Marathi News Updates Today, 23 May 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजपा विरोधी आघाडीच्या प्रयत्नांची जोरदार चर्चा चालू असताना विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत नेमकं कोणत्या सूत्रानुसार जागावाटप होईल? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
ठाणे: राज्याच्या मंत्रीमंडळांमध्ये एकही महिला मंत्री नाही, हे दुदैव आहे. किमान महिला बाल कल्याण विकास विभागाच्या मंत्री तरी महिला असायला हव्या होत्या. पण, तिथेही पुरुष मंत्री आहेत.
मुंबई: मालाड पश्चिम परिसरातील मढ मार्वेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी नऊ बांधकामे मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली.
जळगाव: भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी तक्रारदार चार तरुणांनी मंगळवारी दुपारी पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित, वसीम कुरेशी निर्मित चित्रपटाचे चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. प्रदर्शनाआधीच वादाने घेरलेल्या या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रिकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे: घरात राहू नको, असे सांगितल्याने चिडलेल्या घरजावयाने सासूच्या अंगावर गरम पाणी फेकून तिला मारहाण केली. सासूचे डोके फरशीवर आपटल्याने तिचे दात पडले.
मुंबई: देहविक्रय करणाऱ्या महिलेला हा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी हा व्यवसाय केला जात नसेल तर तो गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले.
पुणे : राज्यातील शासकीय आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. हा निर्णय मार्च २०२३ पासून लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, विद्यावेतन देण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकातील आरक्षित तिकीट खिडकीवर रेल्वे तिकीट दलालांना न विचारता स्वताहून तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला रेल्वे तिकीट दलालांनी संगनमत करुन मारहाण केली.
नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महानिर्मितीच्या कोराडीतील प्रस्तावित १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यापाठोपाठ आता काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनीही प्रकल्पाला विरोध करत २९ मे रोजीची भर दुपारची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून, हापूससह इतर आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मागील आठवड्यात ४ ते ६ डझन आंब्याची विक्री १५०० ते २५०० रुपयांना होत होती. आता ८०० ते २००० रुपयांवर विक्री होत असून, प्रतिडझन २०० – ५०० रुपयांनी उपलब्ध झाले आहेत.
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात महाराष्ट्रासह उपराजधानीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सात उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या.
बुलढाणा : अपघातानेच गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एका अपघाताची नोंद झाली. मंगळवारी उत्तररात्री दुसरबीड ( तालुका सिंदखेडराजा) जवळ खासगी प्रवासी बस दुभाजकला धडकल्याने वाहक दगावला तर आठ प्रवासी जखमी झाले.
पुणे: वैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन दुकानांवर दगडफेक केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागिरकांना आरोपींनी बांबूने मारहाण केली.
पिंपरी: हुंडा म्हणून बेड, गादी तसेच टेम्पो घेण्यासाठी एक लाख रुपये माहेराहून आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मुळशीतील मारुंजी येथे घडली.
नागपूर: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे एक असे शेतकरी आहे, जे मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून बसतात. परंतु त्यांच्या शेतात दोन हेलिपॅड आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लावला.
आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनण्याची घाई मविआ सरकारच्या काळापासून आहे. उद्धव ठाकरेंवर जसलोकमध्ये सर्जरी होत असल्यापासून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत होती. म्हणजे एकीकडे वडील बेडवर आणि दुसरीकडे या महाशयांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा आहे. मग हा सरपंच तरी बनू शकतो का? – नितेश राणे
नागपूर: शिदे-फडणवीस सरकारमध्ये नागपूर जिल्ह्यात फडणवीस यांच्या रुपात एकच मंत्रीपद आहे, विस्तारात ही संख्या वाढेल किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे, मात्र पैसे घेऊन मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवणाऱ्या निरज राठोड च्या अटकेमुळे जिल्ह्यात मंत्री होण्यास इच्छुक असणाऱ्यांची नावे मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला आली आहेत.
मालेगाव – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे असलेल्या धुळ्याच्या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघात तुलनेने काँग्रेसपेक्षा अधिक असलेले प्राबल्य आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पाठबळ या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा भाजपकडून खेचून आणण्यात नक्की यशस्वी होऊ शकतो, असा युक्तीवाद या संदर्भात केला जात आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
नागपूर : बंगाल सरकारने वनविभागात कार्यरत त्यांच्या हत्तींना शासकीय श्रेणीत सामावून घेतले, त्यांना नियमाप्रमाणे सर्व लाभही देत आहेत, मग आम्ही काय घोडे मारले, असा प्रश्न महाराष्ट्र वनखात्यात कार्यरत हत्तींनी विचारला आहे.
नाशिक: दीड महिन्यापूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
डोंबिवली – डोंबिवली शहराच्या विविध भागांत सोमवारी कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि डोंबिवली वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवून ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. या रिक्षाचालकांकडून एक लाख ९३ हजार रुपयांचा दंड एका दिवसात वसूल केला.
डोंबिवली – येथील पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारच्या ४४ एकरच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी खाडी किनारा बुजवून बेकायदा चाळी उभारल्या आहेत. खारफुटीची झाडे तोडून, खाडीत भराव टाकून ही बांधकामे केल्याने ह प्रभाग अधिकाऱ्यांनी या भागातील नव्याने उभ्या राहिलेल्या सर्व चाळी जमीनदोस्त केल्या.
नागपूर: महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील १३२ केव्हीचे ट्रान्सफार्मर बंद पडल्याने सोमवारी रात्री अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेकांची झोपमोड झाली उपराजधानीतील दक्षिण नागपूरमधील ताजबाग, मानेवाडा, श्रीकृष्ण नगर, अंबानगर, मंगलदीप नगर आणि त्याला लागून असलेल्या काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.
पुणे : न्यायालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. कौटुंबिक न्यायालयातील खटल्यात व्हिडीओ काॅन्फरन्सिंग (दूरदृश्य) सुविधेचा फायदा होत आहे. युरोपातील हंगेरीत वास्तव्यास असणारी पत्नी आणि पुण्यातील पतीचा व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे तीन दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर झाला आहे. दोघेजण गेल्या पंधरा वर्षांपासून विभक्त राहत होते.
मुंबई: मुंबईत गेल्या काही वर्षांत फोफावलेल्या नाईट क्लब तसेच कॅफेंमधील बाऊन्सर्स अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने अशा नाईट क्लबवर विशेष नजर ठेवली आहे.
जळगाव – गुन्हेगारी कृत्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भुसावळमध्ये मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दुहेरी खुनाची घटना उघड झाली. शहरातील वांजोळा रोड भागात रेल्वे विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचार्याने पत्नीसह आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच होणार आहे. इयत्ता दहावीच्या निकालाला जून उजडणार असला तरी बारावीचा निकाल मात्र २५ किंवा २६ मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आक्रमक पवित्रा घेत आहेत. समाजात शांतता नांदवी यासाठी शहरातील अनेक टोळ्यांवर मोक्का आणि प्रतिबंधात्मक कारवायांचा धडका त्यांनी लावला होता.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर