Maharashtra Bfreaking News Today : एकीकडे देशातलं तापमान घटलेलं (उष्णतेची लाट नुकतीच ओसरली आहे.) असताना राज्यासह देशातलं राजकीय वातावरण मात्र तापू लागलं आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर हल्लाबोल होत आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने शिंदे गटातील आणि भाजपातील आमदारांमध्ये (ज्यांना मंत्रीपद मिळू शकतं) आनंदाचं वातावरण आहे. तर काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहे. त्याला देशभरातून विरोध होऊ लागला आहे. देशातल्या १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आज दिवसभरात यासबंधीच्या बातम्या पाहायला मिळू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
पुणे : पिंपरी चिंचवडवरून भुसावळच्या दिशेने जाणार्या शिवशाही बसचा संगमवाडी पुलावर ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. ती बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली.
पुणे: अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांनी आता ऑनलाइन विक्री सुरू केली असून अमली पदार्थाची घरपोहोच ऑनलाइन डिलिव्हरी केली जात आहे. पुणे पोलिसांनी ऑनलाइन अमली पदार्थांची विक्री उघडकीस आणली आहे.
बुलढाणा: मंगल वाद्यांचा निनाद, सेवाधारीसह वारकऱ्यांनी टाळ वर दिलेली संगत, हजारो भाविकांच्या मुखातून होणारा संत- विठुमाऊली अन गजानन महाराजांचा जयघोष अश्या राजवैभवी थाटात अन पारंपरिक दिमाखात शेगावच्या पालखीने आषाढी वारी साठी पंढरपूरकडे कूच केली.
नागपूर: वर्धा मार्गावरील चिंचभुवन टपाल कार्यालयात येणा-या ग्राहकांना इंटरनेट बंद असल्याचे सांगून तेथील कर्मचारी परत पाठवत आहे. शुक्रवारीही असाच प्रकार घडला.टपाल कार्यालय फक्त टपाल तिकीट खरेदी विक्री किंवा मनीऑर्डर करण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही तर तेथे बॅंकिंग व्यवहारही होत असल्याने गर्दी होते.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय व दंत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, मागण्या व अडचणींबाबत अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे व सबंधित अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे रुग्णालयात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
वाशीम : समृध्दी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाजवळ चारचाकी गाडीच्या घडकेत एक नीलगाय व चारचाकी गाडीतील तीन जण गंभीर जखमी झाले.
पिंपरी- चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी विशाल माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मुंबईः अंधेरी चार बंगला येथील १४ वर्षांच्या मुलीला इन्स्टाग्रामवरून, तसेच उद्ववाहनातून जाता-येताना वारंवार त्रास देणाऱ्या २४ वर्षीय सुरक्षा रक्षकाला वर्सोवा पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपी २०२१ पासून पीडित मुलीला त्रास देत होता.
नव्या संसदेच्या उद्घानटावरुनही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना या सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे हे मोदींनी समोर येऊन सांगावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियात लोकशाही आहे, पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पाय धरले याचे कसले गोडवे गात आहात? असाही सवालही संजय राऊत यांनी केला आहे. आम्हीच निर्णय घेणार, आम्हीच ठरवणार, राष्ट्रपती कोण? सरन्यायाधीश कोण? आम्हीच सार्वभौम या मानसिकतेतून हे घडतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शुक्रवारी सकाळी ११ साडे अकरा वाजता उरण मधील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे प्रचंड उष्म्यात काही कालावधीत वातावरणात मातीचा सुगंध पसरला होता. या बदलेल्या वातावरणामुळे तात्पुरते समाधान मिळालं मात्र काही क्षणातच पुन्हा एकदा उकाड्याला सुरुवात झाली आहे. सविस्तर वाचा…
डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली नाक्यावर मशाल स्मृति स्थळाच्या बाजुला मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर स्थानिकांनी गेल्या एक महिन्यापासून लग्नाचा मांडप टाकून ठेवला आहे. पाथर्ली नाक्यावर वाहन कोंडी झाली, अवजड वाहन या भागातून जात असेल तर हमखास लग्नाच्या मंडपाजवळ वाहन कोंडीत अडकून पडतात. सविस्तर वाचा…

पुणे: विवाहाच्या आमिषाने नेपाळमधील एका युवतीला तरुणाने पळवून पुण्यात आणले. युवतीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केले. युवतीच्या भावाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तो नेपाळहून पुण्यात आला आणि एका सामाजिक संस्थेला याबाबतची माहिती दिली.
आशिष देशमुख म्हणाले, मला काँग्रेसमधून काढून टाकलं जाईल अशी अपेक्षा नव्हती. परंतु आता मी लोकांशी बोलून, कार्यकर्त्यांशी बोलून, जनतेचा कौल पाहून मी पुढचा निर्णय घेईन. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मी थोड्या मतांनी हरलो. २०१४ मध्ये मी राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांचा पराभव केला. २०१९ मध्ये मी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांना कडवी झुंज दिली. आता मी जनतेशी बोलून माझी राजकीय भूमिका ठरवेन. संपूर्ण विदर्भाचं व्यापक हित डोळ्यासमोऱ ठेवून मी निर्णय घेईन
मुंबईः चोर असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली पूर्व येथे गुरूवारी पहाटे घडली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
भंडारा : तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील अर्चना माणिक राऊत (२३) ही तरुणी चार वर्षांपूर्वी हरवली असल्याची तक्रार होती. तिचा खून करणारे तीन आरोपी अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा व गोबरवाही पोलिसांनी संयुक्तरित्या केली.
महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम गुरुवारी सायंकाळी ७ वाजता पूर्ण होऊन चाचणीही यशस्वी झाली. त्यामुळे गुरुवारी रात्री दक्षिण नागपुरात भारनियमन झाले नाही. थोडीफार वीज खंडित झाली असली तरी भारनियमन बंद झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा…
नागपूर: पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे.
गडचिरोली : विरोधात आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना घरी जाऊन धमकी देणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा झेंडा फडकला आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांची तर, उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. सविस्तर वाचा…
नागपूर : नागपूर ते नागभीड रेल्वेमार्गाचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराने गौण खनिजाचे उत्खनन केल्यामुळे तेथे मोठा खड्डा तयार झाला. या खड्ड्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कामठी तालुक्यातील मौजा आडका येथे गुरुवारी उघडकीस आली.
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या समर्थकांसह दिल्लीत दाखल झाल्याचे समजते.प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून वडेट्टीवार आणि केदार यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज आहेत.
सिडकोतील गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेऊन अंबड पोलिसांनी समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. नोंदीतील १२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून ५४ गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. सविस्तर वाचा…
नाशिक – देशात वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर स्थानिक संस्था कर बंद करण्यात आला. त्यास जवळपास सहा वर्षे लोटली. परंतु, या कराचे २०१३-१४ ते २०१७-१८ या काळातील विवरणपत्र सादर करून निर्धारण करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट, पूर्वमुक्त मार्ग – मरिन ड्राईव्ह भुयारी मार्ग (पोहच मार्ग) प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने या निविदेला तिसऱ्यांदा १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे.
मेट्रो स्थानकांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करुन सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने याबाबतचा अहवाल अखेर महामेट्रोला गुरूवारी सादर केला. या अहवालाला विलंब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सविस्तर वाचा…
पुणे : मध्य रेल्वेने मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात ८.१८ कोटी टन मालवाहतूक केली. यात सर्वाधिक वाटा खनिज कोळशाचा असून, सिमेंट दुसऱ्या स्थानी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मध्य रेल्वेने मालवाहतुकीचे ९ कोटी टनांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
चंद्रपूर : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू डोळ्यासमोर ठेवून या उत्सवाची सुरुवात केली त्या हेतूची जनजागृती करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये ‘रेलनीर’ या अधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जाते. परंतु, ऐन उन्हाळ्यात रेलनीरची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अखेर रेल्वेला इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्याची परवानगी देण्याची वेळ आली आहे.
शाळांना उन्हाळी सुटी असल्याने बालचमूंची पावले पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि नव्याने सुरू झालेल्या तारांगणकडे वळू लागली आहेत. दिवसाला पाचशेहून अधिक नागरिक या प्रकल्पांना भेटी देत आहेत. सविस्तर वाचा…
“…तर लोकशाही काय चाटायची आहे?” नव्या संसदेच्या उद्घाटनावरुन ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका
नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. या मुद्द्यावरुन काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी २८ मे रोजी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर दररोज टीका केली जाते आहे. ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातूनही आज मोदींना खडे बोल सुनावले आहेत. जर विरोधकांच्या भूमिकेला महत्त्वच नसेल तर लोकशाही काय चाटायची आहे का? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे. तसंच राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेलं नाही किमान आडवाणींसाठी तरी एक कोपरा आहे का? असा खोचक प्रश्नही विचारण्यात आला आहे.