विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. कारण आता काँग्रेस नेते नितीन राऊत होय आम्ही गाफिल राहिलो म्हणून आमचा पराभव झाला असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपाला २० दिवस उशीर झाल्याचं, जागावाटपात घोळ झाल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांना संजय राऊत यांनी तसंच उत्तर दिलं आहे. उशीर कुणामुळे झाला ते जरा वडेट्टीवार यांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ं
Marathi News Live Updates महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या, राऊत विरुद्ध राऊत असा सामना! यासह महत्त्वाच्या घडामोडी
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार
दिवा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर पूल क्रमांक ४५/२ आणि ४५/३ साठी तुळया उभारण्यात येणार आहेत.
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने एक हजार ३२८ कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला होता.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील एका तरुणाची ४४ लाख रुपयांची फसवणूक केली.
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
नागपूर : दोन वर्षाच्या प्रेम प्रकरणानंतर युवक आणि युवतीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. दोघांचाही सुरळीत संसार सुरू झाला. मात्र पत्नीचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय पतीला होता. याच वादातून पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला.
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघडकीस… रामटेकच्या राईस मिलमध्ये…
नागपूर: महावितरणच्या भरारी पथकाने रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिलमध्ये १ कोटी २ लाख २३ हजार ८४९ रुपयांची वीज चोरी पकडली.
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य वेगळे का झाले नाही, तर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी सगळे मराठी भाषिक प्रांत एकत्र आले पाहिजे अशी भूमिका मांडली आणि त्याला कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांनी पाठींबा दिला होता.
देवेंद्र फडणवीस योग्य वेळी आदित्य ठाकरेंना शिक्षा देतील – गुलाबराव पाटील यांचा दावा
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षत्र पाहून निर्णय घेणारे नेते आहेत. ते राहू-केतुची स्थिती लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांना योग्यवेळी काय शिक्षा द्यायची ती देतील, असा दावा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
मुंबईतील युवक व युवतींनी एकत्र येऊन ७ जानेवारी २०१८ रोजी ‘गंधर्व कलामंच’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्थापना केली.
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध परीक्षांचे वेळापत्रक मागील दोन वर्षांत जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यातील बहूतांश परीक्षा अद्यापही झालेल्या नाहीत. या परीक्षा होणार की त्यांची थेट मुलाखत घेऊन निवड होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये होता. त्यावर आता उत्तर सापडले आहे.
मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करा… वडेट्टीवारांच्या फडणवीसांवरील स्तुतीसुमनांमुळे…
चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करावे, अशी स्तुतीसुमने काँग्रेस नेते व माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उधळली.
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…
यवतमाळ : मनोरुग्ण म्हणून कुटुंबीयांकडून होणारी अवहेलना झेलत रस्त्यावर आलेल्या रक्षा (बदललेले नाव) ला वर्षभरापूर्वी येथील येथील नंददीप फाऊंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात आसरा मिळाला.
महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…
नागपूर : शहरातील एका महिला वकिलावर पतीकडून वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच सासरच्या मंडळी कडून माहेरून हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पती व न्यायाधीश असलेला सासरा व सासू व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : आरोपी संजय मोरेला जामीन नाहीच, सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
मुंबई : गेल्या महिन्यात कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
कल्याणमधील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तमीळनाडूतील तरूणाकडून लैंगिक अत्याचार
कल्याणमध्ये राहत असलेल्या एका २९ वर्षाच्या तरूणीची तमीळनाडूतील पेंंदुराई येथील एका २९ वर्षाच्या तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे.
ठाणे महापालिकेने आखला शंभर दिवसांचा कार्यक्रम, कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा सज्जता आणि स्वच्छता मोहिमेवर भर
ठाणे : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे.
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
राज्य शासनाने ठाणे महापालिकेला शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडीतील आतकोली भागात ३४ हेक्टर इतकी जागा देऊ केली आहे. या कचराभुमीच्या भुखंडावर दगडाचे उत्खनन करत सुमारे ५४१० ब्रास दगड आणि नैसर्गिक जलस्रोतातून दररोज सुमारे १० ते १५ टॅँकरद्वारे पाण्याची चोरी करण्यात येत असल्याची बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.
डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप
डोंबिवली : भाईने स्वताच्या मोटारीचा दर्शनी भागाचा दिव्यांचा झोत तांत्रिक बदलाने समोरून दुचाकीवरून येत असलेल्या पत्रकाराच्या डोळ्यावर मारला. समोरील काही न दिसल्याने पत्रकार दुचाकीसह जागीच थांबला. भाईने आपले वाहन पुढे घेत त्यामधून तो उतरला. पत्रकारांना उद्देशून ‘आपण या भागाचे भाई आहोत. येथे जास्त पानपत्ती करायची नाही. नाहीतर येथेच ठार मारून टाकीन,’ अशी धमकी देत भाईने स्वताच्या वाहनातून चाकू बाहेर काढून हवेत फिरवला.
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार
अलिबाग : रायगड जिल्ह्यात बांबू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत यंदा ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने यासाठी रोपवाटीका तयार केल्या असून, लवकरच या रोपांची लागवड केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने महायुतीत लढवून राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र तिन्ही पक्ष स्वबळावर लढवतील, अशी चर्चा रंगली आहे.
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकजवळील, झोपड्या रेल्वेकडून जमीनदोस्त
कल्याण : विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्थानकाजवळ पदपथावर पक्की बांधकामे करून अनेक कुटुंब मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर राहत होती. रेल्वे स्थानकाला खेटून या झोपड्या असल्याने रेल्वे प्रशासनाने गुरुवारी रेल्वे सुरक्षा बळ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाला खेटुन असलेली पक्की बांधकामे जेसीबाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण
‘नाडी तरंगिणी’ची मूळ संकल्पना मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेचे कुलपती प्रा. जे. बी. जोशी यांची आहे.
योग्य मोबदला न मिळाल्यास रेल्वेमार्गासाठी जमीन न देण्याचा इशारा
नाशिक : धुळे जिल्ह्यात बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यास जमिनीचा ताबा देणार नाही, असा इशारा शिंदखेडा तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी निदर्शनेही केली असून १३ जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून औषध वितरकांची १२० कोटींची देयके थकीत, देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा
वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची सुमारे १२० कोटी रुपयांची देयके मुंबई महानगरपालिकेने चार महिन्यांपासून थकवली आहेत.
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
मुंबई किमान राहण्यायोग्य राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे. परंतु, राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांमुळे पर्यावरणीयदृष्ट्या तिचे नुकसान केले जात आहे.
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
आज, १० जानेवारीला सायंकाळी महाराष्ट्रासोबतच मध्य भारतातील विविध भागातून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र जात असल्याने त्याचे अधिक प्रकाशमान स्वरूपातील दर्शन निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी होईल.
निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..
चंद्रपूर : निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव टाकून अपमान केल्याची खंंत बाळगून सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित माजी मुख्यमंत्री तथा चंद्रपूरचे सुपुत्र कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे.

आकाशात विविध ग्रह तारकासोबतच मानव निर्मित आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. आज, १० जानेवारीला सायंकाळी महाराष्ट्रासोबतच मध्य भारतातील विविध भागातून हे केंद्र जात असल्याने त्याचे अधिक प्रकाशमान स्वरूपातील दर्शन निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी होईल.
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील वीज वितरण यंत्रणा जुनाट आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे बिघाड झाल्यास त्यात मोठा वेळ खर्ची जातो. सर्वाधिक दाटीवाटीच्या उल्हासनगरसारख्या शहरात ही यंत्रणा भूमिगत होण्याची मागणी आता पूर्ण झाली असून केंद्राच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) या कामासाठी १६ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. कारण आता काँग्रेस नेते नितीन राऊत होय आम्ही गाफिल राहिलो म्हणून आमचा पराभव झाला असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपाला २० दिवस उशीर झाल्याचं, जागावाटपात घोळ झाल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांना संजय राऊत यांनी तसंच उत्तर दिलं आहे.