Today’s Live News Update, 29 December 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपावरून इंडिया आघाडीमध्ये वाद-प्रतिवाद झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेना उबाठा गटाने २३ जागांवर दावा केला असून काँग्रेसने एवढ्या जागा शिवसेनेला सोडण्यास विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जागावाटपाची चर्चा माध्यमांसमोर न करता बंद खोलीत करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत धडक देण्याचा मार्ग जाहीर केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काँग्रेसचा १३९ वा वर्धापन दिन नागपूर येथे (दि. २८ डिसेंबर) संपन्न झाल्यानंतर त्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.

यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…

Live Updates

Marathi News Live Updates in Marathi : प्रत्येक घडामोड एका क्लिकवर जाणून घ्या...

19:04 (IST) 29 Dec 2023
उद्धव ठाकरे, राज ठाकरे शरद पवार, आठवले, आंबेडकर यांना राम मंदिराचे निमंत्रण

श्री राम मंदिर न्यासाने महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण पत्रिका कुरिअरने पाठविली आहे, अशी माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून हे नेते राम मंदिर उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर निमंत्रण पत्रिका धाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

18:12 (IST) 29 Dec 2023
पुण्यात यंदा घर खरेदीला अच्छे दिन! देशात पटकावला दुसरा क्रमांक

अनारॉक ग्रुपने प्रमुख सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल गुरुवारी जाहीर केला. त्यात दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या महानगरांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 29 Dec 2023
सांगलीत नाट्यसंमेलनाची मुहुर्तमेढ; राज्यात ७५ नाट्यगृहे उभारणार – मंत्री मुनगंटीवार

सांगलीत शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहुर्तमेढ सोहळा आज संपन्न झाला. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते.

सविस्तर वाचा...

17:51 (IST) 29 Dec 2023
नवीन नाट्यगृहांसोबत जुन्यांचीही दुरुस्ती करा, नाटककार प्रशांत दामलेंची मागणी

राज्यात अनेक नाट्यगृहे उभारण्यात आली आहेत. मात्र, या नाट्यगृहांची सध्या दुरवस्था झाली आहे. राज्य शासन आता कोट्यवधी रुपये खर्चून नवीन ७० नाट्यगृहे उभारणार आहे. मात्र, नवीन सोबत जुन्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून त्यांना पुनरुज्जीवित करावे अशी मागणी जेष्ठ अभिनेते, नाटककार प्रशांत दामले यांनी केली. सांगली शंभराव्या आखील भारतीय नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती.

17:24 (IST) 29 Dec 2023
विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; आजीच्या घरी उचलले टोकाचे पाऊल

बुलढाणा : इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या व आजीला भेटण्यासाठी आलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. साखरखेर्डा नजीकच्या राजेगांव येथे ही दुर्देवी घटना घडली. श्रद्धा जितेंद्र कंकाळ (वय १७) असे टोकाचे पाउल उचलणाऱ्या युवतीचे नाव आहे. ती संभाजी नगर येथे अकरावीत शिकत होती.

16:37 (IST) 29 Dec 2023
नवीन कात्रज बोगद्यात अपघात; एक मोटार थांबली अन् चार मोटारी आदळल्या

बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेली मोटार अचानक थांबली.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 29 Dec 2023
नाशिक : मजुरांअभावी जामनेर तालुक्यात कापूस झाडावरच, उत्पादनखर्चही निघेना; शेतकरी हतबल

कापसाला प्रतिक्विंटल सात हजारांचा भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 29 Dec 2023
नाशिक : नायलाॅन मांजा विक्रेत्यास अटक

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा...

15:47 (IST) 29 Dec 2023
दहिसर मधील मुरबाळी तलावाच्या दुरूस्तीसाठी ठाकरे गटाची निदर्शने, अकरा वर्षातच तलावाची दुरवस्था

दहिसर पूर्वेकडे असलेल्या पालिकेच्या मुरबाळी जलतरण तलावाची दुर्दशा झाली असून या तलावाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने शुक्रवारी निदर्शने केली.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 29 Dec 2023
पुढचे १० महिने मुंबईच्या घरी जाणार नाही, सुप्रिया सुळेंची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या आहेत. यावेळी बोलत असताना त्या म्हणाल्या की, मी पुढचे १० महिने आता मुंबईच्या घरी जाणार नाही. माझ्या पतीला आणि मुलांना याची कल्पना दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होईपर्यंत पुणे जिल्ह्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात दौरे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

15:30 (IST) 29 Dec 2023
प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यात घुमणार पिंपरी- चिंचवडचा ‘चौघडा’! वादक पाचंगेंना विशेष निमंत्रण

या सोहळ्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील चौघडा वादक रमेश पाचंगे यांची निवड करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

14:53 (IST) 29 Dec 2023
लग्नाचे आमिष दाखवून इंस्टाफ्रेंडचा तरुणीवर बलात्कार

नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या युवकाने तरुणीला घरी नेऊन वारंवार बलात्कार केला. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमित सुमित मालेवार (२९, बजाजनगर) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

14:42 (IST) 29 Dec 2023
यवतमाळ : हॉटेल, ढाब्यावर नववर्ष साजरे करताय? मग हे वाचाच…

यवतमाळ : नववर्षाच्या आगमनास काही तासांचा अवधी शिल्लक आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष जल्लोषात साजरे करण्यासाठी नागरिकांसह हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट सज्ज झाले आहेत. मात्र नववर्षाचे स्वागत करताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे.

सविस्तर वाचा...

14:37 (IST) 29 Dec 2023
संजय राऊत यांची स्मरणशक्ती कमी झाली असावी, संजय निरुपम यांची टीका

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. याबद्दल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीवर काही परिणाम होईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी करू नये. रोज माध्यमांसमोर येऊन इंडिया आघाडीवर बोलू नये, असा सल्ला संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना दिला.

14:12 (IST) 29 Dec 2023
चोरीला गेलेला सुमारे दीड कोटींचा ऐवज प्रवाशांना परत

मुंबई: रेल्वे प्रवाशांचा चोरीला गेलेला ऐवज शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांसह ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ सुरू आहे. या सुरक्षा मोहिमेद्वारे एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १.३८ कोटी रुपयांची चोरी झालेली मालमत्ता पोलिसांनी परत मिळवली आहे.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 29 Dec 2023
वसई : पालिकेचा आपला दवाखाना कंटेनरमध्ये; जागा आणि डॉक्टरांची अडचण कायम

आपला दवाखाना सुरू करण्यासाठी जागेची अडचण होती. त्यासाठी पालिकेने खासगी जागा घेण्यासाठी जाहिरात दिली होती. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 29 Dec 2023
गोदापात्रातील पानवेली निर्मूलनासाठी आता तणनाशकाचा प्रयोग; निरीच्या सहकार्याने नाशिक महापालिकेची तयारी

नाशिक: शहरी भागातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने गोदावरीसह राज्यातील अनेक प्रमुख नद्या पानवेलींच्या (जलपर्णी) विळख्यात सापडल्या आहेत. दुषित पाण्यात फोफावणाऱ्या आणि परिसरात दुर्गंधी पसरविण्यास कारक ठरलेल्या पानवेलींच्या निर्मूलनासाठी अनेक उपाय अयशस्वी ठरल्याने आता तणनाशक फवारणीद्वारे गोदावरीतील पानवेलींच्या उच्चाटनाचा मार्ग अनुसरला जाणार आहे.

सविस्तर वाचा...

13:58 (IST) 29 Dec 2023
राज ठाकरे 'लोकनेते' त्यांचे स्वागतच करू, संजय शिरसाट यांचे मोठे विधान

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाली. या भेटीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज ठाकरे हे मोठे लोकनेते आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन ते पुढे जात आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. महाराष्ट्रात महायुतीला लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच करू.

13:47 (IST) 29 Dec 2023
शीव-पनवेल महामार्गावरील पालिका हद्दीतील पथदीवे बंद, अपघातांची शक्यता

मागील काही दिवसांपासून वाशी उड्डाणपूल ते वाशी टोलनाका या मार्गावर पथदीवे बंद असून अपघातांची शक्यता वाढली आहे.

सविस्तर वाचा...

13:46 (IST) 29 Dec 2023
बेस्टच्या वीजग्राहकांना विजेची छापील बिले मिळेना; बेस्टच्या कार्यालयात बिलांचे गठ्ठे पडून

मुंबई: बेस्टच्या विजग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून विजेची छापील बिले मिळत नसल्याची तक्रार येऊ लागली आहे. छापील बिले मिळत नसल्यामुळे बिल भरायचे लक्षात राहत नाही व त्यामुळे दंड भरावा लागत असल्याची तक्रार ग्राहक करू लागले आहेत.

सविस्तर वाचा...

13:12 (IST) 29 Dec 2023
जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहतील, याची शाश्वती नाही - संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राम मंदिरावरून शिंदे गटावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती दिवस राहतील, याची शाश्वती ते स्वतः देऊ शकत नाहीत. त्यांच्या बद्दलची स्पष्ट मते किंवा त्यांची मागची कारकिर्द जाणून घ्यायची असेल तर अजित पवार यांच्याकडून जाणून घ्या, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी माध्यमांना दिली.

13:06 (IST) 29 Dec 2023
कल्याणमध्ये सात लाखाचा गुटखा जप्त; पाच आरोपी फरार

कल्याण: येथील पूर्व भागातील विठ्ठलवाडी भागातील एका बेकायदा चाळीत साठा करून ठेवलेला सात लाख रूपयांचा गुटखा कोळसेवाडी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला.

सविस्तर वाचा...

12:54 (IST) 29 Dec 2023
पनवेल : अपुऱ्या पाणीपुरवठ्याने उन्नती सोसायटीवासीय हैराण, स्वत:च्याच गृहप्रकल्पाकडे सिडकोचे दुर्लक्ष

बहुचर्चित गृहप्रकल्पांची घोषणा करून प्रत्यक्षात प्रकल्पांना आवश्यक सोयीसुविधा न देण्याचे प्रकार सिडकोकडून होत असल्याने सिडकोच्या प्रकल्पांवर सिडकोचीच खप्पामर्जी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

सविस्तर वाचा...

12:42 (IST) 29 Dec 2023
चेंबूरमध्ये सुरू होणार रक्तशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मूत्रपिंडग्रस्त रुग्णांची शारीरिक परिस्थिती विचारात घेता रुग्णांना जवळच्या रक्तशुद्धीकरण केंद्रांवर उपचार घेणे सुकर होते. त्यामुळे श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाने मुंबईतील विविध भागांमध्ये धर्मादाय संस्था व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दररोज किमान ३०० रुग्णांना रक्तशुद्धीकरण उपचार उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्याचा निश्चय केला आहे.

सविस्तर वाचा...

12:36 (IST) 29 Dec 2023
शिवसेनेच्या बेकायदेशीर कंटेनर शाखांवर कारवाई करण्याकडे अधिकाऱ्यांचा काणाडोळा

मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर त्रास होण्याची भीती असल्यामुळे अधिकारी याकडे काणाडोळा करत आहेत. याबाबत बोलण्यास अधिकाऱ्यांनी साफ नकार दिला आहे.

सविस्तर वाचा...

12:36 (IST) 29 Dec 2023
भाईंदर : ३० हजार भटक्या श्वानांच्या लसीकरणाचा निर्णय, रेबीजची लस देण्यासाठी पाच दिवसीय विशेष मोहीम

रेबीज लसीकरणाची मोहीम घेत असताना मोकाट श्वानांची जनगणना करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:35 (IST) 29 Dec 2023
अलिबाग : फिरते वस्तुसंग्रहालय विद्यार्थ्यांच्या भेटीला

भारतासह, ग्रीस, इजिप्त, असेरीया, रोम या देशातील शिल्प प्रतिकृती या वस्तूसंग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

12:34 (IST) 29 Dec 2023
धक्कादायक ! पुण्यात बांगलादेशी घुसखोरांनी काढले बनावट पासपोर्ट

परदेशी नागरिकांना भारतीय पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 29 Dec 2023
पिंपरी : वाकडमधील ‘टीडीआर’बाबत महापालिका आयुक्तांचे मोठे विधान, म्हणाले…

वाकड, भूमकर चौक येथील महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४/३८ हे ट्रक टर्मिनस व ४/३८ (अ) हे पीएमपीएमएल डेपोसाठी आरक्षित आहे.

सविस्तर वाचा...

12:31 (IST) 29 Dec 2023
विनाशस्त्रक्रिया प्रोस्टेट ग्रंथीवर आता उपचार! जाणून घ्या नवीन रिझूम थेरपी…

अवघ्या १० मिनिटांत कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करणारे ‘रिझूम थेरपी’ तंत्रज्ञान पुण्यातील बाणेरस्थित युरोकुल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे.

सविस्तर वाचा...

devendra fadnavis manoj jarange patil

मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी ( २८ डिसेंबर ) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. अशातच मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

Story img Loader