Maharashtra Political Crisis Updates, 18 November 2022 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान एका भाषणामध्ये बुधवारी रात्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे राज्यात गुरुवारीही पडसाद उमटले. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने रस्त्यावर उतरून राहुल यांचा निषेध करत ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही सावरकर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार का देण्यात आला नाही, असा सवाल केला.

 मनसेने काँग्रेसची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील उतारावर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मोटारीचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

राज्यभरातील विविघ घडामोडींच्या सविस्तर बातम्या वाचा केवळ एका क्लिकवर

Live Updates

Mumbai Marathi News Updates, 18 November 2022 : राज्यभरातील विविघ घडामोडींच्या सविस्तर बातम्या वाचा केवळ एका क्लिकवर

19:35 (IST) 18 Nov 2022
"मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की...", राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडभरून कौतुक

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ असा उल्लेख करत जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना मार्ग दाखवला, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. तसेच मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं, इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं, असंही त्यांनी नमूद केलं. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमधील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

सविस्तर बातमी...

19:34 (IST) 18 Nov 2022
Rahul Gandhi Shegaon Speech: "भाजपाने देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष, भीती, दहशत पसरवली", राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. "आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला आहे," असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. तसेच द्वेषाने या देशाचा कधीच फायदा होणार नाही, असं मत व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमधील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

सविस्तर बातमी...

19:33 (IST) 18 Nov 2022
"अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?", शरद पवारांचा उल्लेख करत फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचं पत्र दाखवत त्या पत्राच्या ओळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही वाचण्यास सांगितलं. यानंतर आता फडणवीसांना ट्वीट करत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय. यात देवेंद्र फडणवीसांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा उल्लेख करत "अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?" असा प्रश्न विचारला.

सविस्तर बातमी...

19:32 (IST) 18 Nov 2022
राहुल गांधींकडून ५० खोक्यांचा उल्लेख, शिंदे गटातील मंत्री दादा भुसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, "लोक हसायला..."

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात असताना ५० खोक्यांवरून शिवसेनेतील बंडखोरांवर खोचक विधान केलं. यावर आता शिंदे गटातील नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "५० कोटी रुपयांच्या विषयाचा चोथा झाला आहे. आता लोक हसायला लागलेत या गोष्टींना," असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सविस्तर बातमी...

19:32 (IST) 18 Nov 2022
"राहुल गांधींच्या वक्तव्याने मविआत फूट पडू शकते", राऊतांच्या विधानावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले, "सावरकरांबद्दल..."

काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून महाविकासआघाडीत फूट पडू शकते, असं मोठं वक्तव्य केलं. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठा प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत, हे सांगताना त्यांची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही," असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमध्ये पत्रकारांशी संवाद करत होते.

सविस्तर बातमी...

19:31 (IST) 18 Nov 2022
इस्रोकडून पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण, पण १०० किमी झेप घेतल्यानंतर समुद्रात कोसळणार, कारण...

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने नवा इतिहास रचला आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिलं खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचं आहे. या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. निर्धारित लक्ष्यानुसार, हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे.

सविस्तर बातमी...

18:57 (IST) 18 Nov 2022
आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर मांडली भूमिका!

आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर मांडली भूमिका!

वाचा सविस्तर

18:41 (IST) 18 Nov 2022
‘एसटी’च्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...

15:23 (IST) 18 Nov 2022
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा राहुल गांधींना पाठिंबा!

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा राहुल गांधींना पाठिंबा!

वाचा सविस्तर

14:46 (IST) 18 Nov 2022
राहुल गांधींसह हजारो पदयात्री जिल्ह्यात दाखल; वरखेड येथे तिरंगा व भगव्याचा मेळ! रिंगण सोहळ्यात रमले राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सविस्तर वाचा...

14:15 (IST) 18 Nov 2022
पप्पू हाय हाय, राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देत मनसेचं आंदोलन; पोलिसांनी वाटेतच अडवला ताफा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर मनसेने शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखली नाक्यावर रोखलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आता मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात पप्पू हाय हाय...अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:57 (IST) 18 Nov 2022
बांगलादेशमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाचा पुनरावृत्ती, खून करुन मृतदेहाचे तुकडे

सध्या संपूर्ण देशभरात श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे खळबळ माजलेली असताना शेजारील देश बांगलादेशमध्येही अशीच घटना घडली आहे. अबु बकर याने आपली हिंदू प्रेयसी कविता राणी हिचा खून करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत. पोलिसांना घऱात एका बॉक्समध्ये डोक्यासहित मृतदेहाच्या शरिराचे इतर भागही सापडले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सविस्तर बातमी

13:50 (IST) 18 Nov 2022
Delhi Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला वेगळं वळण? आफताबचा मोठा खुलासा, म्हणाला “हत्येच्या दिवशी मी…”

दिल्लीतील हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात खळबळ माजलेली असताना रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने पोलिसांकडे आपल्याला गांजाचं व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. इतकंच नाही, तर १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली तेव्हा आपण गांजाच्या प्रभावाखाली होतो असंही त्याने पोलिसांना सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. आफताबच्या या कबुलीमुळे आता या तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी

13:11 (IST) 18 Nov 2022
गुन्हेगारीवर बेतलेल्या गाण्यांद्वारे दहशत, पुण्यात गुन्हेगारांकडून समाजमाध्यमांचा असाही वापर; अपर इंदिरानगरमधील तरुणावर गुन्हा

पुणे : गुन्हेगारीवर बेतलेली गीते समाजमाध्यमातून प्रसारित करून दहशत माजविणे एका तरुणाच्या अंगलट आले. बिबवेवाडी भागातील एका तरुणाच्या विराेधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

12:48 (IST) 18 Nov 2022
राहुल गांधींचा निषेध नोंदण्यासाठी मनसेचा ताफा शेगावच्या दिशेने

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी औरंगाबाद येथून मनसे कार्यकर्ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) काळे कपडे घालून शेगावच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी 'या पप्पूचं करायचं काय, खाली डोकं, वर पाय' अशा घोषणा देत निषेध नोंदवला.

12:38 (IST) 18 Nov 2022
“राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आघाडीत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “कटू असलं तरी…”

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या तर शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. याशिवाय शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा सूचक इशाराही काँग्रेसला दिला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. तर संजय राऊतांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते संजय सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:58 (IST) 18 Nov 2022
शहरी नक्षलवाद प्रकरण : दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात असल्याने प्रा.आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. एप्रिल २०२० पासून तेलतुंबडे अटकेत आहेत. याच मुद्यावर उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला.

सविस्तर वाचा...

11:20 (IST) 18 Nov 2022
फारुख अब्दुल्ला यांचा मोठा निर्णय, पक्षप्रमुख पदावरुन पायउतार, म्हणाले “आता पक्ष…”

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे. फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना फारुख अब्दुल्ला यांनी ही घोषणा केली आहे. ५ डिसेंबरला पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

सविस्तर बातमी

11:16 (IST) 18 Nov 2022
…तर एकपडदा चित्रपटगृह बंद करावी, चित्रपटगृहांच्या मालकांचीच मागणी

मनोरंजनाच्या नव्या माध्यमांमुळे एकपडदा चित्रपटगृह डबघाईला आल्याची खंत महाराष्ट्रातील एकपडदा चित्रपटगृहाचे मालक व्यक्त करीत आहेत. एकपडदा चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांनी पूर्णत: पाठ फिरवल्यामुळे राज्य सरकारने ती बंद करून त्या जागी इतर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यभरातील एकपडदा चित्रपटगृहांच्या मालकांनी केली आहे.

सविस्तर वाचा...

10:56 (IST) 18 Nov 2022
Elon Musk: कर्मचाऱ्यांसाठी पुढील आठवड्यापर्यंत कंपनीचे दरवाजे बंद, राजीनामा सत्र सुरू असतानाच ट्विटरचा नवा आदेश

ट्विटरचे मालकी हक्क मिळताच एलॉन मस्क यांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर या कंपनीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कंपनीचं कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलं आहे, असं ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. ‘बीबीसी’नं या बाबतचं वृत्त दिलं आहे.

सविस्तर बातमी वाचा...

10:55 (IST) 18 Nov 2022
VIDEO: गाझा पट्टीत निर्वासितांच्या छावणीला भीषण आग; २१ लोकांचा मृत्यू, सात चिमुकल्यांनीही गमावला जीव

गाझा पट्टीतील निर्वासितांच्या छावणीतील एका इमारतीला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. ‘बीबीसी’नं या घटनेचं वृत्त दिलं आहे. उत्तर गाझामधील दाट लोकवस्तीच्या जबालिया निर्वासितांच्या छावणीत ही आग लागली होती.

सविस्तर बातमी वाचा...

10:54 (IST) 18 Nov 2022
Bharat Jodo Yatra: “मनसेच्या काळ्या झेंड्यांना आम्ही…”, सभा उधळून लावण्याच्या इशाऱ्यावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची शेगावमध्ये आज सभा होणार आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मनसेकडून या सभेत काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे. “मनसेच्या या काळ्या झेंड्यांना आम्ही गुलाबाच्या फुलानं उत्तर देऊ”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

सविस्तर बातमी वाचा...

10:53 (IST) 18 Nov 2022
मोठी बातमी! राहुल गांधींविरोधात ठाणे पोलिसात गुन्हा दाखल, सावरकरांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती.

सविस्तर बातमी वाचा...

10:43 (IST) 18 Nov 2022
खंडाळा घाटात भीषण अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील उतारावर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

सविस्तर बातमी

10:38 (IST) 18 Nov 2022
MNS vs Congress: राहुल गांधींची सभा उधळण्याचा इशारा, अशोक चव्हाणांकडून मनसेला उत्तर, म्हणाले “अशा किरकोळ…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर मनसेने शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावर व्यक्त होताना किरकोळ आंदोलन म्हणत खिल्ली उडवली आहे. वाचा सविस्तर बातमी...

10:38 (IST) 18 Nov 2022
सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान एका भाषणामध्ये बुधवारी रात्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे राज्यात गुरुवारीही पडसाद उमटले. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने रस्त्यावर उतरून राहुल यांचा निषेध करत ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही सावरकर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार का देण्यात आला नाही, असा सवाल केला. वाचा सविस्तर बातमी...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील उतारावर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मोटारीचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

Story img Loader