Mumbai Pune Live News Updates, 25 September 2024: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाच्या मृत्यूचा विशेष तपास पथकाककडून तपास करण्याची मागणी केली. या मागणीवर आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसल्यामुळे मराठवाड्यात तणाव पाहायला मिळत आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआच्या घटक पक्षांत जागावाटपाची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 25 September 2024 | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

15:51 (IST) 25 Sep 2024
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…

नागपूर : आगामी विधानसभा निडवणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, मुस्लीम समाज ‘शहाणा’ झाला असून चिथावणीखोर वक्तव्याला भीक घालत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अपेक्षित धार्मिक दंगली महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाही, असे वक्तव्य अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले.

सविस्तर वाचा....

15:48 (IST) 25 Sep 2024
नाशिक : सर्पदंशामुळे बालकाचा मृत्यू

चांदवड तालुक्यात सर्पदंशामुळे ११ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

15:03 (IST) 25 Sep 2024
वसई: खैर तस्करीवर मांडवी वनविभागाची कारवाई, ७६८ नग खैर जप्त

खैर वृक्षाची लाकडं टेम्पोत भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले आहे. यात खैर वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वाचा...

14:46 (IST) 25 Sep 2024
Maharashtra News Live: “बाजारबुणगा नागपुरात येऊन…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विरोधकांना संपविण्याची भाषा केली, असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच हे बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन आम्हाला संपविण्याची भाषा बोलतात, मात्र आगामी निवडणुकीत तेच संपतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच भाजपामधील नेते आमच्याकडे यायला सुरूवात झाली असून भाजपाचा उलटा प्रवास सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

14:34 (IST) 25 Sep 2024
शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात

‘तुमची अवस्था महेश गायकवाड यांच्यासारखी करू’, अशाप्रकारच्या धमक्या संबंधित पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 25 Sep 2024
जागावाटपावर उशिरा रात्रीपर्यंत खल, समन्वयाने चर्चा सुरू असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाची महायुतीची बोलणी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होती. जागावाटपाचे सूत्र ठरले का, जागा वाटपाच्या बोलणीतील नक्की काय झाले याचे तपशील बाहेर आले नाहीत.

सविस्तर वाचा....

14:13 (IST) 25 Sep 2024
पुणे: जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळेना! सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात नाही आणि आम्ही सुचविलेली काम नाकारली जात आहेत.

सविस्तर वाचा...

14:05 (IST) 25 Sep 2024
पामबीचवर मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब

अपघातानंतर जवळजवळ प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तासभरापेक्षा अधिक वेळाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.

सविस्तर वाचा...

14:03 (IST) 25 Sep 2024
‘तुमच्या हद्दीत महापालिकेला पाणी देणे शक्य नाही’; पाण्यावरून महापालिका आणि पीएमआरडीए आमने-सामने

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होणार नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पीएमआरडीए प्रशासनाला लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

सविस्तर वाचा....

14:02 (IST) 25 Sep 2024
कल्याणमधील १६५ रस्ते बाधितांमधील पाच लाभार्थींना मिळाली २४ वर्षांनी घरे

कल्याण – कल्याणमधील शंकरराव चौक, दुधनाका-पारनाका ते टिळक चौक या यु आकाराच्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम कल्याण डोंबिवली पालिकेकडून २४ वर्षापूर्वी करण्यात आले. या रस्ते रुंदीकरणातील बाधितांना पालिकेने कारवाईपूर्वी कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे १६५ घरे, व्यापारी गाळे बाधित बेघर झाले.

सविस्तर वाचा....

14:00 (IST) 25 Sep 2024
राज्यात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू, गेल्या पाच वर्षांत देशभरात ६८७ जण दगावले

मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा सोमवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूंचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील पोलीस कोठडीत ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर...

13:59 (IST) 25 Sep 2024
Maharashtra News Live : नवव्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषणाची सांगता केली आहे.

13:26 (IST) 25 Sep 2024
नालासोपार्‍यात ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार

वसई : नालासोपारा येथे ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे. नालासोपार्‍याती सामूहिक लैंगिक अत्याचाराची महिन्याभराती ही ७ वी घटना आहे.

वाचा सविस्तर...

13:17 (IST) 25 Sep 2024
आज माऊलींचा बुक्का लाऊन पंढरीतून निघतोय , आरक्षण नाही मिळाले तर सरकारला बुक्का लावू...

पंढरपूर : आज माऊलींचा बुक्का लावून पंढरीतून निघालो आहे.आरक्षण मिळाले नाही तर सरकारला बुक्का लावू असा निर्धार माऊली हळणवर यांनी व्यक्त केला. धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण स्थगित केल्या नंतर आज सहा धनगर बांधवांनी विठ्ठल दर्शन घेऊन संभाजीनगरकडे प्रयाण केले.

13:12 (IST) 25 Sep 2024
Akshay Shinde Encounter Hearing: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1838845291186790884

13:05 (IST) 25 Sep 2024
Akshay Shinde Encounter Hearing: पिस्तुल आधीच लोड केलेले होते; यावर विश्वास बसत नाही, उच्च न्यायालयाकडून झाडाझडती

पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. त्याने पिस्तुलचे लॉक कसे काय उघडले? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो, अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना आणि पोलिसांना सुनावले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1838837385049571774

12:58 (IST) 25 Sep 2024
Akshay Shinde Encounter Hearing : अक्षय शिंदेंनी पालकांकडे ५०० रुपये मागितले होते

अक्षय शिंदेंच्या पालकांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, एन्काऊंटर होण्यापूर्वी अक्षयने पालकांकडे ५०० रुपये मागितले होते. जेणेकरून त्याला कँटिनमधून काही पदार्थ घेऊन खाता येतील. त्यावेळी त्याची परिस्थिती हलाखीची होती. तो पळून जाण्याच्या मानसिकतेत नव्हता किंवा त्याच्या शरीरात तेवढी ताकदही नव्हती की तो पिस्तुल खेचू शकेल.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1838828168569876516

12:55 (IST) 25 Sep 2024
फसवणुकीप्रकरणी मोहित कंबोज यांना दिलासा, १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे प्रकरण बंद

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल फसवणुकीचे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयने दाखल केलेला अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्वीकारला. त्यामुळे, कंबोज यांना दिलासा मिळाला आहे.

वाचा सविस्तर...

12:54 (IST) 25 Sep 2024
Akshay Shinde Encounter Hearing: चार पोलीस व्हॅनमध्ये असताना अक्षय शिंदेंने पिस्तुल हिसकावलीच कशी? उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई उच्च न्यायालयात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर सुनावणी सुरू असून यासाठी अक्षयचे आई-वडील न्यायालयात हजर आहेत. याचिकाकर्त्यांनी ठाणे पोलिसांनी एन्काऊंटरनंतर काढलेले प्रसिद्धी पत्रक वाचून दाखविले. यातील त्रुटी लक्षात आणून देताना त्यांनी या खटल्याचा तपास हत्या म्हणून कारावा अशी मागणी केली.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1838826929555755108

12:54 (IST) 25 Sep 2024
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?

नागपूर: राज्य सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी महत्त्वाची असणारी उत्पन्नाची अट रद्दबातल केली आहे.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 25 Sep 2024
सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत नवापाड्यात सुभाष रस्त्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या नवापाडा शाळेजवळ भूमाफियांनी सामासिक अंतर न सोडता आजुबाजूच्या चाळी, इमारतींना खेटून आठ माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे.

सविस्तर वाचा....

12:14 (IST) 25 Sep 2024
गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठत्यांना उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : भांडुप येथील महापालिका रुग्णालयात भ्रमणध्वनी टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करताना गर्भवती आणि बाळाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना बुधवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश मंगळवारी दिले.

वाचा सविस्तर...

12:03 (IST) 25 Sep 2024
अमरावती विद्यापीठात मुलींची संख्‍या अधिक; काय आहे ‘जेंडर ऑडिट’मध्ये ?

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे.

सविस्तर वाचा....

12:02 (IST) 25 Sep 2024
चेरापुंजीमध्ये इतिहासातील उच्चांकी तापमान; जाणून घ्या, तापमान वाढ का झाली

पुणे : जगातील सर्वांधिक पर्जन्यवृष्टी होणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीमध्ये रविवारी उच्चांकी ३३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ६ सप्टेंबर १९६९ रोजी ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. ईशान्य भारताला उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत असून, तापमान वाढीमुळे शाळांना चार दिवसांची सुटी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा....

11:47 (IST) 25 Sep 2024
कासच्या पर्यटकांची बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक

सातारा : कास पठारावर जाण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करत त्यांची नोंद आणि त्यानुसार पैसे घेत पर्यटकांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या १३ जणांच्या पथकाची अशी फसवणूक झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे.

वाचा सविस्तर...

11:44 (IST) 25 Sep 2024
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांचे लागू असलेल्या ज्यादा क्षेत्रफळासाठी आता पूर्वीपेक्षा कमी दर मोजावा लागणार आहे.

वाचा सविस्तर...

11:41 (IST) 25 Sep 2024
प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचे बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

वाचा सविस्तर...

11:26 (IST) 25 Sep 2024
Maharashtra News Live: अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक, जागावाटपावर चर्चा

केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी २४ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेऊन जागावाटपावर चर्चा केली. विदर्भ आणि मराठवाड्यावर भाजपाने विशेष लक्ष दिले असून याठिकाणी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

11:18 (IST) 25 Sep 2024
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे सरकारने गांभीर्याने विचार करावा- पृथ्वीराज चव्हाण

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले असून उपोषणाचा ९वा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून त्यांचे उपोषण सोडवावे. त्यांचे जीवन अत्यंत मोलाचे आहे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

11:15 (IST) 25 Sep 2024
Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाच्या मृत्यूचा विशेष तपास पथकाककडून तपास करण्याची मागणी केली. या मागणीवर आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Solapur flight service will be launched tomorrow by the Prime Minister Narendra modi

सोलापूर विमानसेवेचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्या प्रारंभ ( संग्रहित छायाचित्र )/ लोकसत्ता