Marathi Batmya, 02 December 2022 : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंद गटातील नेतेदेखील एकमेकांवर टीका करत आहेत. यासह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Live News, 02 December 2022 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढवा एका क्लिकवर!

11:11 (IST) 2 Dec 2022
कुख्यात दहशतवादी, लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

कुख्यात दहशतवादी आणि पंजाबमधील लुधियाना कोर्ट स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. एनआयएने दिल्लीच्या विमानतळावर ही कारवाई केली आहे. अद्याप या दहशतवाद्याचे नाव समोर आलेले नाही. २३ डिसेंबर २०२१ रोजी लुधियाना कोर्टात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. वाचा सविस्तर

11:11 (IST) 2 Dec 2022
“हिंदू कधीही दंगलीत…”, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी लव्ह जिहाद, दंगल यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. हिंदू धर्मीय कधीही दंगलीत सामील होत नाहीत. हिंदू शांतताप्रिय आहेत, असे सोरेन म्हणाले आहेत. ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलत होते. विशेष म्हणजेय यावेळी त्यांनी श्रद्धा वालवकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला, गुजरात दंगल यावरही भाष्य केले. वाचा सविस्तर

11:10 (IST) 2 Dec 2022
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी ब्रारला अटक

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेतलेला मुख्य आरोपी गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियात अटक करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांना याबाबतची माहिती मिळाल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर

11:09 (IST) 2 Dec 2022
“राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा…”, अजित पवारांचं मनसेप्रमुखांवर टीकास्र

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरेंनी शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. वाचा सविस्तर