Mumbai Maharashtra News Updates : राज्यात आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार? महायुती आणि महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आणि लहान भाऊ याकडे सर्वांचं लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महायुतीची खलबतं झाल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. परंतु, या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. दुसरीकडे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसंच, मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण यावरूनही वाद सुरू झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण मिळालं तर ओबीसींचं आरक्षण जाणार का? या चर्चेलाही जोर आला आहे. दरम्यान, राज्यातील वातावरणही बदलत जात आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडला असून पेरण्यांना सुरुवात झाली आहे. यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

11:25 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : शिवसेना खासदार रवींद्र वायकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कोणत्या विषयावर झाली चर्चा?

मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले रवींद्र वायकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.

11:21 (IST) 18 Jun 2024
‘पारिजात फुलला दारी, फुले का पडती शेजारी?’, काँग्रेसच्या यशावर उद्धव ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगंल यश मिळालं. लोकसभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीला महाराष्ट्रात भविष्य असल्याचं राजकीय वर्तुळातून म्हटलं जातंय. दरम्यान, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. परंतु, काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. यावरून ठाकरे गटावर सातत्याने टीका केली जातेय. या टीकेवर उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शनिवारी (१५ जून) झालेल्या पत्रकार परिषदेत तायंनी माणिक वर्मा यांच्या कवितेतून विरोधकांवर निशाणा साधला.

वाचा सविस्तर

11:20 (IST) 18 Jun 2024
आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

महाराष्ट्रातील मिंधे गँग, भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी यातून अनेकजण बाहेर पडतील असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरेंनी केलं आहे. सध्याचं सरकार सहा महिन्यांचं आहे. नोव्हेंबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. निवडणूक म्हणजे नांदी आहे. लोकसभा निवडणुकीत काय झालं ते आपण पाहिलं. आता खासदारांप्रमाणेच आमदार विजयी करुन आपल्याला मेळावा साजरा करायचा आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

सविस्तर वृत्त

11:17 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : “एकनाथ शिंदेंना शह देण्याकरता अजित पवारांना घेतलं”, बच्चू कडूंची भाजापवर टीका

एकनाथ शिंदेंना घेतल्यानंतर युतीचं सरकार सुरळीत चालू होतं. परंतु, शिंदेंना शह देण्याकरता तुम्ही अजित दादांना घेतलं आणि अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला. अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही – बच्चू कड

10:07 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : “काँग्रेस का हाथ किसके साथ?” भाजपाचा सवाल

10:03 (IST) 18 Jun 2024
चंद्रपूर : धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने केली मारहाण

चंद्रपूर : महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्याने याबाबत घुग्घुस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. सुरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मारहाण करणारा नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर हा भाजप पक्षाचा पदाधिकारी आहे.

सविस्तर वृत्त वाचा

10:02 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : वायव्य मुंबईतील निकालाची जगभर चर्चा; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल हा जगभर गाजतो आहे. यातूनच ‘टेस्ला’चे इलॉन मस्क यांनीही संशय व्यक्त केला आहे, अशी टिप्पणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. मतमोजणीच्या १९व्या फेरीनंतर मते का जाहीर करण्यात आली नाहीत, असा सवालही शिवसेनेने केला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

10:01 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : “विठ्ठलाच्या नावाने दरोडा”, महाआरोग्य शिबीराचा खर्च मांडत जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप

विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी दरवर्षी आषाढीच्या आधी वारीला निघतात. या वारीत एक वेगळाच उत्साह असतो. वारीत सगळे एकमेकांना माऊली असंही संबोधतात. वारीतल्या या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारने महाआरोग्य शिबीरं आयोजित केली आहेत. मात्र ही शिबीरं नसून विठ्ठलाच्या नावाने दरोडा आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

सविस्तर वृत्त वाचा

10:00 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य, “भाजपा, मिंधे गँग आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अनेकजण..”

महाराष्ट्रातील मिंधे गँग, भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी यातून अनेकजण बाहेर पडतील असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरेंनी केलं आहे. सध्याचं सरकार सहा महिन्यांचं आहे. नोव्हेंबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. निवडणूक म्हणजे नांदी आहे. लोकसभा निवडणुकीत काय झालं ते आपण पाहिलं. आता खासदारांप्रमाणेच आमदार विजयी करुन आपल्याला मेळावा साजरा करायचा आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

सविस्तर वाचा

09:59 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : “ओबीसींचं शिष्टमंडळ सरकारला भेटणार नाही”, लक्ष्मण हाकेंनी केलं स्पष्ट!

आज शिष्टमंडळ न पाठण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त एवढंच म्ङणत आहोत की आमचे अधिकार आणि हक्क कसे बाधित होत नाहीत, याचं उत्तर द्यावं, इतकंच आमचं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे. शासनाकडून आम्हाला कोणतंही फॉलोअप आलेलं नाही. मंत्री आले आणि भेटून गेले. यापेक्षा शासन गंभीर आहे असं वाटत नाही. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाने या भावनेनेआज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा – लक्ष्मण हाके

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Live : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर