Today’s Live News Update, 29 December 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपावरून इंडिया आघाडीमध्ये वाद-प्रतिवाद झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेना उबाठा गटाने २३ जागांवर दावा केला असून काँग्रेसने एवढ्या जागा शिवसेनेला सोडण्यास विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जागावाटपाची चर्चा माध्यमांसमोर न करता बंद खोलीत करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत धडक देण्याचा मार्ग जाहीर केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काँग्रेसचा १३९ वा वर्धापन दिन नागपूर येथे (दि. २८ डिसेंबर) संपन्न झाल्यानंतर त्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…
Marathi News Live Updates in Marathi : प्रत्येक घडामोड एका क्लिकवर जाणून घ्या…
सध्या दिवसभरात मार्गिका एकवर ८१ फेऱ्या होत असून, नवीन वर्षात १ जानेवारीपासून ११३ फेऱ्या होणार आहेत.
ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह सहव्याधी आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
धुळे: महानगर पालिकेने सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिली नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने सहकुटूंब महानगरपालिका प्रवेशद्वारासमारे वाद्य वाजवून ‘आवाज सूनो’ आंदोलन केले.
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) रुग्णांना अद्ययावत उपचार मिळत असल्याचा दावा येथील प्रशासन करीत असते. परंतु, हा दावा किती फोल असून वरून सुसज्ज दिसणाऱ्या या इमारतीत गरीब रुग्णांची कशी फरफट होत आहे, याचे जळजळीत वास्तव ‘पेशंट्स राईट्स फोरम’च्या तक्रारीवरून समोर आले आहे.
नागपूर: अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीची बैठक गुरुवारी नागपुरातील हाॅटेल रेडिसन ब्लू येथे झाली. यात आगामी लोकसभेसह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या नियोजन व राहूल गांधी यांच्या भारत न्याय यात्रा आदी मुद्यांवर चर्चा झाली.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आरेवाडा ग्रामपंचायतीत पाच कोटींच्या विकासकामावरून माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या मुलाने आदिवासी महिला सरपंचासह सदस्यांना शिवीगाळ करुन धमकावल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणात ‘लोकसत्ता’ने बातमी प्रकाशित करताच दुसऱ्या दिवशी गुरुवारला अखेर माजी जि.प.अध्यक्षाच्या पुत्रावर अट्रॉसिटीनुसार भामरागड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वर्धा : नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त भव्य संमेलनाचे आयोजन झाले. नागपूरलगत असणाऱ्या जिल्ह्यांना गर्दीचे विशेष टार्गेट देण्यात आले होते. मात्र या गर्दी गोळा करण्याच्या मुद्द्यावरून राजी नाराजी नाट्य रंगले.
नागपूर : सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या अखत्यारितील बालोद्यानात लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र असणारी ‘वनबाला’ प्रदीर्घ कालावधीनंतर धावायला लागली. करोनाकाळात बंद करण्यात आलेली ही ‘टॉय ट्रेन’ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि बालोद्यानातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
अकोला : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय उपलब्ध करून दिला. हा पर्याय निवडणाऱ्या अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील पर्यावरणस्नेही १३ हजार ५३९ ग्राहकांकडून १६ लाख २४ हजार ६८० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.
नागपूर : उपराजधानीत आता करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. २४ तासांत शहरात नवीन ६ रुग्ण आढळल्याने नागपूर जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता १३ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान, सुमारे ६ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल असल्याचे पुढे आल्याने आरोग्य विभागाला पुन्हा धडकी भरली आहे.
चंद्रपूर: करोना नवीन व्हेरिएंट जेएन १ ला घाबरण्याची गरज नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताने जगात सर्वाधिक लसीकरण केले. जागतिक आरोग्य संघटनेने याची दाखल घेतली आहे. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील एम्ससोबत टेलिकन्सलटन्सीच्या माध्यमातून जोडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मांडवा, खडसांगी, पाटण येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तथा तीन उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणार आहे. एक आधुनिक प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
वर्धा : नाना कारणांनी येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ नेहमीच चर्चेत असते. वादाचे दुसरे नाव म्हणजे हिंदी विद्यापीठ, असे म्हटल्या जाते. सध्या विधी अभ्यासक्रमाचा वाद सुरू आहे.
नाशिक: शहर परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात नाशिककरांचेही सहकार्य अपेक्षित असल्याने शहर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतवाहिनी क्रमांकावर अवघ्या ३६ तासात दोनशेपेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
ठाणे: राज्यासह ठाणे जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून करोना रुग्ण आढळून येत आहेत. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे वर्धक मात्रा घेलेली नाही असे असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
पिंपरी: महापालिकेने पूर्वलक्षीप्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीला राज्य शासनाने स्थगिती दिल्यानंतर कर संकलन विभागाने मालमत्ताकर देयकांच्या संगणक प्रणालीत बदल केला आहे.
मुंबई: राज्य शासनातील प्रतिनियुक्तीबाबतचे नियम धाब्यावर बसवून २२ वर्षांच्या सेवेत तब्बल १७ वर्षे प्रतिनियुक्तीवर असलेल्या जलसंपदा विभागातील अभियंत्याला तात्काळ कार्यमुक्त करण्याऐवजी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता करावी. संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चंद्रपूर : शेतात गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. सुभाष कडपे (४०, मु. जानाळा ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कडपे गुरुवारी शेतात कामाकरिता गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. शुक्रवारी त्यांचा शोध घेतला असता, जंगल परिसरातील शेतशिवारात छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना कक्ष क्रमांक ५२३ मध्ये घडली. माहिती मिळताच वनविभाग व पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. अमोल कोल्हे कसे निवडून येतात हे पाहतो, असे आव्हान अजित पवार यांनी दिले. असेच आव्हान त्यांनी २०१९ साली विजय शिवतारे यांना दिले होते आणि शिवतारे यांचा पराभव झाला होता. हाच धागा पकडून अजित पवार गटाचे नेते सचिन खरात यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तुमचाही या निवडणुकीत विजय शिवतारे होणार, असे आव्हान खरात यांनी दिले.