Maharashtra Latest News Updates, 30 January 2023 : काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज सोमवारी मतदान होत आहे. पाचही जागांवर यंदा चुरशीची लढाई आहे. सध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे.

तर मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. हा विषयही दिवसभर चर्चे राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Marathi News Updates : पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे? कागदपत्रे सादर करण्याची मुदत आज संपुष्टात

19:04 (IST) 30 Jan 2023
जळगाव: सनातन हाच खरा मानवता धर्म - गोद्रीतील महाकुंभ समारोपात योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन

सनातन धर्म हाच खरा मानवता धर्म आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदू समाजाने एकवटले पाहिजे. गोद्री महाकुंभाच्या माध्यमातून गोर बंजारा, लबाना, नायकडा व इतर पोटजातींचे एकत्रीकरण होईल.

सविस्तर वाचा

18:44 (IST) 30 Jan 2023
सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी अटकेत; ईडीच्या तपासात असहकार्य, पुरावे नष्ट केल्याचा आरोप

पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या निवासस्थानावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मूलचंदानी यांनी तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर साधूराम मूलचंदानी यांच्यासह अशोक साधुराम मूलचंदानी, मनोहर साधुराम मूलचंदानी, दया अशोक मूलचंदानी, साधना मूलचंदानी, सागर मनोहर मूलचंदानी (सर्व रा. मिस्ट्री पॅलेस, तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वाचा…

18:32 (IST) 30 Jan 2023
ठाणे: महामार्गावर लुटारूंचा तरुणावर चाकूहल्ला

मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली भागात लुटमार करताना तीन चोरट्यांनी एकावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सविस्तर वाचा

18:03 (IST) 30 Jan 2023
बुलढाणा: मोताळा नगरपंचायतमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे ८ नगरसेवक शिंदे गटात

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धूम सुरू असताना जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतमध्ये राजकीय भूकंप झाला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ पैकी तब्बल ८ सदस्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर विश्वास दर्शवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.

सविस्तर वाचा

18:02 (IST) 30 Jan 2023
बुलढाणा: वेदनांची तमा न बाळगता कॅन्सरग्रस्त रुग्णाने बजावला मतदानाचा हक्क

लाखोंच्या संख्येतील पदविधरांची नोंदणी संदर्भात आणि मतदार असताना मतदानासाठी असलेली निष्क्रियता या निराशाजनक पार्श्वभूमीवर येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाने वेदनांची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावला.प्रशांत कुळकर्णी असे या मतदाराचे नाव आहे.

सविस्तर वाचा

18:02 (IST) 30 Jan 2023
बुलढाणा: वेदनांची तमा न बाळगता कॅन्सरग्रस्त रुग्णाने बजावला मतदानाचा हक्क

लाखोंच्या संख्येतील पदविधरांची नोंदणी संदर्भात आणि मतदार असताना मतदानासाठी असलेली निष्क्रियता या निराशाजनक पार्श्वभूमीवर येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाने वेदनांची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावला.प्रशांत कुळकर्णी असे या मतदाराचे नाव आहे.

सविस्तर वाचा

18:01 (IST) 30 Jan 2023
धक्कादायक! गोंडवाना विद्यापीठाच्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन

न्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

16:33 (IST) 30 Jan 2023
पुणे : पैसे मागितल्याने गुंडांचा पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला

पाणीपुरी खाल्यानंतर पैसे मागितल्याने दोन गुंडांनी पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

16:23 (IST) 30 Jan 2023
रेल्वे फाटक उघडण्यासाठी भिवंडी जवळील ज्युचंद्र रेल्वे फाटकात प्रवाशांचा गोंधळ

रेल्वे मार्गात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आली आहेत, हे माहिती असुनही भिवंडी जवळील ज्युचंद्र ते चंद्रापाडा गाव रस्त्या दरम्यानच्या रेल्वे फाटकात गुरुवारी रात्री दीड वाजता सात प्रवाशांनी फाटक उघडण्यासाठी गोंधळ घातला. रेल्वे फाटक नियंत्रकाला शिवीगाळ केली.

सविस्तर वाचा...

16:20 (IST) 30 Jan 2023
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर 'शिवसेना' पक्षानाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू असून यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी आज अखेरचा दिवस होता. त्यानुसार ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

15:38 (IST) 30 Jan 2023
ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५ ते १६ माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा...

14:58 (IST) 30 Jan 2023
मुंबई : संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन

संगीतकार नंदू घाणेकर यांचे सोमवारी हृदयवविकाराच्या झटक्याने सकाळी नऊ वाजता निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी मुलुंड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सविस्तर वाचा...

14:24 (IST) 30 Jan 2023
पुणे : वडिलोपार्जित अडीच कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार, न्यायालयाच्या आदेशाने बहिणीसह मुलांवर गुन्हा

आईच्या वार्धक्याचा गैरफायदा घेऊन वडिलांनी कमाविलेले ५५ लाख, साेन्याचे दागिने तसेच सदनिकेची परस्पर विक्री करून दोन कोटी ४७ लाख ७१ हजार रुपयांच्या मालमत्तेचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने बहिणीसह तिच्या मुलांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उषा गुल मनसुखानी, जय गुल मनसुखानी, भावना गुल मनसुखानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:16 (IST) 30 Jan 2023
अकोला : मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. ७ वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि ९ वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज असे या दोन्ही मृत मुलांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

13:55 (IST) 30 Jan 2023
डोंबिवलीत बेकायदा इमारती बांधणाऱ्या ११ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे; ह, फ प्रभागाची आक्रमक कारवाई

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूमाफियांची बांधकामे जमीनदोस्त करणे, त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना नियोजन (एमआरटीपी) कायद्याने गु्न्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

13:43 (IST) 30 Jan 2023
अकोला: आजीला अल्पवयीन नातीच्या पाठीवर दिसल्या जखमा, विचारपूस करताच कुटुंबीय हादरले…

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीसाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यातील संथ गतीनंतर दुसऱ्या टप्प्यात मात्र मतदानाची गती वाढल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा

13:33 (IST) 30 Jan 2023
बुलढाणा: दुसऱ्या टप्प्यात वाढली 'पदवीधर'च्या मतदानाची गती; आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी पहिल्याच टप्पात केले मतदान

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीसाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यातील संथ गतीनंतर दुसऱ्या टप्प्यात मात्र मतदानाची गती वाढल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा

13:28 (IST) 30 Jan 2023
मुंबई : सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांच्या लसीकरणाची व्याप्ती वाढवणार

मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांचा गोवरने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढे सहा ते नऊ महिन्यांच्या बालंकाच्या लसीकरणावर भर देत याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.

सविस्तर वाचा...

13:19 (IST) 30 Jan 2023
मुंबई : विकासकांना आता म्हाडाकडे विकास शुल्क भरावे लागणार; शुल्कापोटी ८०० कोटींची थकबाकी?

मुंबई : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात अतिरिक्त चटईक्षेत्रफळापोटी ५० टक्के सवलत मिळविणाऱ्या विकासकांनी म्हाडाला अदा करावयाच्या विकास शुल्काबाबत मात्र हात आखडता घेतला आहे. ही रक्कम माफ करता येणार नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर विकासकांची पंचाईत झाली आहे.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 30 Jan 2023
नागपूर: एक मतदान केंद्र, सातशे मतदार, नंदनवनमध्ये मतदानासाठी गर्दी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त पतिसाद मिळताना दिसून येत आहे. सावरकर नगर चौकातीलजुपिटर हायस्कूल मतदानासाठी मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

सविस्तर वाचा

12:52 (IST) 30 Jan 2023
सातारा : सातारा लोणंद रस्त्यावर कांदा वाहतूक करणारा ट्रक पलटी

वाई : सातारा लोणंद रस्त्यावर शिवथर गावच्या हद्दीत कांद्याने भरलेला ट्रक अवघड वळणावर रात्री पलटी झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कांदा व्यवसायिकाचे मोठे नुकसान झाले.

सविस्तर वाचा...

12:49 (IST) 30 Jan 2023
नागपूर शिक्षक मतदार संघात दोन तासात १३.५७ टक्के मतदान

विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सकाळी १० पर्यंत १३.५७ टक्के मतदान झाले आहेआज गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७.०० वा. पासून तर अन्य पाच जिल्ह्यांमध्ये ८.०० वा. पासून मतदानास सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा

12:42 (IST) 30 Jan 2023
“झेपत नसेल तर राजीनामा द्या”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना केले लक्ष्य

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे ‘गृहमंत्री जवाब दो’ या राज्यात काय चाललंय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 30 Jan 2023
दिव्यांगाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले.

सविस्तर वाचा...

12:20 (IST) 30 Jan 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला परत माघारी यावे लागले, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

12:18 (IST) 30 Jan 2023
अमरावती पदवीधर मतदार संघात सकाळच्‍या सत्रात संथ गतीने मतदान, १० वाजेपर्यंत ५.४९ टक्‍के मतदानाची नोंद

विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्‍या सत्रात मतदानाची गती संथ असल्‍याचे चित्र आहे. सकाळी १० वाजेपर्यंत ५.४९ टक्‍के मतदानाची नोंद झाली.

सविस्तर वाचा

12:16 (IST) 30 Jan 2023
“असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर”, एकनाथ खडसेंची टीका

सात महिने होत आले तरी राज्यातील १८ मंत्रीच राज्याचा कारभार करत आहेत. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने सर्वत्र अनागोंदीची परिस्थिती आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री शिंदे सरकारने केला तर शिंदे यांच्या पक्षातील, भाजपमधील सर्वच आमदार, नेते मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्वांना मंत्री मंडळात सामावून घेणे शक्य नाही. हा शिंदे गट आणि भाजपमधील असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे केली.

सविस्तर वाचा...

12:00 (IST) 30 Jan 2023
कल्याण: दाट धुक्यामुळे कसारा-कर्जत मार्गावरील लोकल उशिरा

कसारा, कर्जत हून कल्याणकडे सकाळी येणाऱ्या लोकलना सोमवारी रेल्वे मार्गावरील दाट धुक्याच्या चादरीचा फटका बसला. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पाच ते १० मिनिटे उशिराने धावत होती.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 30 Jan 2023
नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक

नागपूर : नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. कळमना ते कामठीदरम्यान गाडीवर रविवारी दगडफेक झाली होती.

सविस्तर वाचा...

11:55 (IST) 30 Jan 2023
नागपूर : पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने चिरला वृद्ध आईचा गळा

पैसे देण्यास नकार देणाऱ्या वृद्ध आईचा मुलाने विळ्याने गळा चिरून खून केला. ही थरारक घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास वनदेवीनगरात घडली.

सविस्तर वाचा...

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी सोमवारी अखेरची मुदत आहे. त्यानंतर दोन-चार दिवसांत आयोगाचा निर्णय अपेक्षित आहे.