विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. कारण आता काँग्रेस नेते नितीन राऊत होय आम्ही गाफिल राहिलो म्हणून आमचा पराभव झाला असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपाला २० दिवस उशीर झाल्याचं, जागावाटपात घोळ झाल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांना संजय राऊत यांनी तसंच उत्तर दिलं आहे. उशीर कुणामुळे झाला ते जरा वडेट्टीवार यांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
ं
Marathi News Live Updates महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या, राऊत विरुद्ध राऊत असा सामना! यासह महत्त्वाच्या घडामोडी
घरांचे दर ठरविताना अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते का? सिडकोच्या सोडत प्रक्रियेतील संतप्त अर्जदारांचा सवाल
सिडकोने नवी मुंबईतील विविध नोडमध्ये २६ हजार घरांची सोडत प्रक्रियेतील घरांचे दर जाहीर केल्यानंतर अर्जदारांनी संताप व्यक्त केला. तेव्हा घरांच्या किमती कमी करण्याची गरज असल्यास नक्कीच त्याचा पुन्हा विचार करु,असे आश्वासन सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी दिले.
दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे रुग्णालयाच्या कामाला गती, ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय ; १३.३२ कोटींचा खर्च
वसई : मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. ३० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. कारण आता काँग्रेस नेते नितीन राऊत होय आम्ही गाफिल राहिलो म्हणून आमचा पराभव झाला असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपाला २० दिवस उशीर झाल्याचं, जागावाटपात घोळ झाल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांना संजय राऊत यांनी तसंच उत्तर दिलं आहे.