Mumbai News Updates : महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप करत राज्यात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत सरकारचे सर्वच बडे नेते हे आरोप फेटाळत आहेत. तसेच मविआ सरकारच्या काळातच उद्योग केल्याचा आरोप करत आहेत. एकूणच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दुसरीकडे राज्यातील पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. त्या मुद्द्यावर विरोधकांकडून ओला दुष्काळ घोषित करण्याचीही मागणी होत आहे. राजकारणासह राज्यातील सर्वच घडामोडींच्या अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…
Maharashtra News Today, 02 November 2022 : राजकारणासह राज्यातील सर्वच घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…
गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३५ जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान, दुर्घटनेत इतक्यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होण्याचं नेमकं काय कारण आहे यावर राष्ट्रीय आपत्ती दलाच्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना नदीमधील पाण्याची पातळी कमी होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दादरमधील (पश्चिम) छबीलदास शाळेत मोठा स्फोट झाला आहे. या ठिकाणी चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.आज पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटात तीन जण जखमी झाले आहेत.
Maharashtra Breaking News Today : एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…