Latest Maharashtra News Today, 27 June 2023 : महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. काल (२७ जून) एक दिवस विश्रांती घेऊन पावसाची आज पुन्हा संततधार सुरू झाली आहे. आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर रेल्वेसेवा विस्कळीत होते. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सतत अडचणी येत असल्याने रेल्वेसेवा विस्कळीत होत आहे. काल (२७ जून) अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. आज पुन्हा अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखल्याने मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना लेटलतीफचा फटका बसत आहे. दुसरीकडे पुण्यात काल (२७ जून) एका तरुणीवर भररस्त्यात कोयता हल्ला झाला. या हल्ल्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रभर उमटण्याची शक्यता आहे. यांसह राज्यातील राजकारण, समाजकारण आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Marathi News Live Update
पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी लोणावळ्याच्या राजमाची किल्ला परिसरातील ढाक बहिरी डोंगरावर मंगळवारी ट्रेकिंगसाठी गेले होते. दाट धुके आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चार जण जंगलात हरवले होते.
सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभूमी येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

नागपूर : पुण्याहून नागपूरला येणारे विमान अंधूक प्रकाशामुळे नागपूरऐवजी मुंबईकडे वळवण्यात आले. मंगळवारी नागपूरकडे उड्डाण केलेले इंडिगोचे विमान छत्रपती संभाजीनगरच्या हवाई क्षेत्रात असताना अंधूक प्रकाशामुळे मुंबईकडे वळविण्यात आले. हे विमान पुणे येथून सकाळी ११.१५ वाजता उडाले आणि १२.३० वाजता नागपूरला पोहोचणे अपेक्षित होते.
भंडारा: पवनी तालुक्यात वाघाने आणखी एक बळी गेला घेतला असून एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. मृतकाचे नाव ईश्वर सोमा मोटघरे , वय ५८, रा. खातखेडा असे आहे.
मुंबई महानगरात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली असून पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक आणि लोकल सेवा मंदावली. अनेक ठिकाणच्या सखलभागात काही प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. परिणामी, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पाऊस कायम राहिल्याने पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांत मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा जमा झाला.
पनवेल : खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ येथील रस्ता खचला. मंगळवारी खचलेल्या रस्त्यात पाण्याच्या टॅंकरचे चाक अडकल्याने टॅंकरचालकाने मोठी कसरत करून रुतलेला टॅंकर काढला. परंतु तोपर्यंत त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता.

विरार पश्चिमेच्या विवा महाविद्यालयाच्या समोर उभ्या करण्यात आलेल्या शालेय बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विरार पश्चिमेच्या विवा महाविद्यालया समोर शालेय मुलांना वाहतूक करणारी बस उभी करण्यात आली होती.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर समोरील आनंद नगर मैदानाला खेटून एका भूमाफियाने बेकायदा इमारतीचे बेकायदा बांधकाम जोमाने सुरू केले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने या कामाकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष जाणार नाही, अशा पद्धतीने घाईघाईने स्लॅब टाकून हे काम पूर्ण करण्याच्या हालचाली भूमाफियांनी सुरू केल्या आहेत.
नागपूर: महसूल विभागामार्फत ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, मागील (२०१९) तलाठी भरतीमधील घोटाळ्यांचा अनुभव बघता पदभरतीमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वर्धा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र सेट ही प्राध्यापक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.महाराष्ट्र व गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहे.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा बँकेसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस छावणीचे स्वरूप परिसराला मिळाले आहे.
चंद्रपूर: तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गोंडपिपरी, राजुरा, जिवती, कोरपना या तालुक्यात प्रतिबंधित चोरबीटी बियाण्याची तस्करी करणाऱ्या तस्करांचे मोठे रॅकेट सक्रीय झाले आहे.
मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आंबेनळी घाटात आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने पोलादपुर महाबळेश्वर दरम्यान वाहतुक ठप्प झाली होती. सकाळी दरड हटविण्याचे काम पुर्ण करून या मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे, आंबेनळी घाटात कालिका मंदीरा जवळ मंगळवारी रात्री ही दरड कोसळली.
चंद्रपूर : गेल्या चार वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशाचे शासनाकडे १८०० कोटी रुपये थकीत आहे. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे आणि योगेश गोखरे यांच्या नेतृत्वात जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
नागपूर : विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र धापेवाडा येथे चंद्रभागा नदीचे खोलीकरण सुरू असताना त्यात ३५० वर्षांपूर्वीचे प्राचीन आणि पुरातनकाळातील कुंड सापडले आहे. या कुंडातून कोलबा स्वामी यांना विठ्ठल-रुख्माईची मूर्ती सापडली असल्याची आख्यायिका आहे.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील गटाराचा प्रवाह १०० हून अधिक बेकायदा चोरीच्या नळजोडण्यांसाठी भूमाफियांनी बंद केला आहे. गटारातून येणारे पाणी नाल्यात जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी माघारी येऊन परिसरातील रस्त्यावर मागील दोन दिवसांपासून पसरले आहे.
अमरावती : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य, आमदार रवी राणांच्या मतदारसंघात भाजपने उघडलेली आघाडी यामुळे नेहमीच भाजपची बाजू मांडणाऱ्या राणा दाम्पत्याची कोंडी झाली आहे.
नागपूर : महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसांत मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
कल्याण – कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग अंतर्गत खडेगोळवली भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वीची डांबरीकरणाची कामे पालिकेने पूर्ण न केल्याने त्याचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे.
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणातील पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मात्र असे असताना मुंबईत मात्र येत्या १ जुलैपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणांतील पाणीसाठा खालावल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव जलविभागाने मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवला होता.
नागपूर: ‘एम्स’मध्ये एमआरआय तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना काॅन्ट्रास्टच्या नावावर लुबाडले जात असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित करताच खळबळ उडाली.
महानगरपालिकेतील शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या वर्चस्वावरून शिंदे आणि ठाकरे गटात उद्भवलेल्या वादानंतर पोलिसांनी मनपातील गोठवलेले कार्यालय न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
लखनौ येथे सीमाशुल्क आणि जीएसटी विभागात कार्यरत असलेले अधिकारी सचिन सावंत यांना बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्यांची यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना लखनौहून मुंबईत चौकशीसाठी आणले जात आहे, अशी माहिती ईडीने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Maharashtra | Sachin Sawant, an officer working in the Customs and GST department, Lucknow, UP has been arrested by Enforcement Directorate (ED), in connection with a disproportionate assets case. He was posted in Enforcement Directorate, Mumbai, earlier. He is being brought to…
— ANI (@ANI) June 28, 2023
पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव इंधनवाहक टँकरने दुचाकीस्वार मायलेकींना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला असून सहप्रवासी शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
सविस्तर वाचा
याबाबत एका तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीला तातडीने तीन हजार रुपयांचे गरज होती. तिने मोबाइलवरुन लोनॲपच्या माध्यमातून तीन हजार रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर एकाने तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली.
नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर असून येथून येथील रेल्वे स्थानकांवरून देशाच्या चारही बाजूंना जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत. ब्रिटीशकालीन असलेले हे रेल्वे स्थानक अनेक घटनांचे साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही अनेक मोठ्या नेत्यांनी येथून प्रवास केला आहे.
शहरात नागरिकांना पायी चालण्यासाठी महापालिकेने पदपाथ बांधले आहे, पण प्रताप नगर चौकात फळविक्रेत्यांनी ते गिळंकृत केले. हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Marathi News Live Update : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर