Mumbai News Updates : महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप करत राज्यात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत सरकारचे सर्वच बडे नेते हे आरोप फेटाळत आहेत. तसेच मविआ सरकारच्या काळातच उद्योग केल्याचा आरोप करत आहेत. एकूणच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दुसरीकडे राज्यातील पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. त्या मुद्द्यावर विरोधकांकडून ओला दुष्काळ घोषित करण्याचीही मागणी होत आहे. राजकारणासह राज्यातील सर्वच घडामोडींच्या अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra  News Today, 02 November 2022 : राजकारणासह राज्यातील सर्वच घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

20:03 (IST) 2 Nov 2022
कल्याण: “मनसे बरोबर युती म्हणजे…” महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवले म्हणाले…

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुसंडी मारण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर युती केल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली. दलित पँथर चळवळीच्या ५० वर्षाच्या वाटचालीवर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी मंत्री आठवले आचार्य अत्रे रंगमंदिरात आले होते.

सविस्तर वाचा

19:09 (IST) 2 Nov 2022
“आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले “भारतमाता विधवा…”

‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. आज पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले आहे. सविस्तर वाचा

19:07 (IST) 2 Nov 2022
“पहिली वेळ असल्याने माफ करतो” म्हणणाऱ्या बच्चू कडूंना रवी राणांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “दम दिला तर घरात घुसून…”

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला असल्याचे बोलले जात असतानाच रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांना इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी काल अमरावतीत झालेल्या सभेत बोलताना, “पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो”, असं विधान केलं होते. यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा

18:35 (IST) 2 Nov 2022
VIDEO: “…तर त्या अधिकाऱ्याला उघडंनागडं करून मारल्याशिवाय सोडणार नाही”, राजू शेट्टींचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी “प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना खंडणी देऊन बदल्या कराव्या लागतात,” असा गंभीर आरोप केला आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याही न्याय व्यवस्थेप्रमाणे कराव्यात, अशी मागणी केली. यानंतरही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, तर त्यांना उघडंनागडं करून मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेट्टींनी दिला. ते बुधवारी (२ नोव्हेंबर) पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे ऊस परिषदेला आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमी…

18:25 (IST) 2 Nov 2022
नवी मुंबई : पोटच्या गोळ्याला कचऱ्यात फेकून देणाऱ्या आईला नातेवाईकांसह अटक

नवी मुंबईतील तुर्भे येथे एका शौचालयजवळ नुकत्याच जन्मलेल्या एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

18:06 (IST) 2 Nov 2022
पिंपरी: घरगुती वादामुळे वडिलांकडून मुलाचा खून; पोलिसांकडून आरोपीला अटक

घरगुती वादातून वडिलांनी मुलाचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची घटना मावळमधील सदुंबरे गावात घडली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. समीर बाळू बोरकर (वय ३४, रा. बोरकरवस्ती, सुदुंबरे, मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

18:04 (IST) 2 Nov 2022
सांगली: शेती औषधे व किटकनाशकांचा १४ लाखांचा बनावट साठा जप्त

बनावट शेती औषधे व किटकनाशकांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना १४ लाखांचा साठा कृषी विभागाच्या पथकाने जप्त करून दोघांना पोलीसांच्या ताब्यात दिले. हैदराबादहून हा बनावट औषधे व कीटकनाशके बसने आणण्यात आली होती. द्राक्षाच्या फळछाटण्या सुरू असून यावेळी कीटकनाशके आणि औषधांची मोठी गरज शेतकर्‍यांना असते.

सविस्तर वाचा

17:29 (IST) 2 Nov 2022
भंडारा : ‘दिवाळी हंगामा’ कार्यक्रमात हुल्लडबाजांची उपसभापतींसह चौघांना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण

विविध कारणांमुळे विदर्भ आजही औद्योगिक विकासासाठी आणि दर्जेदार रोजगारासाठी झगडत आहे. या भागात उत्तम नैसर्गिक संसाधने आहेत. येथे देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा आहेत ज्यांत दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे.

सविस्तर वाचा

17:00 (IST) 2 Nov 2022
पुणे : मित्राशी लग्नास नकार दिल्याने तरुणीवर कोयत्याने वार

पुणे : मित्राला लग्नास नकार देणाऱ्या तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना पुण्याच्या मावळमध्ये घडली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून मानेवर, हातावर आणि कानाच्या जवळ कोयत्याने वार करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

15:21 (IST) 2 Nov 2022
वर्धा, सेलू काँग्रेस समितीचे अध्यक्षपद शेंडे गटाच्या ताब्यात ; रणजित कांबळे गटाला झटका

वर्धा व सेलू काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी शेखर शेंडे गटाचे सुरेश ठाकरे व रज्जन मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल वीस वर्षांपासून शेंडे गटाला यापासून वंचित ठेवणाऱ्या आमदार रणजित कांबळे गटास हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.

सविस्तर वाचा

15:21 (IST) 2 Nov 2022
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त उद्धव ठाकरे सहभागी होणार का? अंबादास दानवे म्हणाले, “काहीही अडचण…”

भारत जोडो यात्रेमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार का असे विचारले जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे गटातील नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे, असे दानवे म्हणाले आहेत. वाचा सविस्तर

15:20 (IST) 2 Nov 2022
मुंबईतील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण रखडले ,अत्यल्प प्रतिसादामुळे पाच हजार कोटींच्या रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या निविदा रद्द

येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने तब्बल पाच हजार ८०० कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामांच्या निविदा मागवल्या होत्या.

सविस्तर वाचा

14:47 (IST) 2 Nov 2022
दोघांना पकडल्यावर आता तिसऱ्यावरच संशय ; आरेमधील हल्लेखोर बिबट्याचा शोध कायम

गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीत दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाने हल्ला झालेल्या परिसरात पिंजरे लावून गेल्या आठवड्यात दोन बिबट्यांना पकडले.

सविस्तर वाचा

14:19 (IST) 2 Nov 2022
नाशिक : शिवशाहीला आग, चालकाच्या सतर्कतेने ४२ प्रवासी सुखरूप

नाशिकहून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसने सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नरलगतच्या माळवाडी शिवारात अकस्मात पेट घेतला. चालकाने प्रसंगावधनता दाखवित बस रस्त्याच्या बाजुला नेऊन सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वाचा…

14:08 (IST) 2 Nov 2022
“तुम्ही काहीच चिंता करू नका, एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री, त्यामुळे…”, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत नितेश राणेंचं वक्तव्य

भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत, असं वक्तव्य केलं. तसेच हिंदू म्हणून आवाज उठवणाऱ्यांना सुखरुप घरी पाठवेन असा शब्दही आंदोलकांना दिला. बुधवारी (२ नोव्हेंबर) कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना बोलत होते.

सविस्तर बातमी…

13:52 (IST) 2 Nov 2022
कसा असणार नागपुरातील दुसरा केबल स्टेटेड पुल ?

जीर्ण झालेल्या अजनी रेल्वे उड्डाण पुलाच्या ठिकाणी केबल स्टेटेड पुल बांधण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ३२६ कोटी रुपये खर्च करून बांधला जाणारा हा पुल अशा प्रकारचा नागपुरातील दुसरा पुल असेल. पहिला पुल मुख्य रेल्वे स्थानकाजवळ ( राम झुला) आहे.

सविस्तर वाचा

13:48 (IST) 2 Nov 2022
Sanjay Raut Bail Plea : संजय राऊतांना जामीन मिळणार? ९ नोव्हेंबरला न्यायालय देणार निकाल

Sanjay Raut Bail Plea : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. आता त्यांच्या जामीन याचिकेवर ९ नोव्हेंबरला निकाल दिला जाणार आहे.

सविस्तर बातमी…

13:34 (IST) 2 Nov 2022
पुणे : ‘बीआरटी मार्ग बंद करा’, पोलिसांचे महापालिकेला पत्र; बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपीड ट्रान्झिट- बीआरटी सेवा सुरू करण्यात आली असली तरी शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या वाहतूक कोंडीचे खापर महापालिकेवर फोडले आहे.

सविस्तर वाचा

13:32 (IST) 2 Nov 2022
पुणे : प्रदीप शर्मांचा मुक्काम तीन महिने ससून रुग्णालयात

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाच्या परिसरात स्फोटके ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेले चकमक फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा गेल्या तीन महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 2 Nov 2022
“महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी…” शिवसेनेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; मोदी, शाहांचा ‘किडनॅपर’ उल्लेख करत म्हणाले…

महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील. पण, इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा, कारण आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही, अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

वाचा सविस्तर

13:29 (IST) 2 Nov 2022
जळगावात सभा सुषमा अंधारेंची, मंचावरून राष्ट्रवादीच्या नेत्याची गुलाबराव पाटलांविरुद्ध तुफान फटकेबाजी

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मंत्री गुलाबराव पाटील हे सातत्याने शिवसेनेवर ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) टीकास्त्र सोडत आहेत. त्यात शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात पोहचली आहे. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सुद्धा हजेरी लावली आहे.

वाचा सविस्तर

13:28 (IST) 2 Nov 2022
‘भारत जोडो यात्रे’त नितीन राऊत यांना धक्काबुक्की, डोळ्याला गंभीर दुखापत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ भारत दौरा करत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून ही यात्रा तेलंगणा राज्यात पोहचली आहे. काल ( १ नोव्हेंबर ) ही यात्रा हैदराबाद शहरात होती. यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही सामील होत आहेत. त्यातच राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा तेलंगणातील यात्रेत सामील झाले होते. मात्र, यात्रेदरम्यान राऊत यांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

वाचा सविस्तर

13:24 (IST) 2 Nov 2022
मालेगावात ५० अतिक्रमणांवर हातोडा, रहदारीला होणारा अडथळा दूर होण्यास मदत

जेसीबी यंत्राखाली सापडून तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर जाग आलेल्या मालेगाव महापालिकेने येथील कुसुंबा रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला आहे. या कारवाईत पालिका पथकाने ५० हून अधिक अतिक्रमणे हटविली असून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 2 Nov 2022
“चुलीत जाऊ द्या ती आमदारकी, डब्यात जाऊ द्या खासदारकी, कोण…”, नितेश राणे आक्रमक

भाजपा आमदार नितेश राणे यांनी “चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही,” असं वक्तव्य केलं आहे. तसेच मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत, असंही म्हटलं. बुधवारी (२ नोव्हेंबर) कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार राणे बोलत होते.

सविस्तर बातमी…

12:01 (IST) 2 Nov 2022
मुंबईत पहिल्या दिवशी सीटबेल्ट न बांधणाऱ्या १८५ जणांवर कारवाई

सीटबेल्ट न बांधल्याप्रकरणी मुंबईत १८५ जणांवर मंगळवारी वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. सीटबेल्ट प्रकरणी १० दिवस जनजागृतीवर भर देण्यात येणार असून त्यानंतर आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 2 Nov 2022
Muzaffarpur Murder: प्रेयसीला भेटायला गेलेल्या युवकाचा तिच्या कुटुंबियांकडून खून, मित्रालाही बेदम मारहाण

प्रेयसीला भेटायला गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा तिच्या कुटुंबियांनी खून केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे. हा तरुण भिमलपूर गावातील छट घाटावर रविवारी संध्याकाळी त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. यावेळी जमावाने मृत युवकाच्या मित्रालाही बेदम मारहाण केली.

सविस्तर बातमी वाचा…

11:45 (IST) 2 Nov 2022
Illegal Mining Case: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचं समन्स, अवैध खाणकाम प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे आदेश

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

सविस्तर बातमी वाचा…

11:44 (IST) 2 Nov 2022
Elon Musk on Twitter Blue Tick: ट्विटर ‘ब्लू टिक’साठी आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे; मस्क यांची घोषणा

Twitter Blue Tick Chargeable: ट्विटरचे मालकी हक्क मिळताच अब्जाधीश एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना अकाऊंट वेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत.

सविस्तर बातमी वाचा…

11:37 (IST) 2 Nov 2022
मुंबई : आरेत मानवी वस्तीत मगर

आरेत बिबट्याचा वावर असताना आता मानवी वस्तीत मगर आढळली आहे. मंगळवारी दुपारी आरेतील युनिट क्रमांक ३१ मधील आंबवडी येथून वन विभागाने मगरीला ताब्यात घेतले. लवकरच या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

सविस्तर वाचा

11:33 (IST) 2 Nov 2022
Praveen Nettaru murder case : भाजयुमो कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या चार सदस्यांची माहिती देणाऱ्यांसाठी NIA कडून बक्षीस जाहीर

राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तरू हत्येप्रकरणी प्रतिबंधित संघटना ‘पीएफआय’च्या चार सदस्यांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.

सविस्तर बातमी…

Maharashtra Breaking News Today : एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…