Maharashtra Bfreaking News Today : एकीकडे देशातलं तापमान घटलेलं (उष्णतेची लाट नुकतीच ओसरली आहे.) असताना राज्यासह देशातलं राजकीय वातावरण मात्र तापू लागलं आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर हल्लाबोल होत आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने शिंदे गटातील आणि भाजपातील आमदारांमध्ये (ज्यांना मंत्रीपद मिळू शकतं) आनंदाचं वातावरण आहे. तर काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहे. त्याला देशभरातून विरोध होऊ लागला आहे. देशातल्या १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आज दिवसभरात यासबंधीच्या बातम्या पाहायला मिळू शकतात.

Live Updates

Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

20:16 (IST) 26 May 2023
ठाण्यात उद्यानांसह मैदानांची दुरावस्था; आमदार प्रताप सरनाईकांचे पालिका आयुक्तांना पत्र

ठाणे: महापालिका क्षेत्रात उद्यानांच्या उद्घाटनानंतर दोन ते तीन महिन्यातच त्याची दुरावस्था होत असून या उद्यानांची यादीच मांडत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर टिका केली आहे.

सविस्तर वाचा...

20:16 (IST) 26 May 2023
वंडर्स पार्कमधील दिव्यांच्या तपासणीसाठी अभियंत्यांची बॅंकॉक वारी; वंडर्स पार्कमधील विद्युत कामे पूर्ण झाल्यावर कसली तपासणी ?

नवी मुंबई: नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण आहे.

सविस्तर वाचा...

18:33 (IST) 26 May 2023
राज्यातील ‘आरटीओ’ कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्डचा तुटवडा? वाहन मालक, चालकांच्या कार्यालयात चकरा

कल्याण: राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये मागील काही महिन्यांपासून स्मार्ट कार्ड, नवीन चालक परवाना दस्तऐवजांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा...

17:51 (IST) 26 May 2023
अस्वच्छ नालाप्रकरण: तीन अभियंत्यांना महानगरपालिकेची नोटीस; पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती

मुंबई: नालेसफाई पाहणी दौऱ्यादरम्यान मिलन सब-वे जवळील नाला अस्वच्छ असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते.

सविस्तर वाचा...

17:22 (IST) 26 May 2023
सांगली: महिलेचे अपहरण, दीड कोटी खंडणीची मागणी, ११ अटकेत

सांगली : आर्थिक वादातून एका महिलेचे अपहरण करून बेदम मारहाण करीत दीड कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार सांगलीत मध्यरात्री घडला असून पोलीसांनी या प्रकरणी सर्व ११ संशयितांना अटक केली असून न्यायालयाने या सर्वांना ३० मेअखेर पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा

17:15 (IST) 26 May 2023
पुणे: पोलिसी खाक्या दाखविताच २२ लाखांची रोकड लुटल्याचा बनाव 'असा' झाला उघड

पुणे: बांधकाम व्यावसायिकाने दिलेली २२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड नीलायम चित्रपटागृहाजवळ धमकावून लुटण्यात आल्याचा बनाव करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

सविस्तर वाचा

16:56 (IST) 26 May 2023
नागपूर: राज्यात ऑटोरिक्षा चालकांवर सुडबुद्धीने कारवाई, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचा आरोप; आक्षेप काय, वाचा सविस्तर…

नागपूर: मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाहतूक पोलीसांकडून मोबाईलद्वारे फोटो काढून ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांवर दंड आकारले जात आहे. बहुतांश वेळा ऑटोरिक्षा- टॅक्सी चालक- मालक यांची चूक नसताना सुड बुद्धीने कारवाई होते, आसा आरोप ऑटोरिक्षा चालक- मालक संघटना संयुक्त कृती समितीकडून केला गेला.

सविस्तर वाचा

16:55 (IST) 26 May 2023
नाशिक: तोतया पोलिसांकडून वृध्दाची लूट

नाशिक: तपासणीच्या नावाखाली दोन तोतया पोलिसांनी एका वृध्दास लुटल्याची घटना दिंडोरी रस्त्यावरील वाढणे कॉलनी भागात घडली. यावेळी वृध्दाची सोन्याची अंगठी संशयितांनी हातोहात लांबवली.

सविस्तर वाचा...

16:43 (IST) 26 May 2023
डोंबिवलीतील खड्डे, कचऱ्यावरुन नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

डोंबिवलीत प्रवेश करताना जागोजागी कचरा, खड्डे दिसले. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात पाणी, आरोग्य असे गंभीर प्रश्न आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पालक जिल्हा. डोंबिवली त्यांच्या सुपुत्राचा मतदारसंघ आहे. सविस्तर वाचा…

16:41 (IST) 26 May 2023
पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेच्या बिल्डरांना नोटीसा; बिल्डरांवरील कारवाईबाबत मात्र स्पष्टता नाही

पावसाळ्यात इमारत बांधकामासाठी खोदलेले खड्ड्यांमुळे दुर्घटना होऊन जिवितहानी होऊ नये तसेच उत्खनन केलेली माती रस्त्यावर पसरून अपघात होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने बिल्डरांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे.

सविस्तर वाचा…

16:39 (IST) 26 May 2023
"बिन बुडाचं अडगं कुणीकडही...", संजय राऊतांच्या 'त्या' टीकेला शहाजीबापू पाटलांचं उत्तर, म्हणाले, "बारक्या खुराड्यात..."

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. शिंदे गटाकडे मी पक्ष म्हणून पाहत नाही. शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्याचा खुराडा आहे. तो राजकीय पक्ष नाही. या कोंबड्या कधीही कापल्या जातील, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. याला आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले, “संजय राऊत हे एका बारक्या खुराड्यात बसले आहेत. आमचा पक्ष आहे, हे निवडणूक आयोगाने जाहीररित्या देशाला सांगितलं आहे. ‘बिन बुडाचं अडगं कुणीकडही घरंगळत महाराष्ट्रात हिंडतंय, ओरडतंय आणि अरडतंय,’ याला काहीही अर्थ नाही,” अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

16:30 (IST) 26 May 2023
नाशिक: घरगुती गिरणीच्या पट्ट्यात अडकून बालकाचा मृत्यू

नाशिक: घरगुती गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात ही घटना घडली.

सविस्तर वाचा...

16:30 (IST) 26 May 2023
मुंबई, नागपूरचा प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; २९, ३० मे रोजी सेवाग्राम एक्सप्रेस रद्द

नागपूर : ऐन उन्हाळ्यात रेल्वेगाड्या रद्द करण्याचा आणि विलंबाने चालवण्याचा रेल्वेने सपाटा लावला असून त्यामुळे प्रवासाचा नियोजित बेत रद्द करावा लागत असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे.२९, ३० मे रोजी सेवाग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 26 May 2023
वर्धा: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या समक्ष दिलेल्या हमीचा विसर पडला का?; अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल

वर्धा : आयटकप्रणित अंगणवाडी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत उतरले आहे. २८ मार्चला संघटना प्रतिनिधींची बैठक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या संसद भवनातील कक्षात झाली होती. त्यावेळी राज्य शासनाने विविध मागण्यांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात असल्याचे नमूद केले होते.

सविस्तर वाचा

16:10 (IST) 26 May 2023
वर्धा: सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्य; संतप्त नागरिकांची डॉक्टरांवर कारवाईची मागणी

वर्धा : हिंगणघाटलगत पिंपळगाव येथील सीमा मेश्राम या महिलेस सर्पदंश झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राथमिक उपचार करण्याची मागणी केली. मात्र ती धुडकावून लावत येथील डॉक्टरांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्याच्या सल्ला दिला.

सविस्तर वाचा

16:09 (IST) 26 May 2023
चित्त्याच्या शोधात ‘ते’ बाहेर पडले अन् गावकऱ्यांचा मार खाऊन परतले; गावात चोर शिरल्याचे समजून गस्तीपथकावर हल्ला

नागपूर: मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांना त्यांची सीमा माहिती नाही, त्यामुळे आता एक-एक करुन चित्ते उद्यानाची सीमा पार करुन बाहेर पडत आहेत.

सविस्तर वाचा...

16:01 (IST) 26 May 2023
गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्राच्या नेतृत्वात २ नगराध्यक्षांसह १५ नगरसेवक शिंदे गटात

गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठे खिंडार पडले असून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांचे सुपुत्र सुगत मनोहर चांद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव नगर पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही नगराध्यक्ष आणि १५ नगरसेवकांनी आज, शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.

वाचा सविस्तर...

15:43 (IST) 26 May 2023
गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्राच्या नेतृत्वात २ नगराध्यक्षांसह १५ नगरसेवक शिंदे गटात

गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठे खिंडार पडले असून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांचे सुपुत्र सुगत मनोहर चांद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव नगर पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही नगराध्यक्ष आणि १५ नगरसेवकांनी आज, शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.

सविस्तर वाचा

15:19 (IST) 26 May 2023
गोंदिया: टिप्परची स्कुटीला धडक; शिक्षिकेचा घटनास्थळीच मृत्यू

गोंदिया : तिरोडा येथील शहीद मिश्रा शाळेजवळ आज, शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास वाळू भरलेल्या टिप्परच्या धडकेत स्कुटीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. योगिनी प्रभुराज कुंभलकर (५२) वर्ष असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.कुंभलकर आपल्या स्कुटीने जात असताना अचानक त्यांचा तोल गेला.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 26 May 2023
बदलापूरः पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव, मध्यरात्री आणि पहाटेही वीज गायब झाल्याने नागरिक घामाघुम

बदलापूरः शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस येताच वीज गायब झाली. त्यामुळे बाहेर पाऊस आणि घरात नागरिक घामाघुम अशी परिस्थिती होती. त्यापूर्वी गुरूवारी मध्यरात्री दोन वेळा बदलापूर पश्चिमेतील बहुतांश भागात वीज गायब झाली होती.

सविस्तर वाचा

14:44 (IST) 26 May 2023
मुंबई: रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक; १.१५ लाख रुपयांचे तीन लॅपटॉप हस्तगत

मुंबई: उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, रेल्वे पोलिसांनी या चोरांवर करडी नजर ठेवली.

सविस्तर वाचा...

14:44 (IST) 26 May 2023
डोंबिवलीत पाथर्ली नाक्यावरील विवाह मंडपाचा वाहतुकीला अडथळा, एक महिन्यापासून मंडप रस्त्यावर

डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली नाक्यावर मशाल स्मृति स्थळाच्या बाजुला मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर स्थानिकांनी गेल्या एक महिन्यापासून लग्नाचा मांडप टाकून ठेवला आहे. पाथर्ली नाक्यावर वाहन कोंडी झाली, अवजड वाहन या भागातून जात असेल तर हमखास लग्नाच्या मंडपाजवळ वाहन कोंडीत अडकून पडतात. सविस्तर वाचा…

14:42 (IST) 26 May 2023
दही, अमूल ते आकाशवाणी…

देशपातळीवर हिंदीचा जास्तीत जास्त वापर करण्यावर केंद्रातील भाजप सरकारने भर दिला असतानाच नीट परीक्षेपासून दही ते आकाशवाणी अशा नामकरणाला विरोध करीत तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकप्रमाणेच अन्य प्रादेशिक पक्षांनी हिंदी लादण्याच्या प्रयत्नांना कडवा विरोध केला आहे. सविस्तर वाचा…

14:40 (IST) 26 May 2023
पिंपरी: मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगून एकाने केली शैक्षणिक संस्थाचालकांची, पालकांची फसवणूक

मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याचे सांगत शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थाचालकांना दूरध्वनी करून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या बहाण्याने पालकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. सविस्तर वाचा…

14:39 (IST) 26 May 2023
कधी येणार पाऊस, जूनमध्ये किती पडणार पाऊस? हवामान विभागाने वर्तवला अंदाज…

नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून काळात सरासरीइतक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

14:21 (IST) 26 May 2023
शिंदे गटाचा लोकसभा निवडणुकीत २२ जागांवर दावा, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. त्यात शिंदे गट २२ जागांवर दावा करेल, असं खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. याबाबत विचारणा केली असता भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. आम्ही खूप समन्वय ठेऊन काम करतो. शिवसेना-भाजपा युतीत समन्वयाने काम होईल. आमच्या सर्व गोष्टी निश्चित होतील तेव्हा माध्यमांना याची माहिती देऊ.”

14:21 (IST) 26 May 2023
मुंबई: शिक्षिकेविरोधात अश्लील टिप्पणी करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : शिक्षिकेचे छायाचित्र काढून तिच्याबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या शाळेतील कर्माचाऱ्याविरोधात नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तक्रारदार ४४ वर्षीय महिला भायखळा येथील शाळेत शिक्षिका म्हणून काम करते.

सविस्तर वाचा

14:01 (IST) 26 May 2023
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्राला दुचाकींचा वेढा

डोंबिवली: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्राच्या बाहेर प्रवासी मार्गिकेत दुतर्फा प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे आरक्षण केंद्रात जाताना कसरत करावी लागते.

सविस्तर वाचा...

13:54 (IST) 26 May 2023
कल्याणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बीडच्या लष्करी जवानाचा महिला पोलिसावर बलात्कार

कल्याण- इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका लष्करी जवानाने कल्याण मध्ये राहून मुंबई पोलीस दलात नोकरी करत असलेल्या एका ३० वर्षाच्या महिला पोलिसा बरोबर ओळखल वाढवली. या महिलेला लग्न करण्याचे वचन या लष्करी जवानाने दिले.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 26 May 2023
वाशीम: बारावीच्या परीक्षेत राज्यभरातील १ लाख २३ हजार ९०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण

वाशीम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेसाठी राज्यभरातील १४,१२,१९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

सविस्तर वाचा

Uddhav Thackeray

“…तर लोकशाही काय चाटायची आहे?” नव्या संसदेच्या उद्घाटनावरुन ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका

नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. या मुद्द्यावरुन काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी २८ मे रोजी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर दररोज टीका केली जाते आहे. ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातूनही आज मोदींना खडे बोल सुनावले आहेत. जर विरोधकांच्या भूमिकेला महत्त्वच नसेल तर लोकशाही काय चाटायची आहे का? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे. तसंच राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेलं नाही किमान आडवाणींसाठी तरी एक कोपरा आहे का? असा खोचक प्रश्नही विचारण्यात आला आहे.

Story img Loader