Marathi News Updates Today, 23 May 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजपा विरोधी आघाडीच्या प्रयत्नांची जोरदार चर्चा चालू असताना विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत नेमकं कोणत्या सूत्रानुसार जागावाटप होईल? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

10:52 (IST) 23 May 2023
“ईडी चौकशीनंतर मला अजित पवारांचा फोन आला नाही”, जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; नाराजीच्या चर्चांना उधाण!

जयंत पाटील म्हणतात, “कुठल्या एका नेत्याचं नाव घेतलं नाही, तर चूक ठरेल. त्यामुळे…!”

वाचा सविस्तर

10:51 (IST) 23 May 2023
धक्कादायक! क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यामुळे मुलाची आत्महत्या, आईनेही संपविले जीवन

नागपूर : मुलगा क्रिकेट सट्टेबाजी लाखांमध्ये रक्कम हारल्यामुळे आई-वडिलांनी आरडाओरड केली. घरातील वाद आणि सट्टेबाजीमुळे झालेल्या कर्जामुळे तणावात असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्युमुळे नैराश्यात गेलेल्या आईनेही विष प्राशन करून आत्महत्या केली.

सविस्तर वाचा

10:38 (IST) 23 May 2023
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाने पाठवले ‘हे’ पत्र

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होण्यावर केवळ शिक्कामोर्तब बाकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती पुढील दोन दिवसांत सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे.

सविस्तर वाचा..

10:38 (IST) 23 May 2023
नागपूर : एक महिन्याच्या बाळाचा खून, आरोपीला आजन्म कारावास

नागपूर : साळीच्या एक महिन्याच्या बाळाचा चाकुने भोसकून खून करणाऱ्या क्रूरकर्मा आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. अली यांनी आजन्म सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली.

सविस्तर वाचा

10:31 (IST) 23 May 2023
नागपूर: पुत्रवियोगातही मातेकडून अवयवदानाचा धाडसी निर्णय; सात जणांना मिळणार नवजीवन

नागपूर : आठ वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर महिलेने कठीण स्थितीत मुलाचा सांभाळ केला. मुलाला बारावीत ९० टक्के गुण मिळाले. त्याला एनडीएत प्रवेश घेऊन सैन्यात सेवा द्यायची इच्छा होती. परंतु अपघातात मेंदूमृत झाल्याचे पुढे झाले. अखेर पुत्रवियोगातही मातेने मुलाचे अवयवदान केले.

सविस्तर वाचा

10:31 (IST) 23 May 2023
नागपूर: उष्माघात कृती आराखड्यात उष्णता, पाणी, संसाधनांचा विचार व्हावा; प्रा. राजश्री कोठारकर यांचे मत

शहरात उष्माघाताचा प्रभाव कमी करण्यासाठी उष्माघात कृती आराखड्यात उष्णता, पाणी, नैसर्गिक संसाधनांनुसार व्यवस्थापन आवश्यक आहे, असे मत विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीएनआयटी) वस्तूकला आणि नियोजन विभागाच्या प्रा. राजश्री कोठारकर यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा

10:30 (IST) 23 May 2023
तपास यंत्रणांचा गैरवापर करून गलिच्छ राजकारण करणे दुर्दैवी; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

कराड : तपास यंत्रणांचा गैरवापर वाढला असून, त्यातून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करताना, केवळ राजकीय विरोधकांना त्रास देणे सुरू आहे. अशा पद्धतीचे गलिच्छ राजकारण अतिशय दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचा नामोल्लेख टाळत केली.

सविस्तर वाचा

10:30 (IST) 23 May 2023
चंद्रपूर: मोदी@९ जनसंपर्क अभियान ३० मे पासून; माजी मंत्री हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी

चंद्रपूर : भारतीय जनता पक्षद्वारा मिशन २०२४ अंतर्गत मोदी@९ जनसंपर्क अभियान ३० मे २०२३ पासून राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार क्षेत्रात सुरु करण्यात येत असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अभियान संयोजक म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नियुक्ती केली आहे.

सविस्तर वाचा

10:29 (IST) 23 May 2023
गडचिरोली: गाय वाटप घोटाळा दडपण्याचा प्रयत्न !लाभार्थ्यांचे गंभीर आरोप

गडचिरोली : केंद्रवर्ती अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना व्यवसायासाठी दुभत्या, दुधाळ गायी घेण्याकरिता थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी) माध्यमातून देण्यात आलेल्या अनुदानात घोळ झाल्याची बाब लोकसत्ताने उघडकीस आणले. याप्रकरणी भामरागड प्रकल्प अधिकाऱ्यांनी असे काहीच घडले नसल्याचे सांगितले आहे.

सविस्तर वाचा

10:28 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: अजित पवारांचा अजून फोन आलेला नाही – जयंत पाटील

पक्षांतर्गत काही विषयांसाठी आमची चर्चा शरद पवारांबरोबर आहे. त्याप्रमाणे मी भेटायला चाललो आहे. ईडी चौकशी हा मुद्दा माझ्यासाठी संपला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांचे फोन आले. अजित पवारांचा मला अजून फोन आलेला नाही – जयंत पाटील

10:27 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: आम्ही सर्व जयंत पाटलांसोबत – संजय राऊत

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीतील सर्व नेते जयंत पाटील यांच्यासमवेत आहेत”.

10:24 (IST) 23 May 2023
पुणे : दोन हजारांच्या नोटांमुळे पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली

पुणे : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर शुक्रवारपासून (ता.१९) पेट्रोल पंपचालकांची डोकदुखी वाढली आहे. पंपांवर दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण नेहमीपेक्षा दुपटीने वाढले आहे. यामुळे अनेक पंपचालकांनी सुटे पैसे नसल्याचे फलक सोमवारी लावले.

सविस्तर वाचा..

10:23 (IST) 23 May 2023
मुंबई-पुण्याची घरांच्या विक्रीत देशभरात आघाडी

पुणे : जागतिक पातळीवर मंदीचे वारे असूनही देशातील गृहनिर्माण क्षेत्राने जोरदार कामगिरी नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशात एकूण ३ लाख ७९ हजार घरांची विक्री झाली. त्यांचे एकूण मूल्य ३ लाख ४७ हजार कोटी रुपये आहे. घरांच्या एकूण विक्री मूल्यात देशात पुण्यात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

10:22 (IST) 23 May 2023
मेट्रोचे गौडबंगाल : पुणे मेट्रो सेवा सुरू करण्यास दिलेल्या मंजुरीची माहितीच नाकारली

पुणे : पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीची माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. याबाबत पुण्यातील ज्येष्ठ अभियंते नारायण कोचक यांनी माहिती अधिकारांतर्गत केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

10:20 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: शरद पवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाहीत, राऊत म्हणतात…

पंतप्रधान कोण हा पुढचा विषय आहे. आधी भाजपाचा पराभव करणं हे पहिलं ध्येय आहे – संजय राऊत

10:17 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची गरजच नव्हती – संजय राऊत

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची गरज नव्हती. मी दिल्ली घडवली, हे दाखवण्यासाठी करोना काळात सेंट्रल व्हिस्टासाठी लाखो कोटी रुपये उभे केले. राष्ट्रपतींना डावलून त्याचं उद्घाटन लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे – संजय राऊत

10:08 (IST) 23 May 2023
शरद पवारांचं राहुल गांधींबाबत मोठं विधान; म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीचे निकाल म्हणजे…!”

काँग्रेसला आलेली मरगळ झटकण्यासाठी, पक्षाला नवी दिशा देण्याकरता काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली देशभर भारत जोडो यात्रा काढली होती. देशातील विविध स्तरांतून या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. ही पदयात्रा संपल्यानंतर कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेच कर्नाटक विधानसभा निवडणूक काँग्रेस जिंकू शकली, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.ते पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा

10:07 (IST) 23 May 2023
Video : पालघरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य, आईची वणवण थांबवण्यासाठी मुलाची कमाल; अंगणातच सुरू झाला पाण्याचा झरा, कसं ते पाहा!

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. भर उन्हात वणवण भटकून महिलांना डोक्यावरून पाणी आणावं लागतंय. पालघर जिल्ह्यातील केळवे येथील धवांगे पाडा येथेही पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली असून एका कामगार दाम्पत्याच्या मुलाने आईची पाण्यासाठीची वणवण थांबावी म्हणून शक्कल लढवली आहे.

सविस्तर वाचा

10:05 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: पंतप्रधान पदासाठी इच्छुक? शरद पवार म्हणतात…

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे – शरद पवार

10:05 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: राहुल गांधींची पदयात्रा आणि कर्नाटक निवडणूक निकाल २०२३

राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. अशाप्रकारे लोक राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शक्ती देतील याची मला खात्री आहे – शरद पवार

10:04 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: पालिका निवडणुकांसाठी कोणता फॉर्म्युला?

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या जागावाटपाची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुंबईच्या महानगरपालिकेत कसे जावे याची चर्चा आमच्यात होणार आहे. यामध्ये काही लोकांचे मत आहे की काँग्रेसने स्वतंत्र लढावे, इतरांनी स्वतंत्र लढावे मात्र यामध्ये काही वेगवेगळी मत आहेत. यावरही काही निर्णय झालेला नाही – शरद पवार

10:04 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: हिंसक घटनांमागील शक्ती कोणती? – शरद पवार

काही दिवसांपासून राज्यातील हिंसक वळणामागील शक्ती कोणती आहे, त्यामागील विचारधारा कोणती आहे हे पाहिले तर आज ज्यांच्या हाती देशाची आणि राज्याची सत्ता आहे त्यांचा यामध्ये कितपत सहभाग आहे हे तपासायची वेळ नक्की आली आहे – शरद पवार

10:03 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: नोटबंदीवर शरद पवार म्हणतात…

दोन हजाराच्या नोटीसंदर्भात एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे अशाप्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. यापूर्वीही अशाप्रकारचा निर्णय घेतल्याने प्रचंड लोकांचे नुकसान झाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधी रक्कम होती जी बदलून दिली नाही. त्यातून बँकेचे आर्थिक नुकसान झाले. निर्णय घेतल्यानंतर ज्यांच्या जास्त गुंतवणूक आहे त्यांना बदल करून द्यायची जबाबदारी पाळायची नाही आणि आम्ही काही वेगळे करतोय असे दाखवायचे. त्यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाने देशात चमत्कार केवळ इतकाच झाला की अनेकांनी आत्महत्या केला. अनेक कुटुंब, अनेक व्यावसायिक हे उद्धवस्त झाले. तो चमत्कार पुरेसा नाही म्हणून हा दुसरा चमत्कार केला आहे – शरद पवार

10:02 (IST) 23 May 2023
Maharashtra News Update: शरद पवारांचा पुण्यात पत्रकारांशी संवाद…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना त्रास देण्यात आला तसेच सातत्याने ते चुकीच्या गोष्टींची भूमिका माध्यमांसमोर मांडत होते त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पण किंमत मोजत असताना ज्यांच्यासंदर्भात भूमिका घेतली होती, त्या लोकांबद्दल काही कारवाई करण्याचा निर्णय देशातील मोठ्या संस्थेला म्हणजेच सीबीआयला घ्यावा लागला याचा अर्थ नवाब मलिक यांची भूमिका किती सत्यावर आधारीत होती हे स्पष्ट झाले – शरद पवार

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर