Maharashtra Politics Updates : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच महाविकास आघाडी यांच्यात स्पर्धा लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यामुळे ते आज परळी न्यायालयात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आज परळी तसेच औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेदरम्यान पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राहुल गांधी मोदी सरकार तसेच भाजपावर निशाणा साधत आहेत. त्यामुळ आजदेखील या यात्रेदरम्यान राहुल गांधी महत्त्वाचे भाष्य करण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!

11:18 (IST) 18 Jan 2023
पुण्यात बदलत्या हवामानामुळे ताप, कोरड्या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

कोरडा खोकला, सर्दी, विषाणूजन्य ताप आणि उलट्या अशा लक्षणांच्या रुग्णांचे बाह्यरुग्ण विभागात येण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे निरीक्षण शहरातील डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे. साधारण आठवड्याभरापेक्षा अधिक काळ ही रुग्णवाढ दिसत असून या रुग्णांमध्ये प्रामुख्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

सविस्तर बातमी

11:14 (IST) 18 Jan 2023
नाना पटोले तिहेरी राजकीय संकटात; गृहजिल्ह्यात सत्ताबदलाच्या हालचालींना वेग

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या तिहेरी राजकीय संकटात अडकल्याचे चित्र आहे. त्यांच्या भंडारा या गृहजिल्ह्यात जिल्हा परिषदेत सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या पदवीदर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवारांवरून पटोलेंची डोकेदुखी वाढली आहे, तर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर माजी आमदार आशीष देशमुख यांनी आक्षेप घेतले आहे. या तिहेरी संकटातून पटोले कसे बाहेर पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सविस्तर बातमी

11:12 (IST) 18 Jan 2023
बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांपासून दिलासा द्या, खासदार राहुल शेवाळेंची उच्च न्यायालात धाव

मुंबई : समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या दुबईस्थित तरुणीला मज्जाव करावा, या मागणीसाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर पसरवल्याबद्दल या तरुणीवर कारवाई करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 18 Jan 2023
तांबे यांना ‘सत्तेच्या पाण्याची तहान’

महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेस हा तसा महत्त्वाचा पक्ष. त्यातील मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे व त्यांचे पुत्र सत्यजित तांबे हे एक किरकोळ बिंदू. परंतु त्यांनी केलेल्या राजकीय प्रतापाने साऱ्या महाराष्ट्राचे राजकारण व्यापून गेले.

सविस्तर वाचा…

10:51 (IST) 18 Jan 2023
नारायण राणे सभा गोंधळ प्रकरण : शिवसेना, मनसेच्या नेत्यांसह ३८ जणांना न्यायालयात उपस्थित राहाण्याचे आदेश, शेवटची संधी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयासमोर २००५ मध्ये घेतलेल्या सभेत गोंधळ घातल्याच्या आरोपाप्रकरणी आदेश देऊनही ठाकरे गट आणि शिंदे गट, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ३८ नेत्यांपैकी बहुतांश मंगळवारी आरोप निश्चितीसाठी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे, संतापलेल्या न्यायालयाने या सगळ्या नेत्यांना पुढील सुनावणीच्या वेळी केल्या जाणाऱ्या आरोप निश्चितीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच, ही शेवटची संधी असल्याचेही बजावले.

सविस्तर वाचा…

10:28 (IST) 18 Jan 2023
मेलबर्नचे मराठी नाटक महाराष्ट्र दौऱ्यावर!

मुंंबई : जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. मुंबई असो किंवा मेलबर्न- नाटकाच्या वेडाने झपाटलेली मराठी मंडळी सापडणारच. आतापर्यंत अनेक संस्था मराठी नाटकांचा प्रयोग करण्यासाठी अमेरिका, लंडन, दुबई, ऑस्ट्रेलियाला जात. आता ऑस्ट्रेलियातील ‘मेलबर्न इंडियन थिएटर’चे ‘बंदिनी’ हे नाटक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे.

सविस्तर वाचा…

10:11 (IST) 18 Jan 2023
मिताली राज निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळण्याचे संकेत

पुणे : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू मिताली राजने पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, मिताली पुन्हा एकदा मैदानावर फलंदाजी करताना दिसू शकते.

सविस्तर वाचा…

10:09 (IST) 18 Jan 2023
तरुणांमध्ये का वाढतंय उच्च रक्तदाबाचे प्रमाण? गेल्या १० वर्षांत वाढली रुग्णसंख्या

मुंबई : कामाचे वाढते तास, बदलती जीवनशैली, व्यसनांचे वाढते प्रमाण, अवेळी खाणे आदी विविध कारणांमुळे तरुणांमध्ये शारीरिक, तसेच मानसिक व्याधीचे प्रमाण वाढत असून, यातूनच उच्च रक्तदाबाच्या विकाराला सुरुवात होते. उच्च रक्तदाब हे जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक बनले आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा…

09:59 (IST) 18 Jan 2023
“शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसच्या आमदारांमध्येही अस्वस्थता, लवकरच…”; भाजपा खासदाराचा दावा

माजी आमदार आशीष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. आशीष देशमुख यांच्या मागणीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसचे आमदारही अस्वस्थ असून काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय भूकंप बघायला मिळेल, असा दावा भाजपा नेते सुजय विखे पाटील यांनी केला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

09:55 (IST) 18 Jan 2023
पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. वाचा सविस्तर

09:52 (IST) 18 Jan 2023
Coronavirus : देशात करोनाबाधितांची संख्या १०० पेक्षा खाली, ४ दिवसांपासून एकाचाही मृत्यू नाही

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. येथे रुग्णांची संख्या रोज वाढत असून रुग्णालये अपुरे पडू लागल्याचा दावा केला जात आहे. मात्र चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात मात्र रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. वाचा सविस्तर

09:51 (IST) 18 Jan 2023
Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा तसेच अन्य जगप्रसिद्ध कंपन्यांकडून कर्मचारीकपात केली जात आहे. असे असतानाच आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. या कारवाईला आजपासूनच (१८ जानेवारी) सुरुवात होणार आहे. वाचा सविस्तर

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

राजकीय, आर्थिक, मनोरंजन तसेच अन्य क्षेत्रातील सर्व बातम्यांचा आढवा वाचा एका क्लिकवर.