Maharashtra Politics LIVE Updates : देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलेले नाहीत कारण त्या बंगल्यावर काळी जादू झाली आहे. कामाख्या मंदिरात जे रेडे कापण्यात आले त्यांची मंतरेली शिंगं वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद कुणाकडे टिकू नये म्हणून हे करण्यात आलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीही आलबेल नाही अशीही चर्चा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. दरम्यान आज महापालिकेचं बजेट सादर होणार आहे. या आणि अशा घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Mumbai News LIVE Update Today | वर्षा बंगल्याबाबत संजय राऊत यांचा दावा, एकनाथ शिंदेंकडे अंगुलीनिर्देश, यासह महत्त्वाच्या बातम्या

13:13 (IST) 4 Feb 2025

पुणे नाशिक मार्ग रेल्वेकडूनच! रेल्वे व्यवस्थापकांकडे माहितीच नाही

रेल्वे अर्थसंकल्पात देशांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींसंदर्भात रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे पत्रकार परिषद घेतली.

सविस्तर वाचा…

12:53 (IST) 4 Feb 2025

आयुष्मानमध्ये मोफत उपचार कसे मिळणार? गोल्डन कार्ड वितरणाची गती…

अकोला : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरण केले जात आहेत. जिल्ह्यात मात्र त्याची अतिशय संथ गती असून अद्याप ६५ टक्के नागरिकांना कार्डची प्रतीक्षा लागली आहे. उद्दिष्टपूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे. गोल्डन कार्ड मिळाले नसल्याने गरजू रुग्णांना मोफत उपचार कसे मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा सविस्तर…

12:52 (IST) 4 Feb 2025

‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!

पुणे : सिंहगड रस्त्यावरील ज्या परिसरात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) संशयित रुग्ण वाढत आहेत. त्या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ३० खासगी जल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी (आरओ प्लांट) १९ प्रकल्पांतील पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाचा सविस्तर…

12:52 (IST) 4 Feb 2025

शहरातील बसगाड्या थांब्यांची दुरवस्था; लोखंडी पत्रे, आसने तुटलेल्या अवस्थेत

ठाणे : शहरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या विविध योजना राबवल्या जात असताना, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः बसगाड्यांच्या थांब्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेली आसने, तुटलेले लोखंडी पत्रे आणि अस्वच्छ परिसर यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाचा सविस्तर…

12:51 (IST) 4 Feb 2025

विट्यातील मेफेड्रोन उत्पादन प्रकरणी तिघांना अटक

सांगली : विटा येथे मेफेड्रोन (एमडी) उत्पादन करण्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या मुंबईतील संशयितासह तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

वाचा सविस्तर…

12:45 (IST) 4 Feb 2025

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची पाठ्यवृत्तीसाठी निवड… राज्यातून ठरले एकमेव…

फ्लोअरशिंग माइंड्स फंड, अमेरिका यांच्या आर्थिक सहकार्यातून मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सतर्फे (टिस) ‘उमंग’ या पाठ्यवृत्तीसाठीची निवड प्रक्रिया राबवण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:40 (IST) 4 Feb 2025

भंडारा : रात्रीचा थरार! वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर अचानक वाघाने घेतली झेप…

भंडारा : शंकरपट पाहून रात्रीच्या सुमारास दुचाकीने घराकडे जात असताना वाटेत दुचाकीवर वाघाने अचानक झेप घेतली. वाघाच्या हल्ल्यात दुचाकी चालकासह मागे बसलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली.

वाचा सविस्तर…

12:34 (IST) 4 Feb 2025

संशोधन केंद्रांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय… होणार काय?

ऑनलाइन माहिती भरल्यानंतर त्या माहितीनुसार संशोधन केंद्रात उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती नियुक्त केली जाणार आहे.

सविस्तर वाचा…

12:28 (IST) 4 Feb 2025

मुंबई : पालिका राखीव निधीतून १६ हजार कोटी काढणार? वाढत्या खर्चामुळे महसूल वाढीसाठी धडपड, कचरा शुल्कही लावणार

देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा २०२५ – २६ या आर्थिक वर्षांचा तब्बल ७४हजार ४२७ कोटींचा अर्थसंकल्प आज सादर झाला. प्रकल्पांचे खर्च भागवण्यासाठी येत्या वर्षात आणखी १६ हजार कोटी राखीव निधीतून काढण्यात येणार आहेत.

वाचा सविस्तर…

12:22 (IST) 4 Feb 2025

कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न

उरण- पनवेल परिसरातील २ हजार ३०० हेक्टर जमीनीवरील कांदळवन क्षेत्र वन विभागाने कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केले आहे.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 4 Feb 2025

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्यात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई व नवी मुंबईतील उपनगरांशी जोडणाऱ्या रस्ते बांधकामासह इतर कामांचा आढावा घेण्यात आला.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 4 Feb 2025

Vishwa Marathi Sammelan 2025 : अनोख्या उपक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद; तीन दिवसांत ३५ हजार पुस्तकांचे आदान-प्रदान

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 4 Feb 2025

रेमंड येथील वृक्षतोडी संदर्भात महापालिकेत सुनावणी

ठाणे : वर्तकनगर यथील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. यासाठी येथील ६३१ वृक्ष तोडण्याचा तसेच दोन हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपन करण्यात येणार असल्याने येथील रहिवाशांनी विरोध केला होता.

वाचा सविस्तर…

11:47 (IST) 4 Feb 2025

खिचडी घोटाळा प्रकरण : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 4 Feb 2025

धनंजय मुंडेंनी ८८ कोटींचा घोटाळा केला-अंजली दमानिया

धनंजय मुंडेंनी ८८ कोटींचा घोटाळा केला असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसंच या घोटाळ्यामध्ये अजित पवारांचा सहभाग आहे का? हे अजित पवार सांगू शकतात. काहीही झालं तरीही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे.

11:33 (IST) 4 Feb 2025

‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!

बुलढाणा : उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळावा आटोपून ते आनंदाने गावाकडे निघाले. गावापासून जेमतेम दोनेक तास अंतरावर असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

वाचा सविस्तर…

11:33 (IST) 4 Feb 2025

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, आगामी अर्थसंकल्पात १४ टक्क्यांनी वाढ

चालू आर्थिक वर्षात सुशोभिकरण, रस्त्यांचे सुरू असलेले काँक्रीटीकरण, त्याचबरोबर हाती घेतलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागला आहे.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 4 Feb 2025

‘इरिन’समोर कुशल मनुष्यबळ निर्मितीचे आव्हान, विद्युत रेल्वे इंजिन वापराची शतकपूर्ती

भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्थेच्यावतीने विद्युत वाहतुकीच्या १०० वर्षाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 4 Feb 2025

बँक कर्ज थकीत वसुलीसाठी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण, खंडणीचीही मागणी

सोलापूर : वाहन कर्जाचे हप्ते न भरल्याने एका खासगी बँकेच्या कर्जवसुली एजंटांनी संबंधित कर्जदाराच्या तरुण मुलाचे अपहरण केले. त्याच्या ताब्यातील मोटार काढून घेतली आणि तरुणाला एका गोदामात डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा सविस्तर…

11:08 (IST) 4 Feb 2025

नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव

नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुस्साट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. सध्या नवी मुंबई मेट्रोचा वेग सरासरी ताशी २५ प्रति किलोमीटर आहे.

वाचा सविस्तर…

11:07 (IST) 4 Feb 2025

मेघे वैद्यकीय समूह अदानी टेक ओव्हर करणार? नेमके काय घडले…

वर्धा : अदानी समूहाची ख्याती देशभरच नव्हे तर जगभर आहे. तसेच त्यांचे एखाद्या समूहास स्वतःच्या पंखाखाली घेण्याचे म्हणजेच टेक ओव्हर करण्याच्या कौशल्याची पण सर्वत्र चर्चा होत असते. पण शिक्षण क्षेत्रात मात्र फारसे स्वारस्य या समूहाचे दिसून आले नाही.

वाचा सविस्तर…

11:06 (IST) 4 Feb 2025

बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकीकडे रस्ते अपघातांमध्ये नागरिक मृत्यूमुखी पडत असताना वाहतुक नियमांचे उल्लंघनाचे प्रमाणही अधिक असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. काही बेजबाबदार वाहन चालकांमुळे अपघात घडत आहे.

वाचा सविस्तर…

11:06 (IST) 4 Feb 2025

राज्यात पुण्यावरच लक्ष! जीबीएसच्या शीघ्र प्रतिसाद पथकाचा निर्वाळा

पुणे : ‘राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येतील वाढ केवळ पुण्यापुरती मर्यादित आहे. पुण्यातही सिंहगड रस्ता परिसरातच या आजाराचा उद्रेक दिसून येत आहे. राज्यात इतरत्र जीबीएस रुग्णांची संख्या नेहमीएवढीच असून, त्यात वाढ झालेली नाही.

वाचा सविस्तर…

10:52 (IST) 4 Feb 2025

माणूस जोडणे हेच साहित्याचे मूळ प्रयोजन – भीमराव धुळूबुळू

सांगली : साहित्य हे भूतकाळातले अनुभव सोबत घेऊन वर्तमानकाळाच्या नोंदी ठेवत भविष्याला वाट दाखवण्याचे काम करते. चांगला साहित्यिक व्हायचे असेल, तर डोळसपणे फिरले पाहिजे. मुळात साहित्याचे प्रयोजन माणसाला माणूस जोडणे हेच असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळूबुळू यांनी अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.

देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी २२ वे अग्रणी साहित्य संमेलन झाले. या वेळी उद्घाटन समारंभ, चर्चासत्र, कथाकथन आणि कविसंमेलन अशी वेगवेगळी सत्रे पार पडली.

10:51 (IST) 4 Feb 2025

मशिदीवरील भोंग्याविरोधात कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर : कोल्हापुरातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढावेत या मागणीसाठी येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

भोंग्यामुळे नागरिकांना त्रास होत असेल तर ते जप्त करावेत, असे निर्देश २३ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने दिले आहेत. जिल्ह्यात पोलीस ठाण्यामध्ये हिंदू एकता आंदोलनासह इतर काही संघटनांनी, त्रस्त नागरिकांनीही तक्रार अर्ज दिले आहेत. पोलिसांकडे कोणती कारवाई केली? अशी विचारणा केली असता कारवाई केली गेलेली नाही असे आढळून आले आहे.

10:50 (IST) 4 Feb 2025

कोल्हापूरसाठी ४२१ कोटी अतिरिक्त निधीची मागणी – प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी नियोजन विभागाकडून कळविलेला ५१८ कोटींचा तात्पुरता नियतव्यय अपुरा आहे. जिल्ह्यातील यंत्रणांकडील ४२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीनुसार एकूण ९४० कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. विभाग स्तरावर बैठकीत निधी मिळविण्यासाठी मागणी करणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार, अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादरीकरण केले.

10:49 (IST) 4 Feb 2025

कोल्हापुरात गुरुवारपासून शल्यचिकित्सक परिषद

कोल्हापूर : असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्यावतीने ‘ मॅसिकॉन ‘ ही शल्यविशारदांची राज्यस्तरीय परिषद ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये असंख्य डॉक्टर सहभागी होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. आनंद कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेचे सचिव डॉ. आनंद कामत, सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वैभव मुधाळे, डॉ. प्रताप वरूटे, डॉ. बसवराज कडलगे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी आदी उपस्थित होते. गुरुवारी उद्घाटन राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे यांच्या हस्ते होणार आहे.

10:44 (IST) 4 Feb 2025

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी उद्या सोडत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात सोडतीचा कार्यक्रम

कोकण मंडळाकडून २२६४ घरांसाठी ११ आॅक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

10:44 (IST) 4 Feb 2025

टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक

टोरेस गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा असून सामान्य नागरिकांची जन्मभराची कमाई पळवून परदेशात नेण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

10:43 (IST) 4 Feb 2025

ठाणे : भीषण अपघातात रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी

ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा भागात सोमवारी रात्री एका मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षामधील वाहन चालकासह तीनजण जखमी झाले. याच घोडबंदर मार्गावर सोमवारी सकाळी एका मोटारीने तीन ते चार वाहनांना धडक दिली होती.

वाचा सविस्तर…

वर्षा बंगल्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल (फोटो – एएनआय संग्रहीत)

देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलेले नाहीत कारण त्या बंगल्यावर काळी जादू झाली आहे. कामाख्या मंदिरात जे रेडे कापण्यात आले त्यांची मंतरेली शिंगं वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद कुणाकडे टिकू नये म्हणून हे करण्यात आलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.