Maharashtra News : राज्यात एकीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार, याची उत्सुकता असताना दुसरीकडे दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगू लागलं आहे. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर देखील हक्क सांगणाऱ्या शिंदे गटाकडून आता दसरा मेळावा आमचाच होणार, असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेकडून देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आमचाच होणार अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, या दोघांवर टीका करत मनसेकडून मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मनसेकडून शिवसेना आणि शिंदे गट या दोघांना खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे.
म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागणार आहेत. त्याशिवाय अर्ज भरताच येणार नाही. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच सोडतीत समाविष्ट होऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे पात्रता आधीच निश्चित झाल्याने विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नव्या पद्धतीमुळे सोडत १०० टक्के पारदर्शक होईल, दावा करण्यात येत आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra News Today, 30 August 2022 : दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं; मनसेची शिवसेना, शिंदे गटावर टीका
नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भांडूप पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये ६५ आणि ६२ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. पीडित मुलीचे बालसुधारगृहात समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिने हा प्रकार तेथील अधिकाऱ्यांना सांगितला. सविस्तर वाचा…
वानवडी भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मसाज सेंटरच्या व्यवस्थापक महिलेसह मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला तसेच परदेशी महिलेसह चौघींना ताब्यात घेण्यात आले. सविस्तर वाचा…
आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात १०८ क्रमांकावरील सुविधेच्या रुग्णवाहिकेत चक्क घोणस या विषारी सापाने मुक्काम ठोकला असल्याची बाब समोर आली. त्यामुळे नागरिक आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णवाहिकेची स्वच्छता करताना हा प्रकार उघडकीस आला. सविस्तर वाचा…
भाजपची पुणे महापालिकेमध्ये सत्ता असताना हजारो कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्याची कॅग मार्फत चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आज(मंळवार) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले सरकार किती काळ टिकणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. मात्र, बंडखोर आमदारांकडून निकाल चार ते पाच वर्षे लागणार नाही असा दावा केला जाणे धक्कादायक असून हे लोक आता न्यायालयालाही गृहीत धरत आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्यास स्थानिक पोलीसांनी हरकत घेतली असून या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांनी हक्क सांगितल्याने पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून ही हरकत घेतली आहे. सविस्तर वाचा…
ईडीने छापेमारी केलेले वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बजरंग खरमाटे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांच्या निरोप समारंभासाठी मंगळवारी रात्री जंगी मेजवानी आयोजित करण्यात आल्याचा दावा युवा काँग्रेसचे सरचिटणीस बंटी शेळके यांनी केला असून या आयोजनावर त्यांनी टीका केली आहे. सविस्तर वाचा...
नायगाव उड्डाण पुलाच्या पूर्वेकडील बाजूस तयार केलेला बॅरिगेट तुटल्याची घटना घडली आहे. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. बॅरिगेट तुटून पुलाच्या मध्येच असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. वाचा सविस्तर बातमी...
नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची असतानाही पाणीपुरवठा करण्याबाबतची शपथपत्रे घेऊन बांधकाम परवाने देण्यास प्रशासनाकडून सुरूवात झाली आहे. मात्र अनेक बांधकाम व्यावसायिकांनी खोटी शपथपत्रे दिल्याचे उघड झाले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाकडून सोमवारी करण्यात आला. सविस्तर वाचा…
करोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (३१ ऑगस्ट) पुण्यनगरीत वाजत-गाजत गणरायाचे आमगन होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांतील कलाकारांचे मधूर वादन अशा जल्लोषात छोटेखानी मिरवणूक काढून मानाच्या गणपतींची बुधवारी मुहूर्तावर पूजा करून विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त असे सारेच गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
शहराला नवे पर्यटनस्थळ मिळण्याची चिन्हे आहेत.शहरालगत सालोड येथे वन विभागाचे अठरा हेक्टरचे वन क्षेत्र उपलब्ध आहे. याच जागेवर 'इको टुरिझम पार्क' उभारण्याचा प्रयत्न आमदार डॉ पंकज भोयर यांच्याकडून सुरू झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी विनंती केली होती. सविस्तर वाचा…
येरवडा कारागृहात प्रकृती बिघडल्याने चकमक फेम अधिकारी अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणी शर्मा यांना गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती. वाचा सविस्तर बातमी...
भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पुढील सहा आठवड्यानंतर तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया शक्य आहे. त्यामुळे आता तिला या कालावधीत रुग्णालयातून सुट्टी देण्याबाबत शासकीय वैद्यकीय रूग्णालय (मेडिकल) प्रशासन वरिष्ठ पोलिसांसोबत पत्रव्यवहार करणार आहे. सविस्तर वाचा…
मालमत्तेच्या वादातून नातवाने आजीचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावत्र आई, वडील यांच्याशी संगनमत करुन नातवाने आजीचे अपहरण केले असून या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वीस वर्षीय नातवाला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी...
ज्येष्ठ नेपथ्यकार, रंगकर्मी आणि दिग्दर्शक गणेश नायडू यांचे मंगळवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात तुषार व हेमंत ही दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा स्मशान घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा…
दुर्ग-इतवारी दरम्यान रेल्वेचा तिसरा मार्ग तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या ५८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, रेल्वे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे. वाचा सविस्तर बातमी...
भामरागड तालुक्यातील धुळेपल्ली येथे मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादात वडिलाने अंगणात झोपलेल्या मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. रानू आत्राम (३२) असे मृत मुलाचे नाव आहे. कोपा वंजा आत्राम (६०) असे आरोपी पित्याचे नाव असून ताडगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाचा सविस्तर बातमी...
गोंदिया शहरालगतच्या ग्राम मुर्री येथील एका ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल भलतेच संतापले. संतापाच्या भरात त्यांनी ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांच्या कानशिलात लगावली. वाचा सविस्तर बातमी...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईत पक्षबांधणी करण्याची जबाबदारी पाच विभागप्रमुख आणि तीन विभाग संघटकावर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात माजी आमदार, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. सविस्तर बातमी...
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मुंबईतील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाअंतर्गत मंगळवारी प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सारिपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला.
मिळकत कर नावावर करुन देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या कर विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. वाचा सविस्तर बातमी...
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि बारामतीमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षाच्या वाढीव भाडेआकारणीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र, बदललेल्या भाडेदरानुसार रिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करून घेतल्याशिवय वाढीव भाडे आकारता येणार नाही. मीटरमध्ये दिसेल तेच भाडे प्रवाशाला लागू राहील, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी...
मनसेकडून मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मनसेकडून शिवसेना आणि शिंदे गट या दोघांना खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे.
कफ परेड परिसरात टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन जवानांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. गंभीर बाब म्हणजे या टॅक्सीचालकाला वाचविणाऱ्या दोन पोलिसांनाही आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एकाचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर बातमी...
आज जवळपास पाच वर्षांनंतर बेळगावच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधीची सुनावणी २०१७मध्ये झाली होती.
Mhada Lottery : म्हाडा सोडतीच्या प्रक्रियेत बदल
म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागणार आहेत.