Latest Maharashtra News Today, 27 June 2023 : महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. काल (२७ जून) एक दिवस विश्रांती घेऊन पावसाची आज पुन्हा संततधार सुरू झाली आहे. आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर रेल्वेसेवा विस्कळीत होते. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सतत अडचणी येत असल्याने रेल्वेसेवा विस्कळीत होत आहे. काल (२७ जून) अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. आज पुन्हा अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखल्याने मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना लेटलतीफचा फटका बसत आहे. दुसरीकडे पुण्यात काल (२७ जून) एका तरुणीवर भररस्त्यात कोयता हल्ला झाला. या हल्ल्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रभर उमटण्याची शक्यता आहे. यांसह राज्यातील राजकारण, समाजकारण आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

Live Updates

Marathi News Live Update

19:22 (IST) 28 Jun 2023
दोन द्राक्ष बागायतदारांची जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून फसवणूक

नाशिक: जिल्ह्यात परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होणे नवीन नाही. दरवर्षी अशा तक्रारी येत असताना आता जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडूनही द्राक्ष उत्पादकांची फसवणू होऊ लागली आहे.

सविस्तर वाचा...

18:52 (IST) 28 Jun 2023
Health Special: पावसाळी वातावरणाचा आणि शरीरातील हार्मोन्सचा काय संबंध?

पावसाळ्यातील वातावरणामध्ये त्याहुनही पहिल्या पावसामध्ये मनाला एक वेगळीच हूरहूर लागते. जुन्या आठवणी दाटून येतात.

सविस्तर वाचा...

18:28 (IST) 28 Jun 2023
टोमॅटो नंतर आता मिरच्याही महागल्या, घाऊकमध्ये प्रति किलो ६०-८० रुपये तर किरकोळ बाजारात…

नवी मुंबई : एपीएमसी बाजारात सुरुवातीला मिरचीचे दर आटोक्यात होते. मात्र मागील महिन्यापासून मिरचीच्या दरात वाढ होत आहे.

वाचा सविस्तर...

18:18 (IST) 28 Jun 2023
सायकल बनवा, पारितोषिक जिंका! AICTEतर्फे भारत सायकल डिझाइन चॅलेंज

पुणे: भारतीय बाजारपेठेला पूरक, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सायकल तयार करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) भारत सायकल डिझाइन चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली असून, देशभरातील तंत्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सायकल निर्मितीसाठी पारितोषिके दिली जाणार आहेत.

सविस्तर वाचा....

18:16 (IST) 28 Jun 2023
पंढरपूर : वारकऱ्यांच्या भक्तीने पंढरी सजली, आषाढीसाठी ८ ते ९ लाख भाविक

पंढरपूर : एकीकडे हरीनाम आणि विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा सुरवातीला उन्हाचा तडाका त्याच वेळी लांबलेला पाऊस यामुळे भाविकांची संख्या कमी दिसून आली. यंदा दशमीला सायंकाळपर्यंत जवळपास ८ ते ९ लाख भाविक दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा...

18:02 (IST) 28 Jun 2023
अखेर ठरले, बुलढाण्यात कृषी महाविद्यालय होणार! दशकापासून सुरू असलेली अडथळ्यांची शर्यत पार

बुलढाणा : मागील अनेक वर्षांपासून लालफितशाहीत अडकलेल्या बुलढाण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाला अखेर हिरवी झेंडी मिळाली. यासाठी तब्बल १४६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

17:45 (IST) 28 Jun 2023
घोडबंदरमधील भुयारी गटार योजनेत ५० कोटींचा घोटाळा? प्रकल्प खर्चात कपात होण्याऐवजी वाढ; मनसेचा गंभीर आरोप

ठाणे: पाच वर्षे उलटूनही अपुर्णावस्थेत असलेल्या घोडबंदर भागातील भुयार गटार योजना प्रकल्पातून अनेक कामे वगळण्यात आल्याने खर्चात कपात होणे अपेक्षित होते.

सविस्तर वाचा...

17:40 (IST) 28 Jun 2023
“समृद्धी महामार्ग बांधला राज्याने, लोक अपघातांबाबत प्रश्न विचारतात मला”; वाचा, गडकरी नेमके काय म्हणाले

नागपूर : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली. या अपघातांची कारणे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांची मते विचारली जात आहेत. काहींच्या मते, रस्ता बांधकामात दोष आहे तर काहींनी वेग मर्यादा यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.

सविस्तर वाचा...

17:27 (IST) 28 Jun 2023
नवी मुंबई : उच्चभ्रू वसाहतीची कंपाउंडची दगडी भिंत पडली, तीन गाड्यांचे नुकसान

नवी मुंबई : नवी मुंबईतील सी वूड येथील खाडी किनारी असलेल्या एनआरआय कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू वसाहतीतील एक भिंत पडून तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या वेळी गाडीत वा गाडी लावलेल्या ठिकाणी कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. 

सविस्तर वाचा..

17:13 (IST) 28 Jun 2023
शिळफाटा रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा वाहनांना फटका

कल्याण – बुधवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या अनेक सखल भागात पाणी साचले. या पाण्यामुळे वाहने संथगतीने धावत आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर जागोजागी वाहन कोंडी असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 28 Jun 2023
Health Special: कोड असलेल्या व्यक्तीने काय काळजी घ्यावी? (उत्तरार्ध)

ज्या व्यक्तीला कोड हा आजार झाला आहे त्यांनी मुख्य म्हणजे घाबरून जाऊ नये. मन शांत ठेवावे, हा आजार संसर्गजन्य नाही. हा आजार फक्त त्वचेच्या रंगापुरता मर्यादित आहे.

सविस्तर वाचा...

16:59 (IST) 28 Jun 2023
मुंब्रा बाह्यवळण मार्गावर दरड कोसळली

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खडी मशीन रोड परिसरात दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेत जीवतहानी टळली असून घटनेमुळे परिसरातील वाहतूक काहीकाळ मंदावली होती.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 28 Jun 2023
पुण्यातील समाविष्ट गावांची सांडपाणी समस्या सुटणार; महापालिकेचा आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाबरोबर करार

पुणे: महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सांडपाणी वहन यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाबरोबर (आयएफसी) करार करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

16:39 (IST) 28 Jun 2023
नागपूर : स्टंटबाजी पडली महागात, ११ दुचाकीस्वारांवर कारवाई

नागपूर : रस्त्यावर १५ ते २० मित्रांसह भरधाव दुचाकी चालवून ‘स्टंटबाजी’ करताना एक चित्रफित इंस्टाग्रामवर प्रसारित झाली होती. वाहतूक पोलिसांनी त्याआधारे ११ दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला व त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचा दंडही वसूल केला.

सविस्तर वाचा...

16:22 (IST) 28 Jun 2023
नागपुरात तैनात “या” लष्करी अधिकाऱ्याचा राष्ट्रपतीकडून सन्मान

नागपूर: मेजर जनरल एसके विद्यार्थी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात मंगळवारी आयोजित एका सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वाचा...

16:03 (IST) 28 Jun 2023
पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट दरोडा विरोधी पथकाने उधळून लावला

चिंचवडमधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट दरोडा विरोधी पथकाने उधळून लावला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शेखर ओव्हाळ यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माथाडीच्या कामावरून शेखर ओव्हाळ आणि सराईत गुन्हेगार अमोल गारगले यांच्यात पंधरा दिवसापूर्वी वाद झाले होते.

सविस्तर वाचा

16:00 (IST) 28 Jun 2023
वाशीम : तीन वर्षांपासून समितीच गठीत नाही; ७०० लोककलावंताचे प्रस्ताव धूळखात

वाशीम : लोककलावंत आपल्या कलेतून संस्कृती जपण्याचे काम करतात. मनोरंजन, प्रबोधन करतात. वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून वृद्ध कलावंत समिती गठीत करण्यात आली नाही. त्यामुळे जवळपास सातशे मानधन प्रस्ताव समाज कल्याण विभागात धूळखात पडून आहेत.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 28 Jun 2023
भंडारा : पोलीस पाटील, कोतवाल भरती घोटाळ्याप्रकरणी दोन तहसीलदांरासह उपविभागीय अधिकारी निलंबित

भंडारा : पोलीस पाटील आणि कोतवाल भरतीसह परीक्षेत घोटाळा झाला असल्याची तक्रार करीत अनेक सामाजिक संघटनानी हा विषय उचलून धरला होता. त्या अनुषंगाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान कोतवाल आणि पोलीस पाटील घोटाळ्याप्रकरणी भंडारा आणि पवनीच्या तत्कालीन तहसीलदरासह तत्कालीन उपविभागीय अधिकारी, अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 28 Jun 2023
वैज्ञानिक प्रगतीत बुद्धिमत्ता हेच सामर्थ्य, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. विवेक सावंत यांचे प्रतिपादन

डोंबिवली – विज्ञानाच्या नवनवीन कितीही शाखा उदयास आल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्या मूळ बुद्धिमत्तेचे काय, आपल्या रोजगाराचे काय होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, कितीही वैज्ञानिक प्रगती, नवे शोध लागले तरी माणसाची बुद्धिमत्ता हेच या सर्व प्रगतीचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष आणि संगणकतज्ज्ञ डाॅ. विवेक सावंत यांनी मंगळवारी येथे केले.

सविस्तर वाचा...

15:27 (IST) 28 Jun 2023
"औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं आमच्या दलित समाजाला...", रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुलं वाहिल्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. औरंगजेबाचा उदोउदो करण्याची भूमिका योग्य नाही, असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं. तसेच आम्ही मुस्लिमांविरोधात नसल्याचंही नमूद केलं. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

14:53 (IST) 28 Jun 2023
Weather Update : पुढचे चार-पाच दिवस मुसळधार पावसाचे; सहाय्यक आयुक्तांना सतर्क राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

पहिल्याच पावसात मुंबईत सर्वत्र पाणी साचल्यामुळे महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यातच आता मुंबईत बुधवारपासून पुढील चार – पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे चहल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा

14:50 (IST) 28 Jun 2023
कुत्रे लाल रंगामुळे का घाण करीत नाही? जाणून घ्या नेमके कारण

नागपूर : अनेक ठिकाणी प्रवेशद्वारासमोर लाल रंगाची प्लॉस्टिक बॉटल ठेवल्यास दिसून येते. असे केल्याने भटके श्वान घाण करीत नाही, असा समज आहे.

वाचा सविस्तर...

14:50 (IST) 28 Jun 2023
अकोला : प्रियकराने केले दुसरीशीच लग्न, संतप्त प्रेयसीने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

अकोला : घराजवळच राहणाऱ्या युवक-युवतीचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने दुसरीशीच लग्न उरकले. त्यामुळे प्रेयसी प्रचंड संतापली. तिने आपला भाऊ व त्याच्या साथीदारासह पूर्वाश्रमीच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला. हे प्रकरण पोलिसात गेल्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

14:44 (IST) 28 Jun 2023
यवतमाळ: घाटंजी येथील निराश्रीत वृद्धांना बांधून दिले घर; ‘रसिकाश्रय’चा पुढाकार

यवतमाळ: गरीब निराधार लोक गल्लीबोळात कुठेतरी आसरा घेऊन वास्तव्य करतात. अशा लोकांना हक्काचे घर हवे आहे, मात्र या गरीब आणि वृद्धांना घर कोण देणार?

सविस्तर वाचा...

14:42 (IST) 28 Jun 2023
नगरमध्ये वाजू लागले पुन्हा जिल्हा विभाजनाचे तुणतुणे!

नगर : नामांतराच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचे सूर आळवले जाऊ लागले आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाने जिल्हा विभाजनाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 28 Jun 2023
भंडारा : पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन नदीपात्रात अडकली

भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान निर्माणाधिन पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन चुलबंद नदीपात्रात अडकली आहे.

वाचा सविस्तर...

14:15 (IST) 28 Jun 2023
पिंपरी: गहुंजेनंतर आता मोशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

14:07 (IST) 28 Jun 2023
Mental Health Special: अभ्यास नको; युट्यूबच आवडतं? असं का?

मी नववीत होते तेव्हा पहिल्यांदा मारिओ नावाचा गेम माझ्या आयुष्यात आला. तेव्हा मोबाईल नव्हते. पण टीव्हीला गेमचं गॅजेट जोडण्याची सोय आलेली होती.

सविस्तर वाचा...

14:03 (IST) 28 Jun 2023
"त्या मुलीची जात कुठली?...", पुण्यातील कोयता हल्लाप्रकरणात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाची इन्स्टा स्टोरी चर्चेत

पुण्यात मंगळवारी सकाळी भर रस्त्यात थरार झाला. एका तरुणाने एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने या प्रकरणात लेशपाल जवळगे या तरुणाने तत्काळ हस्तक्षेप केल्याने तरुणीचा जीव वाचला आहे. लेशपाल आणि हर्षद पाटील या तरुणांनी जीवाची बाजी लावून या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावरून या दोघांचंही सर्वत्र कौतुक होत असताना लेशपालने इन्स्टावर एक स्टोरी टाकली आहे. त्यावरून आता बरीच चर्चा सुरू झाली आहे. "त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला", अशी उद्विग्न पोस्ट लेशपालने ठेवली आहे.

14:00 (IST) 28 Jun 2023
विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका घोषित, वाचा सविस्तर

चंद्रपूर : राज्याचे वन, सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील गावे ओडीएफ प्लसमध्ये बसत असल्याने बल्लारपूर विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस घोषित करण्यास आला आहे.

सविस्तर वाचा...

Maharashtra News Live

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Marathi News Live Update : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर