Mumbai Maharashtra News Updates, 18 September 2024 : आपल्या लाडक्या गणरायाचं वाजत-गाजत विसर्जन झालं आहे. अनंत चतुर्दशीपासून सुरुवात झालेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर आज अनेक बाप्पांचे साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. त्यामुळे आता बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असेल. विधानसभा निवडणूक अद्यापही लागलेली नसली तरीही विविध पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. जागावाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल इथपर्यंत चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे आता यापुढे राज्याच्या राजकारणात विविध गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडीही पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Today, 18 September 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

20:02 (IST) 18 Sep 2024
अकोला : मनसैनिक जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; नेमकं घडलं काय?

अकोला : मनसैनिक जय मालोकार (२४) याच्या मृत्यू प्रकरणाला शवविच्छेदन अवाहलातून धक्कादायक वळण प्राप्त झाले आहे.

सविस्तर वाचा…

19:49 (IST) 18 Sep 2024
रायगड : दिव्यांग व्यक्तींची फसवणूक, महामंडळाच्या कार्यालयाबाहेर भीमशक्ती संघटनेचे आंदोलन

अपंग वित्त महामंडळ जिल्हा कार्यालय यांच्याकडून जिल्हातील २३ दिव्यांग व्यक्तींना इको कंपनीकडून रिक्षावाटप करण्यात आले असून यामध्ये सर्वांची फसवणूक झाली आहे. तरी संबंधित कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी नगर येथे महामंडळाच्या कार्यालयाबाहेर भीमशक्ती संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करून आंदोलन करण्यात येत असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

19:24 (IST) 18 Sep 2024
‘वन नेशन वन इलेक्शन’वर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “हे सर्व सोप नाही”

“देशात वन नेशन वन इलेक्शन या विधेयकासंदर्भात मी आता पूर्ण वाचलं नाही. त्यामुळे मी आता त्याबाबत सविस्तर बोलणं योग्य होणार नाही. लोकशाहीमध्ये हे शक्य आहे का नाही? याबाबत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात चर्चा होणं गरजेचं आहे. हे सर्व सोप नाही. पण अशा पद्धतीने निवडणुका घेणं शक्य आहे का? हे आधी पाहावं लागेल”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

19:21 (IST) 18 Sep 2024
नाशिक : ध्वनिप्रदूषण नियम उल्लंघनाचे दोन गुन्हे – परवानगीविना मिरवणुकीमुळे मंडळाविरुध्द गुन्हा

नाशिक : गणेशोत्सवात मुभा मिळाल्याने शहरातील मुख्य मिरवणुकीसह वेगवेगळ्या भागात निघालेल्या मिरवणुकीत आवाजाच्या भिंती उभारल्या गेल्या.

सविस्तर वाचा…

18:45 (IST) 18 Sep 2024
एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाची दुसरी फेरी २६ सप्टेंबरपासून

मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील प्रवेश ५ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचे वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केले आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात करीत आहे. दरम्यान, १ ऑक्टोबरपासून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

सविस्तर वाचा….

18:20 (IST) 18 Sep 2024
गडचिरोली : रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले

गडचिरोली : एकीकडे अपुऱ्या सुविधेमुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचे चित्र असताना डॉक्टरलाच दारू तस्करी करताना अटक करण्यात आल्याने गडचिरोली आरोग्य विभाग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सविस्तर वाचा….

18:06 (IST) 18 Sep 2024
Video : रायगडमध्ये बसला दुचाकीची धडक, तिघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद

अलिबाग- रायगड जिल्ह्यात शाळेच्या बसला दुचाकीने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. खोपोली पाली  राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. श्रीराज एज्युकेशनल सेंटरची स्कूल बस विद्यार्थ्यांघेऊन निघाली होती. यावेळी परळीच्या पुढे एका वळणावर हा अपघात झाला. सविस्तर वाचा…

18:06 (IST) 18 Sep 2024
बुलढाणा : गणेश विसर्जन; युवकाचा तलावात बुडून मृत्यू

बुलढाणा: गणपती विसर्जनाच्या दरम्यान येथील एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. नयन गजानन नाटेकर ( वय २३ वर्षे राहणार अण्णाभाऊ साठे नगर, वार्ड क्रमांक १ बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. काल मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी रात्री तो गणपती विसर्जनासाठी बुलढाणा मलकापूर मार्गावरील कर्‍हाळे ले आऊट येथील तलावाकडे मिरवणुकीसह गेला होता. तलावात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहर पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. घटनेचा तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.

18:04 (IST) 18 Sep 2024
पदव्युत्तर आयुर्वेद, होमियोपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयातील आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखिल भारतीय व राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी २६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा….

17:19 (IST) 18 Sep 2024
मुंबई : आमचा प्रश्न… कामातील चुकांमुळे मोटरमनला सक्तीच्या निवृत्तीची शिक्षा ?

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या लोकलचे सारथ्य करणारे मोटरमन सध्या वेगळ्याच विवंचनेत अडकले आहेत.

सविस्तर वाचा….

17:16 (IST) 18 Sep 2024
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांचे सुरू झालेले उपोषण, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी या समाजाच्या युवकांचे पंढरपूरमध्ये सुरू असलेले उपोषण, धनगर समाजाच्या आरक्षणावरून आक्रमक झालेला आदिवासी समाज, मराठा समाजाला आपल्या आरक्षणात वाटेकरी करू नये यासाठी आग्रही असलेला ओबीसी समाज यातून सर्व समाजांना चुचकारण्याचे मोठे आव्हान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारसमोर उभे ठाकले आहे. सविस्तर वाचा

17:13 (IST) 18 Sep 2024
अखेर २८ तासांनी संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक, शेवटचा गणपती भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाचा

पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडई येथील पुतळ्यापासून काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली.

सविस्तर वाचा

16:52 (IST) 18 Sep 2024
अखेर विद्यार्थ्यांचा विजय… ‘टीस’ने प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमवरील बंदी उठवली

मुंबई : टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्समध्ये (‘टीस’) विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) या संस्थेवर १९ ऑगस्ट रोजी घालण्यात आलेली बंदी अखेर ‘टीस’ प्रशासनाने मागे घेतली.

सविस्तर वाचा…

16:37 (IST) 18 Sep 2024
मुंबई : म्हाडा भवनात हिरकणी कक्ष, कामानिमित्त तान्ह्या बाळाला घेऊन येणाऱ्या महिलांसाठी सुविधा

मुंबई : म्हाडाचे वांद्रे पूर्व येथील मुख्यालय असलेल्या म्हाडा भवनात घराचा ताबा घेण्यासह विविध कामांसाठी तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांची अनेकदा अडचण होते. स्तनपान वा बाळाच्या आरामासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. आता मात्र त्यांची ही गैरसोय दूर होणार आहे.

सविस्तर वाचा….

16:23 (IST) 18 Sep 2024
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट

छत्रपती संभाजीनगर – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या तोंडावर घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील स्थानिक विरोधकांनी मोट बांधून सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष समिती’ हा एक मंच स्थापन केला आहे.

सविस्तर वाचा…

15:29 (IST) 18 Sep 2024
सोडतीला प्रतिसाद वाढतोय, इच्छुक अर्जदार लाखा पार; अनामत रक्कमेसह ७९ हजारांहून अधिक अर्ज

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेची मुदत संपुष्टात येण्यासाठी काही तास शिल्लक असताना एक लाखाहून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत.

वाचा सविस्तर…

15:08 (IST) 18 Sep 2024
डोंबिवलीतील डॉक्टरचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून शिवाजीराव जोंधळेंचे मृत्यूपत्र

डोंबिवली : येथील जोंधळे विद्यासमुहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे यांच्यासह इतर चार जणांनी डोंबिवलीतील एका डॉक्टरचे बनावट शीर्षक पत्र, त्यावर चालक डॉक्टरची खोटी स्वाक्षरी, शिक्के मारून वैद्यकीय उपचाराचे प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे मृत्यूपत्र तयार केले.

वाचा सविस्तर…

14:53 (IST) 18 Sep 2024
विसर्जना दरम्यान गणेशभक्ताचा तलावात बुडून मृत्यू ; विरार येथील घटना

विरार पूर्वेच्या टोटाळे तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अमित मोहिते (२४) असे या तरुणाचे नाव असून बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सविस्तर वाचा

14:48 (IST) 18 Sep 2024
भिवंडीत विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; तणावाचे वातावरण, पोलिसांकडून मध्यरात्री लाठीमार

अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणूकीत रात्री दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशीरा जमाववर लाठीमार केला. काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

सविस्तर वाचा…

14:30 (IST) 18 Sep 2024
नरहरी झिरवाळांनीही केला होता मुख्यमंत्री पदावर दावा; म्हणाले, “मी जयंत पाटलांना…”

मी जयंत पाटलांना सांगितलं होतं की सरकारची गडबड होतेय काय करणार? तर मी म्हटलं की तुम्ही एक करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन, पण मला मुख्यमंत्री करावं लागेल – नरहरी झिरवाळ

13:08 (IST) 18 Sep 2024
Pune Ganesh Visarjan 2024 : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजेपर्यंत संपण्याची शक्यता

पुणे : काल सकाळी साडे दहा वाजल्यापासून जवळपास २६ तासापासून विसर्जन मिरवणुक सुरू आहे. तर देखील नागरिकांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नाही. विसर्जन मिरवणुक मार्गावर नागरिक अद्यापही उपस्थित आहेत.

वाचा सविस्तर…

13:04 (IST) 18 Sep 2024
पंतप्रधानांचा दौरा अन् प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज दिवसभर जिल्ह्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात येत आहेत. येथील स्वावलंबी मैदानावर त्यांची सभा होत असून विश्वकर्मा मेळाव्यास ते संबोधित करतील. यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू असून शहराचे रुपडेच बदलत आहे. सभास्थळी जाणारे सर्व मार्ग चकाचक होत असून आजवर नं निघालेले सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केल्या जात आहे.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 18 Sep 2024
नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू

नाशिक : गणेश विसर्जनादरम्यान शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात तीन युवक बुडाले. पाथर्डी गावालगत वालदेवी नदीत दोघांचा मृत्यू झाला. तर बेळगाव ढगा शिवारात दगडाच्या खाणीत १९ वर्षीय युवक बुडाला.

वाचा सविस्तर…

12:38 (IST) 18 Sep 2024
राहुल गांधींच्‍या जिभेला चटकेच दिले पाहिजे….. आमदार गायकवाडांनंतर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने थेट…..

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली होती, त्‍यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्‍हा एकदा वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 18 Sep 2024
Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या, पण पावसाने भक्तांच्या उत्साहात खोळंबा घातला नाही. अगदी विसर्जनाच्या दिवशी सुद्धा पाऊस कोसळतो की काय असे वाटत असतांनाच विसर्जनाच्या दिवशी देखील पावसाने भक्तांच्या उत्साहावर विरजण घातले नाही. सविस्तर वाचा…

12:35 (IST) 18 Sep 2024
निसर्गलिपी : कमळाचे दिवस…

इंटरनेटवर शोधाशोध करून बियांपासून कमळाची लागवड कशी करायची याची माहिती मिळवली. आता या बिया मिळवायच्या कशा? मग आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात गेले. दहा रूपयाला एक याप्रमाणे पाच बिया आणल्या. कमळाच्या बिया या अतिशय कठीण असतात.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 18 Sep 2024
मुक्तीसंग्राम कार्यक्रमाला लातूरमध्ये पालकमंत्र्यांपासून खासदार-आमदारांची दांडी

देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून १३ महिन्याने मुक्त झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास लातूरच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. सविस्तर वाचा…

12:33 (IST) 18 Sep 2024
Row Over Marathwada Package : मराठवाडा पॅकेजमधील योजनांच्या अंमलबजावणीवरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी

गेल्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने घोषित केलेल्या ४६ हजार कोटी रुपयांपैकी २९ हजार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला. सविस्तर वाचा…

11:57 (IST) 18 Sep 2024
पिंपरी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून झोपेतच गळा चिरून तरुणाचा खून

पिंपरी : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा झोपेतच धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (१८ सप्टेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

वाचा सविस्तर…

11:10 (IST) 18 Sep 2024
“राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाव्यात, पण रश्मी ठाकरेंचं नाव नको”, किशोरी पेडणेकरांच्या विधानाची चर्चा

रश्मी ठाकरेंनी राजकारणात रस घेतलेला नाही. त्या त्यांच्या पतीच्या सोबत असतात पण त्यांना राजकारणात रस नाही. महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, पण कारण नसताना रश्मी वहिनींचं नाव असता कामा नये – किशोरी पेडणेकर, माजी महापौर, मुंबई</p>

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह