Mumbai News Today : मुंबईत मराठी महिलेला घर नाकारणे, कांद्याचा लिलाव बंद, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर झालेली प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई आदी मुद्दे राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. तर, दुसरीकडे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक ठरतेय. तसंच, निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाने भारतावर आरोप केल्याने केंद्र सरकारकडून त्याप्रकरणी लवकरच स्टेटमेंट दिलं जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय नेते मंडळींकडून प्रतिक्रिया येत आहेत. तसंच, गेल्या २३ तासांपासून सुरू असलेले गणपती विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. २३ तासांनंतर मुंबईच्या लालबागच्या राजाचे विसर्जन झाले आहे. तर, पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरू आहे. यासह राज्यातील हवामानाची स्थिती जाणून घेऊयात.
Marathi Maharashtra News Today | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
नाशिक: शेतात काम करत असताना ६५ वर्षाच्या वृध्दाला साप चावल्याने तसेच डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील डुबेरवाडी येथे ही घटना घडली.
नागपूर: गणरायाच्या विसर्जनाला गुरुवारपासून सुरुवात झाल्यानंतर शहरातील सर्व कृत्रिम विसर्जन कुंडांवर एकूण १ लाख ४४ हजार १६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना श्रावण सण आणि गणेशोत्सवापूर्वीच शहरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करून घेण्याचे आदेश दिले होते.
‘इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स’ या अखिल भारतीय संस्थेची कल्याण डोंबिवलीत स्थानिक शाखा भारतीय अभियंता दिनी सुरू करण्यात आली. संरचनात्मक विषयाची साध्या सोप्या पध्दतीने माहिती अधिकाधिक नागरिकांना मिळावी.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कांदा लिलाव बंद ठेवला आहे. परिणामी, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने कांदा महागला आहे. घाऊक बाजारात २ रुपयाने तर, किरकोळ बाजारात पाच रुपयाने कांद्याचे दर वाढले आहेत.
विदर्भातील वाशीम आणि गडचिरोली जिल्हा निती आयोगाने निकाषानुसार मागास आणि अकांक्षित जिल्हे म्हणून घोषीत केले आहे. ही बाब माझ्यासह सर्वांसाठी अभिमानाची बाब नाही. त्यामुळे मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी सर्वकष प्रयत्नाची गरज आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार सविस्तर वाचा…
हार्बर मार्गावरील पनवेल रिमॉडलिंग आणि मालवाहतुकीसाठी समर्पित ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा वाहतूक ब्लॉक शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत असेल.
मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर रोजी ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
अंधेरी परिसरात ॲम्बरग्रीस (व्हेलच्या उलटी) विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी सुमारे एक किलो ॲम्बरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे.
मालाड परिसरातून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या २८ वर्षीय महिलेला १२ तासांत अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून आरोपी महिलेने मुलाचे अपहरण का केले याबाबत पोलीस तपास करत आहेत. सविस्तर वाचा…
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील स्वच्छतेच्या भीषण होत चाललेल्या अवस्थेबद्दल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई पालिकेला पत्र लिहिले आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांच्या अंगभूत कला, क्रीडा गुणांना उत्तेजन देणा-या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरीक पण लय भारी हे दाखवून दिले.
नागपूर: केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत रिक्त पदांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी कनिष्ठ लेखाधिकारी पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.
उरण: जेएनपीटी बंदराच्या तेल जेट्टीच्या लोखंडी बीमवर शुक्रवारी एक भला मोठा अजगर आढळला आहे. मात्र समुद्रात असलेल्या जेट्टीवर हा अजगर कसा या बद्दल प्रश्न पडला असून आश्चर्य ही व्यक्त केलं जात आहे.
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यांत पाऊसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने आणि अनंत चतुर्दशी, ईद- ए – मिलाद, सप्तहांत ची सुट्टी असल्यामुळे जिल्ह्यातील धरणावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.
ठाणे: भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वैद्यकीय कापूस निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार होती.
महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाहीचा निर्णय प्रलंबित असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून उशीर होत आहे. महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकारला संरक्षण देण्यासाठी हेतुपुरस्सर हा उशीर केला जातोय. गंमत म्हणजे, अध्यक्ष राहुल नार्वेकर संसदीय लोकशाहीवरील राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी घानाला जात आहेत. संसदीय लोकशाहीचे रक्षण आणि संवर्धन करण्याबाबत ते काय बोलणार किंवा महाराष्ट्रातील (भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य) लोकशाहीचा घात होत असताना ते संमेलनात कसे सहभागी होऊ शकतात? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उरण: चिरनेर मधील अक्कादेवी धरण सप्टेंबरमध्येही जोराचा पाऊस सुरु असल्याने ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे पर्यटकांना आंनद लुटण्याची संधी मिळत आहे.
पनवेल: पनवेल महापालिका परिसरामध्ये यंदाच्या गणेशोत्सवात ३२१ गणेशमूर्ती दान करण्याचाा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या कुटूंबियांनी घेतला.
कल्याण: तुम्हाला आमच्या गावात ट्रक आणण्याची परवानगी नाही. तुमच्याकडे माथाडी कामगाराचा परवाना आहे का, असे प्रश्न करुन कल्याण जवळील सापाड गावातील तीन तरुणांनी शहापूर जवळील लाहे गावातील एका गणपतीच्या कारखाना मालक आणि त्याच्या साथीदाराला बुधवारी रात्री दीड वाजता बेदम मारहाण केली.
त्या इमारतीतील लोक जागा देण्यास तयार होते. मी जी जागा पाहायला गेले होते, त्या जागेच्या मालकांना ती जागा देण्यास काही हरकत नव्हती. हा प्रकार सोसायटीच्या सेक्रेटरींनी केला. त्यानंतर मालकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनीही नाराजी व्यक्त केली. फ्लॅट मालकांनी संबंधित प्रकार सोसायटीच्या कमिटीमध्ये मांडण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आता सेक्रेटरी पदावरून त्यांना काढण्यात आलं आहे - तृप्ती देवरुखकर
बुलढाणा: गणेश विसर्जनासाठी गेलेला भाविक तलावात बुडाला असून त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. जिल्हा पथकाने आज सकाळपासून शोध मोहिम सुरू केली असून बुडालेल्या इसमाचा थांगपत्ता लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
चंद्रपूर येथील जेटपूरा गेट येथे गांधी पुतळ्यासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली.
आज मुंबई येथील सह्याद्री अतिथी सभागृहात ओबीसींची बैठक होत आहे. दरम्यान या बैठकीवर सर्व शाखीय कुणबी समाजाने बहिष्कार टाकला आहे.
Pitru Paksha 2023 Start Date and Time : यंदा पितृपक्ष २९ सप्टेंबर २०२३ पासून १४ ऑक्टोबर या कालावधीत आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राध्द, महालय आदिविधी केले जातात.
गावातले गणपती उठले की सावंगीचा राजाला निरोप द्यायला मग गाव लोटतो. सावंगी ते पवनार अशी ही मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू होते.
चंद्रपूर: शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर, श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय वांढरी, बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी, गोंडपिपरी शिक्षण महाविद्यालय गोंडपिपरी तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा अनेक महाविद्यालयांकडे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत.
चंद्रपूर: जिल्हा परिषदेतील शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. बहुसंख्य शाळांत दहा ते वीस विद्यार्थीच शिक्षण घेत आहे.
तालुक्यातील एका नराधम तरूणाने मतिमंद असलेल्या आणि आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलीला जीवानिशी मारण्याची धमकी देत सतत लैंगिक शोषण केले.
Marathi Maharashtra News Live Today | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर