Maharashtra Latest News Updates, 30 January 2023 : काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज सोमवारी मतदान होत आहे. पाचही जागांवर यंदा चुरशीची लढाई आहे. सध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. हा विषयही दिवसभर चर्चे राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Marathi News Updates : पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे? कागदपत्रे सादर करण्याची मुदत आज संपुष्टात

11:54 (IST) 30 Jan 2023
नागपूर : प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मतदान केंद्रावर, घेतली गळाभेट; म्हणाले…

निवडणुकीत रिंगणात असलेले राजकीय पक्षाचे उमेदवार एकमेकांचा चेहराही पाहत नाहीत. परस्परांना भेटतही नाहीत. मात्र जेव्हा निवडणूक शिक्षकांची असते तेव्हा उमेदवार असले तरी त्यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि असेच एक चित्र आज शहरातील मोहता सायन्स कॉलेजच्या मतदान केंद्रावर पाहायला मिळाले.

सविस्तर वाचा…

11:53 (IST) 30 Jan 2023
राष्ट्रीय महामार्गावरील काळविटांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?

नागपूर : तो त्यांचाच अधिवास होता, पण माणसांनी त्यावर आक्रमण केले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही आणि परिणामी अधिसुची एक मधील (पूर्णपणे संरक्षित प्रजाती) तब्बल १२ काळविटांना सोलापूर-पुणे-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावर जीव गमवावा लागला. रविवारची संध्याकाळ त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरली.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 30 Jan 2023
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : नक्षलवादग्रस्त गडचिरोलीत दोन तासांत १२ टक्के मतदान

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात सोमवार सकाळी आठ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समवेश असलेल्या शिक्षक मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. तेथील नक्षलवांद्यांच्या हालचाली लक्षात घेता प्रशासन काळजीत असते. मात्र ‘शिक्षक’च्या निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या संख्येने शिक्षक बाहेर पडू लागले असून गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते ९ या दोन तासात १२.८६ टक्के मतदान झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:51 (IST) 30 Jan 2023
सातारा : खंबाटकी बोगद्यात मोटारीचा भीषण अपघात, दोन जागीच ठार; पाच गंभीर जखमी

सातारा पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 30 Jan 2023
नागपूर: आज मतदान, ३९ हजारांवर शिक्षक आज विधान परिषदेचा प्रतिनिधी निवडणार; २२ उमेदवार रिंगणात

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ३० जानेवारीला सकाळी आठ वाजतापासून १२४ मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून सहा जिल्ह्यातील ३९ हजारावर शिक्षक मतदार त्यांचा विधान परिषदेतील प्रतिनिधी या माध्यमातून निवडणार आहे.

सविस्तर वाचा

11:50 (IST) 30 Jan 2023
पुणे : चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंचे मौन

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या विधानाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 30 Jan 2023
मुंबई : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला मानखुर्द पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. याप्रकारणी मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 30 Jan 2023
संघाची सर्वसमावेशक भूमिका वैदिक हिंदू राष्ट्र निर्माणाचा ‘अजेंडा’; विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची टीका

बहुजन समाजामध्ये काही वर्ग असा आहे ज्याचा हिंदूंच्या विचारांवर विश्वास आहे. त्यांना हा धर्म सर्वसमावेशक वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे ओळखून आहेत. त्यामुळे यांच्या भरवशावर ते हिंदू राष्ट्र बनवण्याची स्वप्न पाहत आहेत.

सविस्तर वाचा

11:45 (IST) 30 Jan 2023
नागपुरातील कोळसा व्यापाऱ्याला मागितली १ कोटीची खंडणी; तीन पत्रकारांसह चौघांना अटक

नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर १ कोटीच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास वृत्तपत्राच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली.

सविस्तर वाचा

11:42 (IST) 30 Jan 2023
मुंबई: जी २० परिषदेच्या तयारीसाठी रस्त्यांच्या दुरुस्तीवर १० कोटींचा खर्च

जी २० शिखर परिषदेच्या तयारीसाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर रस्त्यांची डागडुजी केली त्याला तब्बल १० कोटींचा खर्च आला आहे. सांताक्रूझ परिसरापासून विमानतळाकडे जाणाऱ्या पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हा खर्च करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:38 (IST) 30 Jan 2023
मुंबई: मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडप्रकरणी उद्यापासून सुनावणी

दहिसर ते मीरारोड-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील राई-मुर्धा-मोर्वा येथील प्रस्तावित कारशेडला स्थानिकांनी विरोध केला असतानाही येथील ३२ हेक्टर जागेवर कारशेडसाठी आरक्षण प्रस्तावित आहे. त्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने सूचना-हरकती सादर केल्या असून त्यावर मंगळवारपासून (आजपासून) सुनावणी होणार आहे.

सविस्तर वाचा

11:28 (IST) 30 Jan 2023
”पुरक वातावरण नसल्यानेच भारतात उद्योग आले नाहीत”; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

अमेरिका–चीन व्यापारयुद्ध आणि कोरोना नंतरच्या काळात बदललेल्या जागतिक रचनेचा परिणाम म्हणून चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या. Google, Adidas, Samsung व्हिएतनामला, Hyundai, Honda अमेरिकेत, JVC Kenwood, Iris Ohyama जपानला, Murata थायलंडला, Harley Davidson मलेशियाला गेली. या कंपन्यांना भारत सर्वात जवळचा पर्याय असूनही त्या भारतात आल्या नाहीत. कारण त्यासाठी पूरक वातावरणही असावं लागतं, पण यातच आपण कमी पडलो, अशी टीका रोहित पवार यांनी मोदी सरकारवर केली आहे. आजच्या बेरोजगारीच्या काळात अशा कंपन्या देशात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

11:24 (IST) 30 Jan 2023
विधानपरिषद निवडणूक: भाजपा उमेदवार रणजीत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप!

विधानपरिषेदच्या पाच जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. अशातच अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

11:23 (IST) 30 Jan 2023
‘Hindenburg’च्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “हा भारतावर…”

जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या आपल्या एका अहवालात म्हटलं आहे. ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अदानी समूहाला ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच अदानी समूहाने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर वाचा

11:19 (IST) 30 Jan 2023
“…हे तर थेट नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाच आव्हान”, संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले…

मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच, यावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच टोला लगावला आहे. सविस्तर वाचा

11:18 (IST) 30 Jan 2023
विधान परिषदेसाठी आज मतदान; पाचही मतदारसंघांत चुरस; नाशिकची जागा मविआ-भाजपसाठी प्रतिष्ठेची

काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे. प्रथमच चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. सविस्तर वाचा

11:17 (IST) 30 Jan 2023
“बागेश्वर बाबा जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा”; तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “शिंदे सरकार…”

दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या विधानावरून संताप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज जिथे दिसेल तिथे ठोकून काढा, असं ते म्हणाले. अकोल्यात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी सोमवारी अखेरची मुदत आहे. त्यानंतर दोन-चार दिवसांत आयोगाचा निर्णय अपेक्षित आहे.