Maharashtra News Updates, 06 August 2024: मराठा ठोक मोर्चातर्फे आज मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट होत असताना तिकडे धाराशिवमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये आरक्षणावर चर्चा झाली. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आता ओबीसींची बाजू उचलून धरली असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्र सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विरोधक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगतिले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडणार होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वेळ वाढवून मागितल्यामुळे ही सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होणार आहे. या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.

Live Updates

Marathi News Live Today, 06 August 2024 | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

20:28 (IST) 6 Aug 2024
छत्रपती संभाजीनगर: आंतरजातीय विवाह केल्यावरून मारहाण

छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध मुकुंदवाडी पाेलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डिगंबर कान्हुजी लांडगे (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश गाेपीनाथ राठोड, नवनाथ गोपीनाथ राठोड, करण शिवाजी राठोड, राहुल शिवाजी राठाेड, मनोज अर्जुन राठोड, ऋतिक राठोड व आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची आज्जीसह इतर दोन अनोळखी व्यक्ती, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीनुसार आरोपींच्या घरातील मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून कल्पनाबाई डिगंबर लांडगे यांना मारहाण करण्यात आली. तर सुमित डिगंबर लांडगे याला उचलून नेऊ व जीव देण्याची आणि जीव घेण्याचीही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

20:24 (IST) 6 Aug 2024
पिंपरी : होय, यंदा शहरात सर्वाधिक खड्डे; आयुक्तांची कबुली

पिंपरी : शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली असून सर्वच भागातील रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. आता  महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनीच यंदा शहरात जास्तच खड्डे असल्याची कबुली दिली.

सविस्तर वाचा

20:22 (IST) 6 Aug 2024
भीमा नदीतील विसर्ग घटला, पंढरीतील पाणी पातळी कायम; नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर

पुण्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला आणि वीर धरणातील आवक मंदावली.

सविस्तर वाचा…

20:08 (IST) 6 Aug 2024
महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांच्या इमारत पाडकामाला स्थगिती!

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगवास भोगावा लागलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांच्या १५ वर्षे जुन्या इमारतीच्या पाडकामाला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त स्थगिती दिली आहे.

सविस्तर वाचा…

20:01 (IST) 6 Aug 2024
‘‘राज्यपाल करा, अन्यथा न्यायालयात जातो,” आनंदराव अडसुळ यांचा इशारा, नवनीत राणांच्या अडचणी…

अमरावती : सर्वोच्‍च न्‍यायालयाने माजी खासदार नवनीत राणा यांच्‍या जातवैधता प्रमाणपत्राविषयी दिलेला निकाल अयोग्‍य असून त्‍यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात पुनर्विचार याचिका (क्‍यूरेटिव्‍ह पिटीशन) दाखल करण्‍याचा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. त्‍यामुळे नवनीत राणा यांच्‍या अडचणीत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

सविस्तर वाचा

19:51 (IST) 6 Aug 2024
मॉडलिंगचे आमिष दाखवून तरुणीचे अश्लील चित्रीकरण, ४५ लाखांची खंडणी उकळली; तिघांविरोधात गुन्हा

आरोपीने पीडित मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला व त्याचे छायाचित्रण व चित्रीकरण केले.

सविस्तर वाचा…

19:31 (IST) 6 Aug 2024
सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचा मोर्चा

सांगली : शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागणीसाठी मंगळवारी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे सांगली-मिरज वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करावी अथवा संस्थांना शिक्षक भरतीचे अधिकार मिळावेत, शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे, १५ मार्च २०२४ च्या सेवक संघ शासन निर्णयात दुरुस्ती करावी, अल्पसंख्याक, अल्पभाषिक शाळेतील रिक्त शिक्षकपदांची भरती करण्यास मान्यता मिळावी आदी मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी दुपारी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यास अभिवादन करून विराट मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात जिल्ह्यातील २८ संघटना सहभागी झाल्या होत्या. एकच मिशन – जुनी पेन्शन, १५ मार्चचा काळा कायदा रद्द करा, शाळा तेथे मुख्याध्यापक पद दिले पाहिजे, शंभर टक्के अनुदान दिलेच पाहिजे आदी १६ मागण्यांच्या घोषणा असलेले फलक हाती घेण्यात आले होते.

19:22 (IST) 6 Aug 2024
मुंबई: ‘बेस्ट बचाव’साठी ३६ आमदारांनाही सहभागी केले जाणार

बेस्ट उपक्रमात खासगी कंत्राटदारांच्या बसची संख्या वाढत असून, स्वमालकीच्या बसची संख्या कमी होत आहे.

सविस्तर वाचा…

19:09 (IST) 6 Aug 2024
सलग सुट्टीत एसटी सेवेवर परिणाम? एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत; गणेशोत्सवानिमित्त एसटीने गावी जाणाऱ्यांचे हाल होणार?

राज्यातील ६५ लाख प्रवासी एसटी सेवेवर अवलंबून आहेत. जर, कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले तर प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

19:01 (IST) 6 Aug 2024
सिंधुदुर्ग: नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाऊन’; लाडक्या बहिणींची उडाली झोप

गत चार ते पाच दिवसांपासून मात्र ‘नारीशक्ती’ हे अॅप सुरूच होत नसल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा…

19:00 (IST) 6 Aug 2024
मुंबई: रुग्णालयाच्या शौचालयात मोबाइलद्वारे चित्रीकरण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला अटक, महिला डॉक्टरच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडले

मंगळवारी सकाळी तक्रारदार डॉक्टर शौचालयात गेली असता कोणी तरी मोबाइलद्वारे चित्रीकरण करत असल्याचे तिला दिसले.

सविस्तर वाचा…

18:43 (IST) 6 Aug 2024
सांगली: कृष्णा, वारणा नद्या पुन्हा पात्रात; कोयना, चांदोली धरणातील विसर्गही बंद

कर्नाटकातील अलमट्टी धरणात पाण्याची आवक ३ लाख २ हजार ६६० क्युसेक प्रति सेकंद असून, जलसंचयासाठी पाण्याचा विसर्ग दोन लाख क्युसेक करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

18:08 (IST) 6 Aug 2024
Pune Crime News: पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण

पुणे : रस्त्यावर होणाऱ्या किरकोळ वादातून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीस्वार तरुणाने अचानक ब्रेक मारल्याने मोटारीतील तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली.उमेश विठ्ठल काळे (वय ३०, रा. भैरवननगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 6 Aug 2024
पुणे: दागिने घडविण्यासाठी दिलेले ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार

पुणे : दागिने घडविण्यासाठी दिलेले ४२ लाखांचे सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कारागिराविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.रमेश शंकर माईती (सध्या रा. रविवार पेठ, मूळ रा. विष्णूबुराह, मेदनीपूर, पश्चिम बंगाल) असे पसार झालेल्या कारागिराचे नाव आहे.

सविस्तर वाचा

17:42 (IST) 6 Aug 2024
प्रेमीयुगुलाला ब्लॅकमेल करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये उतरलेल्या प्रेमीयुगुलाला ब्लॅकमेल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस उपायुक्त स्मार्तना  पाटील यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.संदीप वसंत शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये एक जोडपे मुक्कामाला आले होते. त्यांनी कागदपत्रे हॉटेलमध्ये जमा केली होती.

सविस्तर वाचा

17:40 (IST) 6 Aug 2024
ग्रामीण भागातील मंदिरांत चोरी करणारा गजाआड; ११ मंदिरात चोरी केल्याचे उघड

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, रांजणगाव, खेड परिसरातील मंदिरांत चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने ग्रामीण भागातील ११ मंदिरांत चोरी केल्याचे उघड झाले असन, त्याच्याकडून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई, ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

17:22 (IST) 6 Aug 2024
मुंबई: स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’च्या प्रयोगांचा षटकार, श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकाच दिवशी ६ प्रयोग

अद्वैत थिएटर्स निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी, दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून राहुल भंडारे हे निर्माते आहेत.

सविस्तर वाचा…

17:14 (IST) 6 Aug 2024
नागपूर : आता मंगळागौरींच्याही स्पर्धा, प्रशिक्षणाचीही सोय, काय आहे हा उपक्रम ?

नागपूर: विविध क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडापटूंना प्रशिक्षण दिले जाते, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय शासनाकडून केली जाते, रोजगार मिळावा म्हणून सुशिक्षित तरणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. स्पर्धा आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाची मालिका इथपर्यंतच मर्यादित नाही. नृत्य स्पर्धेसाठी प्रशिक्षण, सौंदर्य स्पर्धा, गायन, वादन व तत्सम स्पर्धैसाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सशुल्क सोय केली जाते.

सविस्तर वाचा….

17:01 (IST) 6 Aug 2024
गडचिरोली : कबुतर चोरले? चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळ…

गडचिरोली : कबुतर चोरल्याचा आरोप करून चार चिमुकल्यांना अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणाची चित्रफीत समाज माध्यमावर ‘व्हायरल’ होताच पोलिसांनी आरोपी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल केला आहे. ६ ऑगस्टरोजी आरोपीला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले.

सविस्तर वाचा….

16:51 (IST) 6 Aug 2024
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची पोलिसांत धाव; मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलं होतं विधान

भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी २ ऑगस्ट रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं.

सविस्तर वाचा…

16:43 (IST) 6 Aug 2024
आश्रमशाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचे धडे

नाशिक : केंद्र शासनाकडून समग्र शिक्षण अभियान अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण योजना २०१६ पासून राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून २०२३-२४ या वर्षात ६,३३२ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील २१३ शासकीय आश्रमशाळांमधील १२ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना ११ प्रकारचे ‘कौशल्य विकास’चे धडे दिले जाणार आहेत.

सविस्तर वाचा…

16:42 (IST) 6 Aug 2024
उरण : गॅस शवदाहिनीची प्रतीक्षाच, नगर परिषदेचा ऑगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचा दावा

उरण : शहरातील पहिल्याच वायुवरील शवदाहिनी प्रकल्प उभारण्यात आला आहे. पर्यावरणस्नेही प्रकल्पाची प्रतीक्षा आहे. हा प्रकल्प ऑगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचा दावा उरण नगर परिषदेने केला आहे.

सविस्तर वाचा…

16:40 (IST) 6 Aug 2024
नवी मुंबई : मोरबे धरणामधील जलसाठा ९० टक्क्यांवर

नवी मुंबई : जलसंपन्न शहर म्हणून किर्ती असलेल्या नवी मुंबई महापालिकेत मोरबे धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पालिकेला ऐन उन्हाळ्यात विभागवार पाणीकपात करावी लागली होती. परंतु मागील काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे आठवड्यापूर्वीच शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

16:34 (IST) 6 Aug 2024
खासदार नीलेश लंकेंना नोटीस; विखेंची याचिका

नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

16:24 (IST) 6 Aug 2024
कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाला महिला तिकीट कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण; तिकिटाच्या सुट्ट्या पैशावरून वाद

कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवरील स्कायवाॅकवर असलेल्या रेल्वे तिकीट खिडकीजवळ सोमवारी एक महिला रेल्वे प्रवासी तिकीट काढत होती. रेल्वे तिकीट कारकून महिला सुट्टे पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळणार नाही म्हणून अडून बसली होती. सुट्टे पैसे जवळ नसल्याने तिकीट द्यावे, अशी विनंती प्रवासी महिला करत होती.

सविस्तर वाचा

15:59 (IST) 6 Aug 2024
नांदेडजवळ खदानीत बुडून चौघांचा मृत्यू

ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास उघड झाली. मृत पावलेले चारही तरुण बारावीत शिकत होते.

सविस्तर वाचा…

15:36 (IST) 6 Aug 2024
रेल्वेरुळांवर कर्मकांडांचे स्तोम, चेंबूर स्थानकालगत कचऱ्याचे ढीग; रेल्वे प्रशासनासमोर नवे आव्हान

Puja Path on Railway Track: दुसरीकडे वर्दळीच्या रेल्वे स्थानकांदरम्यान भक्तांकडून पूजापाठ, कर्मकांड केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा…

15:28 (IST) 6 Aug 2024
जळगाव: प्रा.अरुणभाई गुजराथी यांची ८० वर्षे जुनी इमारत पावसाने जमीनदोस्त

जळगाव – चोपडा तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, भीजपाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड होत आहे. त्यातच चोपडा येथील विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांची तीन मजली जुनी इमारत पहाटे तीनच्या सुमारास कोसळली.चोपडा शहरासह तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. तालुक्यातील शेतांमध्ये पाणीच पाणी साचले आहे.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 6 Aug 2024
Marathi News Live : ‘उद्धव ठाकरेंचे हृदयसम्राट राहुल गांधी आणि सोनिया गांधी माँसाहेब’, शिंदे गटाची टीका

शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली. उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीत देवदर्शनाला गेले आहेत. आता राहुल गांधी, सोनिया गांधी हे त्यांचे देव आहेत. उद्धव ठाकरे यांचे हृदयसम्राट आता राहुल गांधी असून माँसाहेब सोनिया गांधी झाल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार उद्धव ठाकरेंनी पायदळी तुडवले आहेत. दिल्लीसमोर ते लाचार झाले आहेत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

15:01 (IST) 6 Aug 2024
पनवेल: पान खाणे त्याला महागात पडले

पनवेल ः तालुक्यातील आजिवली गावातील एका तरुणाला टपरीवर पान खाणे चांगलेच महागात पडले आहे. ३० वर्षीय हा तरुण आजिवली गावात राहतो. रविवारी सायंकाळी पाच वाजता हा तरुण पान खान्यासाठी आजिवली गावातील मनोज यादवच्या पानशॉपवर दुचाकीवरुन आला होता. त्याने पानटपरीपासून काही अंतरावर त्याची दुचाकी उभी केली.

पान खाल्यानंतर तरुण त्याची दुचाकी शोधू लागला मात्र त्याला दुचाकी कुठेच सापडली नाही. सोमवारी या तरुणाने थेट पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठले. दुचाकीसोबत ४० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार या तरुणाने पोलीसांत नोंदविली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. टपरीलगत अनेकांकडे पोलीसांनी चौकशी केली. मात्र त्यांना दुचाकी सापडली नाही. दुचाकीचे बाजारमुल्य २० हजार आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.