Latest Maharashtra News Today, 27 June 2023 : महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. काल (२७ जून) एक दिवस विश्रांती घेऊन पावसाची आज पुन्हा संततधार सुरू झाली आहे. आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर रेल्वेसेवा विस्कळीत होते. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सतत अडचणी येत असल्याने रेल्वेसेवा विस्कळीत होत आहे. काल (२७ जून) अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. आज पुन्हा अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखल्याने मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना लेटलतीफचा फटका बसत आहे. दुसरीकडे पुण्यात काल (२७ जून) एका तरुणीवर भररस्त्यात कोयता हल्ला झाला. या हल्ल्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रभर उमटण्याची शक्यता आहे. यांसह राज्यातील राजकारण, समाजकारण आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Marathi News Live Update
पावसामुळे तापमानात घट झाली असून वातानुकूलित उपकरणांचा वापर कमी झाला आहे. दुसरीकडे पावसामुळे कृषीपंपाचाही वापर बंद झाला आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी २२ हजार २६२ ‘मेगावॅट’वर आली आहे. त्यापैकी १४ हजार ३४१ ‘मेगावॅट’ निर्मिती राज्यात होत आहे.
अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्याचे प्रयत्न पोलीस खाते आपल्या परीने करीत आहे.पकडलेला गांजा हा अवैध विक्रीचे तसेच वाढत्या व्यसनाचे प्रतीक म्हणून त्यास सर्वसमक्ष पेटवून देण्याचा निर्णय झाला. निमित्त होते अमली पदार्थ विरोधी दिनाचे. या दिवशी खात्याने शाळकरी मुलांची संदेश यात्रा काढून जनजागरण केले.
भरगर्दीच्या जयस्तंभ चौकात ‘ते’ दोघे भिडले. त्यांची फ्रिस्टाईल पाहायला गर्दी जमा झाली. दोघेही हार मानायला तयार नव्हते, ना वाहने ना दुखापतीची पर्वा. अखेर काही नागरिकांनी ‘जलास्र’ वापरून हा तंटा मिटविला. हे वर्णन ऐकून कुणाला वाटलं की हे गुंडाचं भांडण असावे तर हा अंदाज चुकीचा हाय! कारण हे भांडण होत दोन मस्तवाल सांडांचे!
गडचिरोली: पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेशासाठी एटापल्ली येथे दुचाकीने जात असताना वेलमागड जवळ झाडाला धडक बसल्याने मामा व भाचीचा मृत्यू झाला.
पुण्यातील सदाशिव पेठेत काल (२७ जून) भयानक प्रकार घडला. भर दिवसा, भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यावेळी तेथील जमावाने बघ्याची भूमिका घेतल्याचं सीसीटीव्हीतील दृष्यातून स्पष्ट दिसत आहे. परंतु, लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवलं. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे.

पुढील तीन चार तासांत मुंबई, ठाणे,पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. या मार्गावर काम करण्यासाठी जी-२० बैठका आणि पालखी सोहळ्यामुळे बॅरिकेडिंगला परवानगी देण्यात आली नव्हती. आता काम सुरू करण्यासाठी बॅरिकेडिंगची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने विलंब होत आहे.
आफ्रिकेतील मालावी देशातील महिलेवर पुण्यात अतिशय गुंतागुंतीची मेंदूशस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. मेंदू आणि मणक्याचे सर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी सह्याद्री रुग्णालयात ही ‘न्यूरोव्हॅस्क्युलर सर्जरी’ आणि ‘मायक्रो व्हॅस्क्युलर डीकम्प्रेशन’ (एमव्हीडी) यांची एकत्रित शस्त्रक्रिया केली. ही महिला उपचारानंतर बरी होऊन आता मायदेशी परतली आहे.
सोसायटीधारक आणि समाविष्ट गावांतील पाणी समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी व आयुक्त शेखर सिंह यांची नुकतीच बैठक झाली. सोसायटीधारकांच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर पुण्यात बाहेरून बदलून आलेल्या १४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश तसेच आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी रात्री दिले. त्यानुसार एकुण २२ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणात लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.
काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 28, 2023
Marathi News Live Update : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर