Maharashtra Bfreaking News Today : एकीकडे देशातलं तापमान घटलेलं (उष्णतेची लाट नुकतीच ओसरली आहे.) असताना राज्यासह देशातलं राजकीय वातावरण मात्र तापू लागलं आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर हल्लाबोल होत आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने शिंदे गटातील आणि भाजपातील आमदारांमध्ये (ज्यांना मंत्रीपद मिळू शकतं) आनंदाचं वातावरण आहे. तर काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहे. त्याला देशभरातून विरोध होऊ लागला आहे. देशातल्या १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आज दिवसभरात यासबंधीच्या बातम्या पाहायला मिळू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

11:10 (IST) 26 May 2023
चंद्रपूर: खासदार धानोरकरांच्या मेहुण्याची ‘ईडी’ चौकशी; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली

चंद्रपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली आहे.

सविस्तर वाचा

10:55 (IST) 26 May 2023
म्हणून आपल्या कोणाच्या घरी ईडी-सीबीआयवाले आले नाहीत : कुमार केतर

खासदार कुमार केतकर म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या शपथा घेतल्या ते सगळे काँग्रेस पक्ष सोडून गेले. आपल्यापैकी कोणी सोडून गेलं नाही, आपल्या कोणाच्याही घरी ईडी, सीबीआयवाले आले नाहीत कारण आपण काही केलेलं नाही.

10:10 (IST) 26 May 2023
“नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे…”, ठाकरे गटाची नरेंद्र मोदी-अमित शाहांवर टीका

शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका केली आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, “नवे संसद भवन हे भारतीय संस्कृती आणि परंपरांशी आधुनिकतेची नाळ जोडणारी इमारत असून समृद्ध लोकशाहीचे प्रतीक असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांननी म्हटले. लोकशाहीवर या मंडळींनी बोलणे हा एक विनोद आहे. नवे संसद भवन हे काही एखाद्या पक्षाच्या मालकीचे नाही. नटवरलाल नावाच्या एका भामट्याने संसद, राष्ट्रपती भवन, ताजमहाल, इंडिया गेट बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे तसे हे नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करुन घेतले की काय? असाही प्रश्न सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.”

“…तर लोकशाही काय चाटायची आहे?” नव्या संसदेच्या उद्घाटनावरुन ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका

नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. या मुद्द्यावरुन काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी २८ मे रोजी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर दररोज टीका केली जाते आहे. ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातूनही आज मोदींना खडे बोल सुनावले आहेत. जर विरोधकांच्या भूमिकेला महत्त्वच नसेल तर लोकशाही काय चाटायची आहे का? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे. तसंच राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेलं नाही किमान आडवाणींसाठी तरी एक कोपरा आहे का? असा खोचक प्रश्नही विचारण्यात आला आहे.