Mumbai News Updates, 19 September 2024 : राज्यात आजपासून ‘स्वच्छताही सेवा’ अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेतही सहभागी झाले. याशिवाय राज्यातील राजकीय घडामोडींवरही आपले लक्ष राहणार आहे. काल केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या विधानावरूनही राजकारण तापलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Today, 19 September 2024 : अजित पवार पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर?
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने शेतीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे.
शिंदे सरकारने महाराष्ट्र विकायला काढला आहे. आपल्या मर्जीतल्या लोकांना कोट्यवधी रुपयांची कंत्राटं दिली जात आहेत. हे सरकार लुटारू आणि डाकूंचे सरकार आहे. महाराष्ट्राची अस्मिता दुखावण्याचं काम या सरकारद्वारे सुरू आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. २०१४ पूर्वी हेच भाजपा सरकार कुठं नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्र माझा, अशी घोषणा देत होते, मात्र, आता त्यांनीच महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे खासदार, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने करत हिंसेला चिथावणी देणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर उच्च न्यायालय आणि पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. सविस्तर वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जागावाटपाबाबत विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलातना, महाविकास आघाडीचं जागावाटप सुरुळीत सुरू आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आलेल्या निधीतून वांद्रे परिसरातील महिलांना मिक्सर, ज्युसर आणि टॅबचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाने त्याकरिता पात्र महिलांकडून अर्ज मागविले आहेत. सविस्तर वाचा…
पावसाने गणरायाच्या विसर्जनात कोणताही अडथळा आणला नाही. त्यामुळे भाविकांनी गणरायाला उत्साहात, वाजतगाजत निरोप दिला. मात्र, आता पाऊस पुन्हा परतला आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा “अलर्ट” दिला आहे.
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार राज्याच्या शिक्षण विभागाचा तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा अद्याप अंतिम झालेला नसताना सीबीएसई पॅटर्ननुसार अभ्यासक्रम राबवणे शैक्षणिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम करणार म्हणजे नेमके काय होणार, याबाबत शिक्षण विभागातच अजून पुरेशी स्पष्टता आलेली नाही.
अमरावती : परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथानजीक एसटी बसने पेट घेतला. ही घटना घडल्यानंतर काही वेळ प्रवाशांचा थरकाप उडाला. या दुर्घटनेत एसटी बस संपूर्ण जळाली असून बसमधील प्रवाशांना त्वरित उतरविण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली.
राज्यात पायात पाय घालून कुणी युती केली, तर कुणी आघाडी केली. आता राज्यात दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना आणि एक भाजपा आणि एक काँग्रेस आहे. मात्र, आम्ही तुम्हाला फुकटची सत्ता मिळवू देणार नाही, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
आचार संहिता लागण्यापूर्वी मविआचे जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
सुरक्षाव्यवस्था सर्वबाजुंनी अभेद्य असावी, अशी काळजी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी घेतल्या जात असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० सप्टेंबरला वर्ध्यात सभा होत आहे. त्यासाठी आजपासून मुख्यमार्गावर तसेच सभा स्थळाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावणे सुरू झाले आहे.
भिवंडी येथे गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये दोन गटामध्ये झालेल्या वादानंतर भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (आयपीएस) यांना हे प्रकरण भोवले आहे. परोपकारी यांची थेट ठाणे शहर मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
रत्नागिरी : खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या रस्त्याजवळच असलेल्या एका जंगलामध्ये बुधवारी मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विसर्जन मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भवानी पेठेतील कासेवाडी, तसेच लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक परिसरात दोन जणांवर वार करण्यात आले. सविस्तर वाचा…
पुणे : महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या १२ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पाच कोयते, दुचाकी, मिरची पूड दोन लाख ५२ हजार १५० रुपयांचा माल जप्त केला आहे.
नवी मुंबई : एकेकाळी रासायनिक हब अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानासंबंधी कंपन्यांची पायाभरणी झालेली असून त्यापाठोपाठ आता झवेरी बाजार तसेच सेमीकंडक्टर यासारखे प्रकल्प शहरात उभे राहत आहेत.
ठाणे : वाहतुक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले असताना, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहनांची अवेळी वाहतुक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. घोडबंदर मार्गावर अवजड वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर केव्हा वचक बसणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या विरोधात असं बोलणं, यातून भारतीय जनता पक्षाचे संस्कार दिसून येतात. हे पद भाजपाच्याही अनेक नेत्यांनी भूषवलं आहे. त्याच पदावर आता जनतेने राहुल गांधी यांना बसवलं आहे. त्यांच्या बाबत भाजपाचे बोलतात, ही एकप्रकारे विकृती आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
CM Eknath Shinde on One Nation One Election : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने एक देश, एक निवडणूक हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भातील अहवाल मार्च २०२४ रोजी केंद्राला सोपविला होता. त्यानंतर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या अहवालावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्याची रक्तातील साखरेची पातळी खाली आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
तिसऱ्या आघाडीसाठी आज राज्यातील काही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, तसंच इतर घटक पक्षांचे नेते हजर राहण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्याविरोधात आज राज्यभर आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तसेच अशा वक्तव्यांवर पंतप्रधान मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यात आजपासून ‘स्वच्छताही सेवा’ अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेतही सहभागी झाले.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde joins cleanliness drive in Girgaon Chowpatty, Mumbai as part of the 'Swachhata hi Seva' program pic.twitter.com/mjM8wIFdPE
— ANI (@ANI) September 19, 2024
अजित पवार हे पुन्हा महाराष्ट्राच्या दौरा करणार असल्याची माहिती आहे. येत्या २१ सप्टेंबरपासून या दोऱ्याला सुरुवात होणार असल्याचे सांगितलं जात आहे. ते सुरुवातीला ७० मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे.