News Updates Today : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान ३ मोहिम यशस्वी करत जगात भारताची मान उंचावली आहे. या कामगिरीसाठी जगभरातून इस्रोचं अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनीही इस्रोचं कौतुक केलं. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांकडून सरकारच्या धोरणांमुळे होणाऱ्या नुकसानीवर उपाय म्हणून कांद्याला ४ हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी होत आहे. याशिवाय राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचीही जोरदार चर्चा आहे. राजकारणासह राज्यातील अशा सर्वच घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर…
Marathi News Updates Today : राजकारणासह राज्यातील सर्वच घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
गोदावरीत सातत्याने गटारींचे पाणी सोडले जात असतानाही त्याविषयी कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा विषय बैठकीत उपस्थित झाल्यावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
डोंबिवली: डोंबिवली पश्चिम महात्मा गांधी रस्त्यावरील भावे सभागृहाजवळून पायी जात असताना एका ७० वर्षाच्या महिलेला एका तरुणाने बुधवारी दुपारी ढकलून दिले.
सांगली: कांदा निर्यात शुल्कातून जमा होणारा पैसा शेतकर्याला मिळावा असे मत आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कळमनुरी विधानसभेचा गद्दार व त्याचे चेलेचपाटे त्यांनी लावलेल्या बॅनर्सचे व्हिडीओ मला पाठवत आहेत. गद्दारांसह सर्व चिरकुटांना मी सांगू इच्छिते की, मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे. कारण जो बापमाणूस हिंगोलीत येतोय तो तळपता सुर्य आहे, एक ब्रॅंड आहे. त्यांना मार्केटिंग व बॅनरबाजीची गरच नाही हे लक्षात ठेवा.
उद्धव ठाकरे या २४ कॅरेट अस्सल ब्रँडचं मार्केट डाऊन करण्यासाठी स्वयंघोषित जागतिक स्तराची महाशक्ती अपयशी ठरतेय. तिथं तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या?
- अयोध्या पोळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून (२२ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गंभीर आरोप केले आहेत. "मोदी जोहान्सबर्ग येथे दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. त्यांचं दक्षिण अफ्रिकेच्या एका साध्या मंत्र्याने स्वागत केलं," असा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केला. तसेच स्वागतासाठी दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष न आल्याने मोदी रागावले, असा आरोप ओवैसी यांनी केला. त्यांनी एक ट्वीट रिट्विट करत हे आरोप केले आहेत.
ठाणे: कळवा खाडी परिसरात खारफुटीवर भराव टाकून अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेवर दुमजली झोपड्या उभारण्याची कामे सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ ने प्रसिद्ध केले होते.
मुंबई: सरकारी रुग्णालयांमध्ये उंदीर व माजरांचा नेहमीच सुळसुळाट झाला आहे. या उंदरांमुळे रुग्णांनाही अनेकदा त्रास होतो. उंदरांना रुग्णालयातून हाकलण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेकडून उच्च ध्वनी लहरींचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर: कृत्रिम बुब्बुळ बनविण्याची प्रक्रिया संशोधनाच्या टप्यात आहे. काही मेट्रो शहरातील रुग्णालयांत या कृत्रिम बुब्बुळाचे प्रत्यारोपण सुरू झाले.
नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आज जपानच्या ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली.
नवी मुंबई : येत्या ३१ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आहे. दर्या राजाला नारळ अर्पण करून सर्व आगरी-कोळी बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. नवी मुंबईत विविध ठिकाणी असलेल्या कोळीवाड्यामध्ये हा सण साजरा केला जातो. नेरुळ सारसोळे ग्रामस्थ पाम बीच मार्गालगत असलेल्या जेट्टीवर नारळ अर्पण करतात. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे तसेच कचरा जमा झाला होता. त्यामुळे या ठिकाणी बुधवारी सारसोळे ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.
नवी मुंबई: मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सध्या सुरू असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला दोन नवे खाडी पूल तयार होत असून यांचे काम प्रगतीपथावर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षफुटीवर मोठं विधान केलं आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना काहीही करून सत्तेत यायचं असतं," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट झाली नसल्याचा दावा केला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशभरात भाजपाविरोधकांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राऊतांनी २०२४ मध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात आमचंच सरकार येणार असल्याचं म्हणत तपास यंत्रणांना जाहीर इशारा दिला. ते गुरुवारी (२४ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उरण: ‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ या सुप्रसिद्ध कवितेतील वर्णनानुसार उरणमध्ये श्रावण सरी कोसळत आहेत.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार आहेत. आत्ता त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या उत्तराची वाट पाहत आहोत.
- सुप्रिया सुळे
इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर युवकाने मैत्रिणीला फिरायच्या बहाण्याने लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. नंतर ‘वयाने मोठी आहेस’ असे कारण सांगून लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीत झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनचे मुंबई व पुण्यातील अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. गैरप्रकार करणाऱ्या उपभिकर्ता संस्थांची चौकशी सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत ससूनवघर जवळील जंगल परिसरात गुटख्याची तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.या प्रकरणी नायगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून गुटखा व वाहनांसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ परिसरात रिक्षा चोरुन त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील टिळकनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अंबरनाथ मधून अटक केली आहे. या चोरट्याने एकूण चार रिक्षा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आम्ही त्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्या तक्रारीवर प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रवादीत कोणताही फूट झालेली नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो.
- सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. काहीवेळा हे प्रयत्न अपयशी ठरेल, तर काहीवेळा यश मिळालं. पक्ष फोडणे, साम-दाम-दंड-भेद हे देवेंद्र फडणवीसांचेच शब्द आहेत. त्यांना काहीही करून सत्तेत यायचं असतं.
- सुप्रिया सुळे
तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे कोणताही पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडेल असं कुणाला वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्रातही पोलीस व तपास दल भाजपाच्या इशाऱ्यावर कारवाया करत आहेत. त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना व कायद्याचं वाचन करावं. मी एक सांगू इच्छितो की, २०२४ मध्ये केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचं सरकार राहणार नाही, आमचं सरकार येईल हे या यंत्रणांनी लक्षात ठेवावं. त्यांनी जे कायदेशीर आहे ते करावं. त्यांनी त्यांच्या राजकीय बॉसचे आदेश पाळले तर याद राखा. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही, तर सत्य आहे.
- संजय राऊत
आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, लोकशाही मार्गाने पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकीच्या आधीच विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. हे सत्र दिल्लीसह राज्या राज्यात भाजपाचे लोक राबवत आहेत. याचा 'इंडिया' आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.
- संजय राऊत
नाशिक: वाहनाची चाचणी घेण्याच्या बहाण्याने संशयिताने २० लाख रुपयांची इलेक्ट्रिक मोटार पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.
नागपूर: मध्य रेल्वेने ४२ एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबे जाहीर केले. रेल्वे विभागाकडे विविध भागातून रेल्वे स्थानकांवर थांबे मिळावेत म्हणून मागणी करण्यात आली होती.
"'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. या देशातील भाजपाविरोधी नाही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. देशात भाजपाविरोधी पक्षांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. काल आपण झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये अशा धाडी टाकण्यात आल्या. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. यांना दुसरं काही दिसत नाही."
- संजय राऊत
यवतमाळ: वारंवार एकच व्यक्ती गुटखा तस्करीत आढळून आल्यास ‘मोक्का’ची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून एक तोतया युवक गेल्या दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये फुकट खात होता. परंतु, हॉटेलमालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याला पकडण्यात आले. त्या युवकाने हॉटेलमालकावर चक्क चाकूने हल्ला केला.
चद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेने भारताने आपल्या वैज्ञानिक प्रगतीचे जगाला दर्शन घडवले. भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असला तरी समाज माध्यमांवर मात्र श्रेयवादाची लढाई आणि टिंगल उडवणाऱ्या मिम्सचा पाऊस पडलाआहे. सविस्तर वाचा…
राज्याच्या वनखात्याचे वनबलप्रमुख वाय.एल.पी. राव हे ऑगस्टअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. या पदासाठी दोन दावेदार असून त्यातील कोणाच्या डोक्यावर हा मुकुट चढणार याचा निर्णय गुरुवारी आयोजित बैठकीत होणार आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र पॉलिटिक्स लाइव्ह