Mumbai Maharashtra News Updates, 18 September 2024 : आपल्या लाडक्या गणरायाचं वाजत-गाजत विसर्जन झालं आहे. अनंत चतुर्दशीपासून सुरुवात झालेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर आज अनेक बाप्पांचे साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. त्यामुळे आता बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असेल. विधानसभा निवडणूक अद्यापही लागलेली नसली तरीही विविध पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. जागावाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल इथपर्यंत चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे आता यापुढे राज्याच्या राजकारणात विविध गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडीही पाहुयात.
Maharashtra News Live Today, 18 September 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
अकोला : मनसैनिक जय मालोकार (२४) याच्या मृत्यू प्रकरणाला शवविच्छेदन अवाहलातून धक्कादायक वळण प्राप्त झाले आहे.
अपंग वित्त महामंडळ जिल्हा कार्यालय यांच्याकडून जिल्हातील २३ दिव्यांग व्यक्तींना इको कंपनीकडून रिक्षावाटप करण्यात आले असून यामध्ये सर्वांची फसवणूक झाली आहे. तरी संबंधित कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी नगर येथे महामंडळाच्या कार्यालयाबाहेर भीमशक्ती संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करून आंदोलन करण्यात येत असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
"देशात वन नेशन वन इलेक्शन या विधेयकासंदर्भात मी आता पूर्ण वाचलं नाही. त्यामुळे मी आता त्याबाबत सविस्तर बोलणं योग्य होणार नाही. लोकशाहीमध्ये हे शक्य आहे का नाही? याबाबत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात चर्चा होणं गरजेचं आहे. हे सर्व सोप नाही. पण अशा पद्धतीने निवडणुका घेणं शक्य आहे का? हे आधी पाहावं लागेल", असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
नाशिक : गणेशोत्सवात मुभा मिळाल्याने शहरातील मुख्य मिरवणुकीसह वेगवेगळ्या भागात निघालेल्या मिरवणुकीत आवाजाच्या भिंती उभारल्या गेल्या.
मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील प्रवेश ५ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचे वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केले आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात करीत आहे. दरम्यान, १ ऑक्टोबरपासून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.
गडचिरोली : एकीकडे अपुऱ्या सुविधेमुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचे चित्र असताना डॉक्टरलाच दारू तस्करी करताना अटक करण्यात आल्याने गडचिरोली आरोग्य विभाग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यात शाळेच्या बसला दुचाकीने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. खोपोली पाली राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. श्रीराज एज्युकेशनल सेंटरची स्कूल बस विद्यार्थ्यांघेऊन निघाली होती. यावेळी परळीच्या पुढे एका वळणावर हा अपघात झाला. सविस्तर वाचा…
बुलढाणा: गणपती विसर्जनाच्या दरम्यान येथील एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. नयन गजानन नाटेकर ( वय २३ वर्षे राहणार अण्णाभाऊ साठे नगर, वार्ड क्रमांक १ बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. काल मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी रात्री तो गणपती विसर्जनासाठी बुलढाणा मलकापूर मार्गावरील कर्हाळे ले आऊट येथील तलावाकडे मिरवणुकीसह गेला होता. तलावात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहर पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. घटनेचा तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयातील आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखिल भारतीय व राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी २६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या लोकलचे सारथ्य करणारे मोटरमन सध्या वेगळ्याच विवंचनेत अडकले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांचे सुरू झालेले उपोषण, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी या समाजाच्या युवकांचे पंढरपूरमध्ये सुरू असलेले उपोषण, धनगर समाजाच्या आरक्षणावरून आक्रमक झालेला आदिवासी समाज, मराठा समाजाला आपल्या आरक्षणात वाटेकरी करू नये यासाठी आग्रही असलेला ओबीसी समाज यातून सर्व समाजांना चुचकारण्याचे मोठे आव्हान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारसमोर उभे ठाकले आहे. सविस्तर वाचा
मुंबई : टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्समध्ये (‘टीस’) विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) या संस्थेवर १९ ऑगस्ट रोजी घालण्यात आलेली बंदी अखेर ‘टीस’ प्रशासनाने मागे घेतली.
मुंबई : म्हाडाचे वांद्रे पूर्व येथील मुख्यालय असलेल्या म्हाडा भवनात घराचा ताबा घेण्यासह विविध कामांसाठी तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांची अनेकदा अडचण होते. स्तनपान वा बाळाच्या आरामासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. आता मात्र त्यांची ही गैरसोय दूर होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या तोंडावर घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील स्थानिक विरोधकांनी मोट बांधून सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष समिती’ हा एक मंच स्थापन केला आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेची मुदत संपुष्टात येण्यासाठी काही तास शिल्लक असताना एक लाखाहून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत.
डोंबिवली : येथील जोंधळे विद्यासमुहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे यांच्यासह इतर चार जणांनी डोंबिवलीतील एका डॉक्टरचे बनावट शीर्षक पत्र, त्यावर चालक डॉक्टरची खोटी स्वाक्षरी, शिक्के मारून वैद्यकीय उपचाराचे प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे मृत्यूपत्र तयार केले.
विरार पूर्वेच्या टोटाळे तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अमित मोहिते (२४) असे या तरुणाचे नाव असून बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सविस्तर वाचा
अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणूकीत रात्री दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशीरा जमाववर लाठीमार केला. काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.
मी जयंत पाटलांना सांगितलं होतं की सरकारची गडबड होतेय काय करणार? तर मी म्हटलं की तुम्ही एक करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन, पण मला मुख्यमंत्री करावं लागेल - नरहरी झिरवाळ
पुणे : काल सकाळी साडे दहा वाजल्यापासून जवळपास २६ तासापासून विसर्जन मिरवणुक सुरू आहे. तर देखील नागरिकांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नाही. विसर्जन मिरवणुक मार्गावर नागरिक अद्यापही उपस्थित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात येत आहेत. येथील स्वावलंबी मैदानावर त्यांची सभा होत असून विश्वकर्मा मेळाव्यास ते संबोधित करतील. यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू असून शहराचे रुपडेच बदलत आहे. सभास्थळी जाणारे सर्व मार्ग चकाचक होत असून आजवर नं निघालेले सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केल्या जात आहे.
नाशिक : गणेश विसर्जनादरम्यान शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात तीन युवक बुडाले. पाथर्डी गावालगत वालदेवी नदीत दोघांचा मृत्यू झाला. तर बेळगाव ढगा शिवारात दगडाच्या खाणीत १९ वर्षीय युवक बुडाला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली होती, त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या, पण पावसाने भक्तांच्या उत्साहात खोळंबा घातला नाही. अगदी विसर्जनाच्या दिवशी सुद्धा पाऊस कोसळतो की काय असे वाटत असतांनाच विसर्जनाच्या दिवशी देखील पावसाने भक्तांच्या उत्साहावर विरजण घातले नाही. सविस्तर वाचा…
इंटरनेटवर शोधाशोध करून बियांपासून कमळाची लागवड कशी करायची याची माहिती मिळवली. आता या बिया मिळवायच्या कशा? मग आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात गेले. दहा रूपयाला एक याप्रमाणे पाच बिया आणल्या. कमळाच्या बिया या अतिशय कठीण असतात.
देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून १३ महिन्याने मुक्त झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास लातूरच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. सविस्तर वाचा…
गेल्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने घोषित केलेल्या ४६ हजार कोटी रुपयांपैकी २९ हजार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला. सविस्तर वाचा…
पिंपरी : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा झोपेतच धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (१८ सप्टेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
रश्मी ठाकरेंनी राजकारणात रस घेतलेला नाही. त्या त्यांच्या पतीच्या सोबत असतात पण त्यांना राजकारणात रस नाही. महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, पण कारण नसताना रश्मी वहिनींचं नाव असता कामा नये - किशोरी पेडणेकर, माजी महापौर, मुंबई</p>
Maharashtra News Live Today, 18 September 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर