Maharashtra Political News Today, 21 November 2023 : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर साखळी आंदोलन करत आहेत. त्यांच्या सभांना लाखो लोकांची गर्दी जमत आहे. दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ओबीसी नेते विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष चालू आहे. आज दिवसभरात याविषयीच्या बातम्या पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी चीनच्या मकाऊमधल्या एका कसिनोमधील जुगाऱ्यांचा फोटो शेअर केला आहे. यावर भारतीय जनता पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे. राऊत आणि भाजपाच्या समाजमाध्यमावरील आरोप प्रत्यारोपांवरून या कथित फोटोत दिसणारी व्यक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोवरून ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू झाला आहे. यावरही आज दिवसभरात राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा