Marathi Batmya, 02 December 2022 : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंद गटातील नेतेदेखील एकमेकांवर टीका करत आहेत. यासह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Mumbai Live News, 02 December 2022 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढवा एका क्लिकवर!
गुजरातच्या सीमावर्ती भागातील गावांसारखा विकास न केल्यास सुरगाणा तालुक्यातील सीमेलगतची गावे गुजरातला जोडावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी केली होती. मात्र या मतदारसंघाचे आमदार आपल्याच पक्षाचे असल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रवादीने सारवासारव केली असून गावित यांची ही मागणी व्यक्तीगत असून पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
‘सेट तयार झाला का,? अमूक कुठे आहे?, अशा प्रश्नांची विचारणा, त्या अनुषंगाने सुरू असलेली लगबग, उत्साह आणि धाकधूकही, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईर्षा पण तितकाच खिलाडूपणा आणि प्रतिस्पर्धी संघालाही मदत करण्याची तयारी… अशा वातावरणात, तरुणाईच्या जल्लोषात सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व ‘झी युवा’ आणि ‘टुगेदरिंग’ च्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरूवात शुक्रवारी नागपुरातून झाली.
नागपूरवरून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात बैठका व सभेच्या निमित्ताने जात असताना सुषमा अंधारे नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपनेते व मंत्री मंगलप्रसाद लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आदींनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत.
“राज्यपालांनी पश्चाताप व्यक्त केला. माझ्याकडून अवधनाने चुक झाली आहे, महाराष्ट्राला समजून घेण्यात मी कमी पडतोय “, असं राज्यपालांनी शिष्टमंडळासमोर म्हटल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
टिटवाळा रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी एका महिलेची लोकलच्या डब्यात प्रसूती झाली. कसाराकडून ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने धावत होती. टिटवाळा रेल्वे सुरक्षा बळ, स्थानक व्यवस्थापक, महिला रेल्वे पोलीस यांच्या प्रयत्नाने महिलेला तात्काळ टिटवाळ्यातील श्री सिध्दीविनायक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी आई, बाळ सुखरुप असल्याचे सांगितले.
घनकचरा व्यवस्थापनात सपशेल अपयशी ठरलेल्या अंबरनाथ नगरपालिकेकडून पुन्हा एकदा घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी होताना पाहायला मिळते आहे. सर्कस मैदानाच्या मागच्या बाजूस रेल्वे रूळाच्या जवळच कंत्राटदाराकडून कचऱ्याला आग लावली जात असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी लहान कचरा गाड्यांमधून मोठ्या कचरा गाड्यांमध्ये कचरा टाकला जाणे अपेक्षित आहे.
ठाकुर्ली मधील ९० फुटी रस्त्याने दुचाकीवरुन चाललेल्या आजोबा, नातवाच्या दुचाकीला गुरुवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या एका बुलेट चालकाने जोरदार ठोकर दिली. दुचाकीवरील आजोबा, नातू बुलटेच्या धडकेने दुचाकीसह रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. या दोन्ही जखमींना मदत करण्याऐवजी बुलेट चालक पळून गेला. पादचाऱ्यांनी मदत करुन आजोबा, नातवाला रुग्णालयात दाखल केले.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशलीटी रुग्णालय उभारण्यात येणार असून या रुग्णालयाच्या नुतनीकरण कामात एकूण ७१ पैकी ४७ वृक्षांचा अडथळा निर्माण होत असल्याने त्यांचे पुर्नरोपण करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
शहापूर, मुरबाड तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी १० हून अधिक हमीभाव भात खरेदी केंद्र आहेत. कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकही हमीभाव भात खरेदी केंद्र नव्हते. कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन चवरे सेवा सोसायटी आणि आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने कल्याण तालुक्यातील शासनाचे पहिले हमीभाव भात खरेदी केंद्र मामणोली येथे सुरू करण्यात आले आहे.
पनवेल व नवी मुंबई खाडीपात्रात कांदळवनांची कत्तल करुन अवैध वाळुउपसा राजरोस सूरु असून वेळोवेळी कारवाईनंतर वाळुमाफीया मोकाट असल्याची ओरड केली जात होती. याबद्दल रायगड जिल्हाधिका-यांनी अप्पर जिल्हाधिकारी व पनवेलच्या तहसिलदारांना ठोस कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत रात्रीच्या काळोखात १० विविध बार्ज सरकारी यंत्रणेच्या हाती लागले.
करोना नंतर गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोवरच्या साथीमुळे सध्या नागरिकां समोर नवीन संकट आले आहे. ही साथ पसरू नये या करीता आरोग्य विभागाकडून विविध उपायोजना आणि उपक्रम राबविले जात आहेत.
संजय मुनीलाल वर्मा (५१, रा. मंगेशी पॅरेडाईस, मोहने रोड, कल्याण) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. संजय यांना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन जुळणी आली. ऑनलाईन पडताळणी असल्याचे भासवून ही जुळणी स्टेट बँकेने पाठविली आहे अशी व्यवस्था जुळणीत भामट्याने केली होती.
जिल्ह्यातील सर्वच शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची सात उंची वाढविण्यात आली असून या प्रकल्पात बाधित झालेले २८ पैकी २३ प्रकल्पग्रस्त ठाणे महापालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. तर उर्वरित पाच जण तांत्रिक कारणामुळे प्रतीक्षा यादीत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
एड्स नियंत्रण कार्यक्रमातून कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव भागातील एकूण १८ नागरी आरोग्य केंद्रांवर वर्षातून दोन वेळा आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते. या शिबीरातून काही नागरिकांमध्ये एड्स सदृश्य लक्षणे दिसून येतात. या नागरिकांच्या अत्यावश्यक तपासण्या करुन त्यांच्यावर तातडीने पालिकेकडून उपचार सुरू केले जातात.
जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये उपस्थिती वाढवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी, पीएच.डी. संशोधक आणि शिक्षकांवर दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १२०० रुपये आणि इतरांना २००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई या मार्गाने प्रवास करणारी वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा जनावरांना धडकली आहे. उदवाडा आणि वापी रेल्वेस्थानकदारम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात वंदे भारत एक्स्प्रेच्या समोरच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघाताची ही चौथी वेळ आहे. गुरुवारी (१ डिसेंबर) संध्याकाळी ही घटना घडली. वाचा सविस्तर
सध्या जिह्यात मुक्कामी असलेल्या रानटी हत्तींचा व्हीडिओ काढण्याचा मोह काही उपद्रवी तरुणांना आवरला नाही. मात्र, व्हीडिओ काढताना हत्तीच्या जवळ गेलेल्या या तरुणांना एका महाकाय गजराजाने चांगलीच अद्दल घडवली. तरुणांनी पळ काढून कसाबसा स्वतःचा जीव वाचविला. वनविभागाकडून वारंवार सूचना देऊनही अशाप्रकारे हत्तींच्याजवळ जाणे जीवावर बेतू शकते.
धूम स्टाईलने दुचाकी चालविणा-या दुचाकीचालकांना पनवेल वाहतूक पोलीसांनी चांगलाच धक्का दिला आहे. प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करुन दुचाकीचा कर्णकर्कश आवाज करणा-यांवर कारवाई करुन पोलीस थांबले नाहीत. तर ४७ दुचाकींचे कारवाईनंतर जमा केलेले सायलेन्सरच पोलीसांनी भर चौकात शुक्रवारी नष्ट केले.
मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. खासदार छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयन राजे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता श्रीमंत राजे भोसले यांनीही लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजप नेते नितीन गडकरी हे नागपूरकर असले तरी राष्ट्रीय नेते आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीची सर्वच पातळीवर नोंद घेतली गेली. गृहशहर नागपूरवर त्यांचे विशेष प्रेम. त्यामुळेच अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम ते नागपूरकरांसाठी आयोजित करतात. खासदार सांस्कृतिक महोत्सव हा त्यापैकीच एक.
महापालिका शाळेत दोन मुलांनी तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार, धमकावणे व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
सहा क्रमांकाच्या फलाटातून प्रवेशास मनाई असल्याने प्रवाशांना थेट हिंदमाता येथील महानगरपालिकेच्या पुलाचा वापर करून सहा क्रमांकाच्या फलाटात येऊन सीएसएमटीला जाणाऱ्या जलद लोकल पकडता येणार आहेत. मधला मोठा पादचारी पूल केवळ लोकल आणि मेल एक्स्प्रेसने स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्व-पश्चिममेकडे शहर हद्दीत जाण्याकरिता तसेच दादर मध्य रेल्वेवरील एका फलाटातून पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या फलाटात जाण्याकरिता खुला राहणार आहे.
मागील आठवड्यात देशाची राजधानी दिल्लीतील जामा मशिदीने महिलांच्या प्रवेशावर निर्बंध घातले. हा निर्णय घेताना मशीद प्रशासनाने काही महिला मशिदीत येऊन व्हिडीओ शूट करतात आणि प्रार्थनास्थळाचं पावित्र्य राखत नाहीत, असा आरोप केला. तसेच हे निर्बंध या कृती रोखण्यासाठी असल्याचा युक्तिवाद मशिदीच्या प्रवक्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास बंदी घालता येते का? कुराण याबाबत काय सांगतं? संविधानात महिलांच्या अधिकाराबाबत काय तरदुती आहेत याचा हा आढावा…
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आर्थिक मागास वर्गात समाविष्ट करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या १११ स्थापत्य अभियंत्यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. विशेष म्हणजे नरिमन पॉईंट येथे गुरुवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थळ-काळानुरूप पाण्याच्या उपलब्धतेबाबत शाश्वती राहिलेली नाही. अतिवृष्टी आणि दुष्काळ यासारख्या टोकाच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्याचे प्रत्यंतर पाहायला मिळत आहे. कृषी, उद्योग, ऊर्जा, पर्यावरण आणि पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाण्याची उपलब्धता अनिश्चित झाल्यास या घटकांना मागणीनुसार पाणी पुरवण्यावर मर्यादा येणार आहेत. परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा परिस्थितीत पाण्यावर अवलंबून असलेले उद्योग, व्यवसाय आणि सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी नुकताच संपूर्ण देशासाठीचा २०२२ चा वास्तविक भूजल स्रोत मूल्यांकन अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार देशासाठी एकूण वार्षिक भूजल पुनर्भरण ४३७ अब्ज घनमीटरहून अधिक आहे, तर देशाचा वार्षिक भूजल उपसा २३९ अब्ज घनमीटरहून अधिक आहे. देशातील एकंदर ७०८९ मूल्यांकन एककांपैकी १००६ एककांचे अतिशोषित म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. हे मूल्यांकन केंद्रीय भूजल मंडळ, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संयुक्तपणे केले आहे. सन २००४ नंतर भूजल उपशात सातत्याने वाढ होत होती. यंदा प्रथमच भूजल उपसा आधीच्या वर्षांपेक्षा कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे राज्यात सध्या पुन्हा हलका गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत पुन्हा काही प्रमाणात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढला होता.
शहरातील १९ ठिकाणे जीवघेणी असून नगर रस्ता, कात्रज, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग, हडपसर भागात सर्वाधिक अपघात घडले आहेत. नोव्हेंबर महिना अखेरीपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओडिशामधून स्थलांतरित हत्तींच्या समूहाने पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. आतापर्यंत दोघांचे प्राण गेले आहेत. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने हत्तींना नियंत्रित करण्यात वनविभागही हतबल ठरला. त्यामुळे जंगलात किंवा त्यालगत राहणाऱ्या गावांमधील नागरिक दहशतीत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. “आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात,” असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना टोला लगावला. ते अहमदाबादमधील भाजपा मीडिया सेंटरमध्ये बोलत होते. त्यांनी स्वतः गुरुवारी (१ नोव्हेंबर) याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.
सध्या फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा थरार सुरू आहे. कतारमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक संघ पूर्ण ताकदीनीशी प्रयत्न करत आहे. मात्र स्पर्धेच्या १३ व्या दिवशी जपानच्या विजयामुळे जर्मनीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. जपानने स्पेनच्या संघाचा २-१ ने पराभव केल्यामुळे जर्मनीचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे. वाचा सविस्तर