे. 

सविस्तर वाचा...

13:07 (IST) 10 Jan 2025

नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान

नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक असल्याचे विधान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.

वाचा सविस्तर...

12:57 (IST) 10 Jan 2025

शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?

आव्वाज कुणाचा? अशी आरोळी दिली जाताच आसमंतात घुमणारा शिवसेनेचा पुण्यातील आवाज आता क्षीण झाला आहे. क्षीण म्हणजे एवढा की शेवटची घटका मोजत असल्यासारखा.

वाचा सविस्तर...

12:54 (IST) 10 Jan 2025

कोल्हापूर विमानतळ भूसंपादनावरून गडमुडशिंगीत ग्रामस्थ आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरण भूसंपादन करताना पुरेसा मोबदला मिळाला नाही, आधी भूसंपादन झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही आदी कारणावरून गडमुडशिंगी येथे शासकीय बैठकीवेळी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले.

सविस्तर वाचा...

12:47 (IST) 10 Jan 2025

गाव करी ते राव नं करी, ‘हे’ गाव ठरले विदर्भात अव्वल

वर्धा : लोकशक्तीतून गावाचा विकास करण्याचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देऊन ठेवला. सर्व एकत्र आले तर गावाचा नावलौकिक वाढू शकतो, याचे हे उदाहरण. अपारंपरिक ऊर्जा हा आता परवलीचा शब्द ठरत आहे. सौर ऊर्जा त्यात महत्वाची म्हणून पंतप्रधान मोफत सूर्यघर ही योजना आली.

वाचा सविस्तर...

12:46 (IST) 10 Jan 2025

आमदार राजू कारेमोरेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात याचिका दाखल

भंडारा : मोहाडी- तुमसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात माजी आमदार चरण वाघमारे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वाचा सविस्तर...

12:38 (IST) 10 Jan 2025

कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई

कल्याण : कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने कल्याणमधील ब (खडकपाडा परिसर), जे आणि ड प्रभागात (कल्याण पूर्व) कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या मे. आर. ॲन्ड बी कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

सविस्तर वाचा...

12:27 (IST) 10 Jan 2025

कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : कोल्ड प्ले या जगभरात नावाजलेल्या बँडच्या या महिन्यात नवी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या आरोपाच्या निमित्ताने उच्च न्यायालयात केलली जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

वाचा सविस्तर...

12:21 (IST) 10 Jan 2025

सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंनी १०.८३ कोटींचा जीएसटी बुडविला, जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई

सोलापूर : १० कोटी ८३ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविल्याप्रकरणी जीएसटी विभागाने सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंवर अटकेची कारवाई केली. न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

सविस्तर वाचा...

12:08 (IST) 10 Jan 2025

नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन

मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये पुरेशा नियोजनाअभावी पार्किंग व्यवस्थेचा अक्षरश: विचका होत असल्याचे चित्र असतानाच नवी मुंबई महापालिकेने मात्र शहरातील पार्किंग कोंडीवर उतारा शोधण्यासाठी उशिरा का होईना कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर...

12:06 (IST) 10 Jan 2025

ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा

ठाणे : ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज आठ लाख लीटर पाणी लागणार असून या पाण्याचा पुरवठा नागलाबंदर आणि कोलशेत भागातील मल-जलशुद्धीकरण केंद्रातून करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलवाहिनीद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

11:41 (IST) 10 Jan 2025

मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा

मुंबईतील हवा कधी सुधारणार ? मुंबईकरांना धुक्याचे वातावरणच पाहत राहावे लागणार का ? असा खोचक प्रश्न उच्च न्यायालयाने गुरुवारी सर्व संबंधित यंत्रणांना केला.

वाचा सविस्तर...

11:30 (IST) 10 Jan 2025

माजी मंत्र्यांच्या हट्टामुळे महापालिकेचा सव्वा कोटी खर्चाचा घाट?

पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया पक्का करण्यासाठी त्यांना पाढे शिकवले जाणार असून, त्यासाठीच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सव्वा कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी निधी उपलब्ध नसल्याने, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या निधीचे वर्गीकरण करून ही खरेदी केली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

MVA News

महाविकास आघाडीत बिघाडी?

 

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. कारण आता काँग्रेस नेते नितीन राऊत होय आम्ही गाफिल राहिलो म्हणून आमचा पराभव झाला असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपाला २० दिवस उशीर झाल्याचं, जागावाटपात घोळ झाल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांना संजय राऊत यांनी तसंच उत्तर दिलं आहे.

Story img Loader