Maharashtra Rain Alert Update, 25 September 2024: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाच्या मृत्यूचा विशेष तपास पथकाककडून तपास करण्याची मागणी केली. या मागणीवर आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसल्यामुळे मराठवाड्यात तणाव पाहायला मिळत आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआच्या घटक पक्षांत जागावाटपाची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra News Live Today, 25 September 2024 | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
नाशिक – महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे. महिला सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन याचा मेळ घालत शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने लवकरच गरजू महिलांना गुलाबी इ- रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ७०० महिला यासाठी पात्र राहतील.
धुळे : शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान आणि रोहिणी या गावांच्या परिसरात छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीरपणे करण्यात येणारी गांजा शेती उघडकीस आणली. कापूस आणि तूर या पिकांच्याआड आंतरपीक म्हणून गांजा लागवड झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे : काँग्रेस पक्षातंर्गत वाद नवीन नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील वाद शमतील, असे वाटत असताना धुळे येथे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव काझी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत वाद उफाळून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटप्रकरणातील आता पुढची सुनावणी १ ऑक्टोबरला
अजित पवारांनी जाहिरातीत चेतावणी न दिल्याने शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका
Supreme Court adjourns to October 1 plea by veteran Maharashtra politician Sharad Pawar alleging that Ajit Pawar faction of Nationalist Congress Party (NCP) failed to discuss to publish disclaimers in ads that the clock symbol allocated to them faction still subject to judicial… pic.twitter.com/6q0faYkZ9S
— Bar and Bench (@barandbench) September 25, 2024
भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 25, 2024
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी…
अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे हातात रिव्हॉल्वर असलेले आणि “बदला पुरा” असे लिहिलेले पोस्टर झळकले. या पोस्टरवरून सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. जर गृहमंत्रीच हातात पिस्तुल घेऊन बॅनर लावत असतील तर तरुणांमध्ये काय संदेश जाईल. ही मिर्झापूर सीरीज नाहीये, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
कल्याण : व्यावसायिकाला मलंंगगड रोड भागात एका इमारतीत नेऊन त्याला तेथे बांधून तीन जणांनी त्याच्या जवळील ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
समाजवादी चळवळीचे नेते आणि बर्वे एज्युकेशन ट्रस्टचे सचिव सुरेश वायंकरण यांचे बुधवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.
नागपूर : आगामी विधानसभा निडवणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, मुस्लीम समाज ‘शहाणा’ झाला असून चिथावणीखोर वक्तव्याला भीक घालत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अपेक्षित धार्मिक दंगली महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाही, असे वक्तव्य अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले.
चांदवड तालुक्यात सर्पदंशामुळे ११ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला.
खैर वृक्षाची लाकडं टेम्पोत भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले आहे. यात खैर वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विरोधकांना संपविण्याची भाषा केली, असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच हे बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन आम्हाला संपविण्याची भाषा बोलतात, मात्र आगामी निवडणुकीत तेच संपतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच भाजपामधील नेते आमच्याकडे यायला सुरूवात झाली असून भाजपाचा उलटा प्रवास सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
‘तुमची अवस्था महेश गायकवाड यांच्यासारखी करू’, अशाप्रकारच्या धमक्या संबंधित पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाची महायुतीची बोलणी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होती. जागावाटपाचे सूत्र ठरले का, जागा वाटपाच्या बोलणीतील नक्की काय झाले याचे तपशील बाहेर आले नाहीत.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात नाही आणि आम्ही सुचविलेली काम नाकारली जात आहेत.
अपघातानंतर जवळजवळ प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तासभरापेक्षा अधिक वेळाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होणार नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पीएमआरडीए प्रशासनाला लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
कल्याण – कल्याणमधील शंकरराव चौक, दुधनाका-पारनाका ते टिळक चौक या यु आकाराच्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम कल्याण डोंबिवली पालिकेकडून २४ वर्षापूर्वी करण्यात आले. या रस्ते रुंदीकरणातील बाधितांना पालिकेने कारवाईपूर्वी कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे १६५ घरे, व्यापारी गाळे बाधित बेघर झाले.
मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा सोमवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूंचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील पोलीस कोठडीत ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषणाची सांगता केली आहे.
वसई : नालासोपारा येथे ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे. नालासोपार्याती सामूहिक लैंगिक अत्याचाराची महिन्याभराती ही ७ वी घटना आहे.
पंढरपूर : आज माऊलींचा बुक्का लावून पंढरीतून निघालो आहे.आरक्षण मिळाले नाही तर सरकारला बुक्का लावू असा निर्धार माऊली हळणवर यांनी व्यक्त केला. धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण स्थगित केल्या नंतर आज सहा धनगर बांधवांनी विठ्ठल दर्शन घेऊन संभाजीनगरकडे प्रयाण केले.
अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत.
J Mohite-Dere: We want you to preserve the CCTV footages right from the time he came out of his barrack, sat in the vehicle, went to court and then till upto Shivaji Hospital, where he was declared dead.
— Live Law (@LiveLawIndia) September 25, 2024
Bench is now passing an order.#BombayHighCourt #BadlapurEncounter
पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. त्याने पिस्तुलचे लॉक कसे काय उघडले? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो, अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना आणि पोलिसांना सुनावले.
J Mohite-Dere: When was the body sent for postmortem? Was it video graphed? What was the cause of dead? What injury to deceased and what to the officer?

Venegavkar: Body sent at 8 AM to JJ Hospital. Videographed autopsy. Cause was bleeding. Bullet pierced one side of the head…
अक्षय शिंदेंच्या पालकांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, एन्काऊंटर होण्यापूर्वी अक्षयने पालकांकडे ५०० रुपये मागितले होते. जेणेकरून त्याला कँटिनमधून काही पदार्थ घेऊन खाता येतील. त्यावेळी त्याची परिस्थिती हलाखीची होती. तो पळून जाण्याच्या मानसिकतेत नव्हता किंवा त्याच्या शरीरात तेवढी ताकदही नव्हती की तो पिस्तुल खेचू शकेल.
Petitioner: My client had met his son just few hours before the his fake encounter. His mannerisms did not indicate about any intent to escape. He in fact asked the parents for giving him some Rs 500, so that he can avail canteen services. He was not in a state to escape or had…

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल फसवणुकीचे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयने दाखल केलेला अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्वीकारला. त्यामुळे, कंबोज यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर सुनावणी सुरू असून यासाठी अक्षयचे आई-वडील न्यायालयात हजर आहेत. याचिकाकर्त्यांनी ठाणे पोलिसांनी एन्काऊंटरनंतर काढलेले प्रसिद्धी पत्रक वाचून दाखविले. यातील त्रुटी लक्षात आणून देताना त्यांनी या खटल्याचा तपास हत्या म्हणून कारावा अशी मागणी केली.
Petitioners' Counsel is reading from a Press Note issued by the Badlapur Police regarding the alleged fake encounter.

Petitioner: My case is that this is a fake encounter case. My prayers are to order probe in the murder, registration of FIR against the erring officers and to…
नागपूर: राज्य सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी महत्त्वाची असणारी उत्पन्नाची अट रद्दबातल केली आहे.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत नवापाड्यात सुभाष रस्त्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या नवापाडा शाळेजवळ भूमाफियांनी सामासिक अंतर न सोडता आजुबाजूच्या चाळी, इमारतींना खेटून आठ माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे.