Maharashtra Rain Alert Update, 25 September 2024: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाच्या मृत्यूचा विशेष तपास पथकाककडून तपास करण्याची मागणी केली. या मागणीवर आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसल्यामुळे मराठवाड्यात तणाव पाहायला मिळत आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआच्या घटक पक्षांत जागावाटपाची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra News Live Today, 25 September 2024 | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
मुंबई : भांडुप येथील महापालिका रुग्णालयात भ्रमणध्वनी टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करताना गर्भवती आणि बाळाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना बुधवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश मंगळवारी दिले.
पुणे : जगातील सर्वांधिक पर्जन्यवृष्टी होणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीमध्ये रविवारी उच्चांकी ३३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ६ सप्टेंबर १९६९ रोजी ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. ईशान्य भारताला उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत असून, तापमान वाढीमुळे शाळांना चार दिवसांची सुटी देण्यात आली आहे.
सातारा : कास पठारावर जाण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करत त्यांची नोंद आणि त्यानुसार पैसे घेत पर्यटकांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या १३ जणांच्या पथकाची अशी फसवणूक झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांचे लागू असलेल्या ज्यादा क्षेत्रफळासाठी आता पूर्वीपेक्षा कमी दर मोजावा लागणार आहे.
मुंबई : प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचे बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी २४ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेऊन जागावाटपावर चर्चा केली. विदर्भ आणि मराठवाड्यावर भाजपाने विशेष लक्ष दिले असून याठिकाणी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले असून उपोषणाचा ९वा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून त्यांचे उपोषण सोडवावे. त्यांचे जीवन अत्यंत मोलाचे आहे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाच्या मृत्यूचा विशेष तपास पथकाककडून तपास करण्याची मागणी केली. या मागणीवर आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.