Mumbai Maharashtra News Updates, 06 September 2024 : राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे सध्या राज्यभरात सुरु आहेत. तर महायुतीचे नेते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून सरकारमधील नेते राज्यव्यापी दौरे करत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील वेगवेगळ्या यात्रा सुरू केल्या आहेत. यातच काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. यासह सर्व राजकीय घडामोडींवर आपलं या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल. याबरोबरच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तर चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील आणि देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी येथे जाणून घ्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today, 06 September 2024
महाराष्ट्रातील ओबीसी मुला मुलींचे ७२ वसतिगृह सुरू करावे, यासाठी ओबीसी युवा अधिकार मंचने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागपूर : जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात. ४० वर्षांपूर्वी घडली होती. ही घटना हजारो नागरिकांसाठीच नव्हे तर प्रत्येक सजीवासाठी धक्कादायक ठरली होती
नागपूर : भारतीय रेल्वेच्या ६ हजार ११२ स्थानकांवर ‘वाय-फाय’सेवा पुरवत असलेल्या कंपनीकडे जगातील सर्वांत मोठे नेटवर्क आहे. ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
धमकी दिल्यास खंडणीखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) ते १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण २४ तास मेट्रोची सेवा अखंड सुरू राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पाठविला आहे.
नागपूर : सप्टेंबरच्या मध्यान्हानंतर मान्सूनच्या परतीचे वेध लागतात. मात्र, महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने पाऊस धुमाकूळ घालत आहे.
नागपूर : मागील काही वर्षात देशामध्ये नक्षलवादाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. मात्र समाजमाध्यमाच्या माध्यमातून नक्षलवादी विचारसरणीचा अनेक लोक समर्थन करतात तसेच प्रचार करतात.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपाच्या प्रचाराच्या योजनेबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्र भाजपाने राज्यात महायुतीच्या विजयासाठी २१ नेत्यांची टीम तयार केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते काम करतील. मग यामध्ये केंद्रीय मंत्रीही या निवडणुकीत आपला वेळ देतील. आम्ही लोकसभा निवडणुकीतून शिकून पुढे जाऊ आणि आगामी निवडणुका जिंकू”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
#watch | Nagpur: On Maharashtra BJP's campaign for the upcoming Assembly elections, state's BJP chief Chandrashekhar Bawankule says, "Maharashtra BJP has constituted a team of 21 leaders for the victory of Mahayuti alliance in the state. Under the leadership of Dy CM Devendra… pic.twitter.com/bMS8P6kJzg
— ANI (@ANI) September 6, 2024
नागपूर: राज्य सरकारने जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात मोठी घोषणा केली असून त्याचे पालन न केल्यास प्रवेश रद्द होईल अशी तंबी दिली आहे.
गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहे, याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला.
कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे मोटारीने दिलेल्या अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला.
नागपूर : भाजपचे नागपूर जिल्हा प्रभारी व मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे भाजप पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या सोडतीच्या निकालाची तारीख अखेर म्हाडाने जाहीर केली आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे.
मुंबई : एखाद्या समाजातील नागरिकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे म्हणून तो समाज मागास आहे, असे म्हणता येणार नाही. शिवाय, आत्महत्या आणि आरक्षण देण्याचा संबंध नाही, असा दावा मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांतर्फे गुरूवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.
मुंबई : लहान मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत पीडित मुलांचा जबाब महानगरदंडाधिकाऱ्यांनी घटनेनंतर लगेचच नोंदवणे अनिवार्य आहे. असे असतानाही महानगरदंडाधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला हे असे जबाब नोंदवण्यासाठी विशिष्ट तारखा दिल्या जात असल्याची बाब उघड झाल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रथेबाबत गुरूवारी संताप व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवरच आता विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळू शकते का? यावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “आम्ही बारामती विधानसभेच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येथील निर्णय आम्ही शरद पवार यांच्यावर सोडणार आहोत. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
गणेशोत्सवाच्या अकरा दिवसाच्या कालवधीत गणपती विसर्जन मिरवणुका येथील दुर्गाडी किल्ला गणेशघाट भागात निघणार आहेत.
पुणे : शहर परिसरात छुप्या पद्धतीने बेकायदा सुरू असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने कात्रज – कोंढवा रस्त्यावर दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला. त्यातून पोलिसांनी एक लाख ५७ हजारांची दीड हजार लिटर गावठी दारू (४५ कॅन) जप्त केली. तर, चालकाला अटक केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून होणार्या कारवायामुळे शहरात बेकायदा व्यावसायिक सक्रीय असल्याचे दिसून आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने लढवलेल्या २६ जागांवर छत्तीसगडमधून कुमक मागविण्यात आली असली तरी अजित पवार यांच्याबरोबरच्या युतीमुळे या वेळी भाजपला पाच जागाचे जागा कमी लढाव्या लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याण : घरात मुलीची आई नाही पाहून वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीसमोर रात्रीच्या वेळेत नग्न होऊन अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला.
वर्धा: आगामी विधानसभा निवडणुकीत मोर्चेबांधणी करण्यात महाविकास आघाडी सरसावली आहे. जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चारही मतदारसंघवार काँग्रेसने दावा ठोकला.
“महायुतीमध्ये अजित पवारांनी आतापर्यंत कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत. आता या आठवड्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. तसेच निवडणुकीनंतर मु्ख्यमंत्रिपदाबाबत ठरेल. आम्ही त्याबाबत आता काहीही ठरवलेलं नाही. मात्र, एक नक्की आहे की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवाव्या लागत असतात. महायुतीमध्ये मु्ख्यमंत्रिपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निवडणुकीनंतर मु्ख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल”, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रोडकरी, पुलकरी म्हटले जाते. त्यांचा त्याच्या क्षेत्रात कामाचा दबदबा आहे. विरोधकही ही बाब मान्य करते. परंतु त्यांच्याच परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या महामार्गांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पामुळे देशाला सुमारे एक लाख कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा अहवाल ‘कॅग’ने दिला आहे, असा दावा करत याप्रकरणाची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
बदलापूरः बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर पुन्हा मोठ्या संख्येने खड्डे पडले असून त्यामुळे शहरातील विविध मंडळे आणि घरगुती गणपतींचे आगमन या खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या कोंडीतूनच होणार आहे.
ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागासह ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे गेल्या एक ते दोन वर्षांपासून तीनतेरा वाजल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा येथे शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी उड्डाणपूलाच्या सुरूवातीला असलेल्या कठड्याला धडकली.
“आम्ही ज्यावेळी महायुतीत चर्चा करण्यासाठी बसलो तेव्हा कोण किती जागांवर निवडणूक लढेल यावर कोणतीही चर्चा झाली नाही. आमचं सर्वांचं एकच मत आहे की, जिंकण्यासाठी लढलं पाहिजे. पुढचे पाच वर्ष केंद्रातील योजना आणि महाराष्ट्रातील योजनांच्या माध्यमातून राज्य पुढे जावे. मध्यमवर्गीयांचं कल्याण व्हावं यासाठी महायुतीचं सरकार हवं आहे हे आमचं ठरलं आहे. आम्ही एक पाऊल मागे येऊ, पण जिंकण्यासाठी आम्ही निवडणूक लढवू”, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कंपाऊंडनजीकच्या टाईम्स टॉवरला शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे.