Maharashtra News Updates, 06 August 2024: मराठा ठोक मोर्चातर्फे आज मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट होत असताना तिकडे धाराशिवमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये आरक्षणावर चर्चा झाली. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आता ओबीसींची बाजू उचलून धरली असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्र सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विरोधक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगतिले जाते.
तसेच आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडणार होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वेळ वाढवून मागितल्यामुळे ही सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होणार आहे. या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.
Marathi News Live Today, 06 August 2024 | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर २०१९मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागलेल्या गणेश नाईक कुटुंबीयांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी नाईक कुटुंबीयांनी केली असून प्रसंगी बेलापूरमधील अपक्ष लढवण्याचीही संदीप नाईक यांची तयारी आहे.
मुंबई : गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील विक्रीसाठीच्या भूखंडांपैकी तीन भूखंडांचा ई लिलाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.
नागपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे जीवघेणे आजार तोंड वर काढतात. ऍझोला ‘मॉस्किटो फर्न’ या दुर्मिळ वनस्पतीद्वारे डासांवर नियंत्रण ठेवणारे संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अर्जुनी मोरगाव येथील एस. एस. जयस्वाल महाविद्यालयाने संयुक्तरीत्या केले आहे. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील डासांचा प्रकोप नियंत्रित करीत गंभीर आजाराची तीव्रता कमी करणे शक्य होणार आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर अनेक ‘बेकायदा कामे’ करण्यासाठी दबाव आणला. तसेच ही कामे कधी पवार, तर कधी पाटील साहेबांनी करायला सांगितल्याचे सांगून देशमुख हे आपल्यावर दबाव आणत. पवार साहेब नेमके कोण, हे विचारण्याची आपली कधी हिंमत झाली नाही, असा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
पुणे : कर्ज फेडण्यासाठी एकाने दुचाकी चोरून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या दुचाकींची विक्री चोरट्याने दौंड तालुक्यात केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. अरविंद मोतीराम चव्हाण (वय ३९, रा. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील भूल्लर या गावी सिमेंटच्या वीटा तयार करणाऱ्या कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला. मंगळवार पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता.
डोंबिवली – आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील रामनगर भागातील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट गुंतवणूक कंपनीकडून सहा गुंतवणूकदारांची ७३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मार्च २०२० ते एप्रिल २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
सावंतवाडी : केंद्र सरकारने पश्चिम घाटातील इको- सेन्सिटिव्ह झोनसंदर्भात अधिसूचना जारी केली. त्यात सिंधुदुर्गातील १९२ गावांचा समावेश आहे. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग वनविभागाने आंबोली ते मांगेलीपर्यंतच्या पट्ट्यातील २५ गावांचा इको- सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे.
डहाणू : डहाणू तालुक्यातील रणकोळ येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांची शासकीय आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना काल रात्री (दि.५) जेवणामधून विषबाधा झाली.
सांंगली : माजी उपमुख्यमंत्री आरआर आबांच्या मतदारसंघामध्ये यावेळी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांतच लढतीचे संकेत मिळत असून आबांचे चिरंजीव रोहित पाटील या युवा नेतृत्वाला मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची खेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून खेळली जाणार आहे. मतदारसंघातील एकूण गणिते लक्षात घेता आबांच्या पुत्रासाठी आमदारकीची वाट बिकट मानली जाते.
सविस्तर वाचा….
कोल्हापूर : इतिहासात विविध घडामोडींनी गाजलेला विशाळगड आता एका वनस्पती शोधाच्या नवलाईने देखील ओळखला जाणार आहे. कंदीलपुष्प वनस्पतीच्या कुलातील एका नव्या प्रजातीचे येथे प्रथमच दर्शन घडले आहे.
नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील कळवण रस्त्यावरील एका दुकानात कारवाई करुन विना परवाना व मिथ्याछाप चहा पावडरचा साठा जप्त करण्यात आला. दोन लाखांहून अधिक किंमतीचा हा माल असून नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण रस्त्यावरील मे. नाशिक टी कंपनी येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत विक्रेत्यांकडून पेढीस अन्न सुरक्षा परवाना नसतानाही घाऊक स्वरूपात चहा विक्री होत असल्याचे उघड झाले. विक्रीसाठी साठवलेल्या चहा पावडरच्या पोत्यांवरील पट्टीवर कायद्यानुसार आवश्यक असलेला मजकूर छापलेला नव्हता. असे अन्नपदार्थ मिथ्याछाप या वर्गात येत असल्याने विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडील ५६० किलोचा दोन लाख एक हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
नवी मुंबईत बांधकाम प्रकल्पांमध्ये इमारतीचा पाया खणण्यासाठी होणाऱ्या नियंत्रित स्फोटांमुळे आसपासच्या इमारतींना बसणारे हादरे, प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. बांधकाम साहित्य घेऊन येणारी वाहने रस्ते अडवत असल्याने रहिवासी मेटाकुटीस आले आहेत.
ठाणे : ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १२३ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच, त्यापाठोपाठ आता १५ व्या वित्त आयोगातून १८० विद्युत वातानुकूलीत बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत. त्यापैकी ८६ बसगाड्यांबरोबरच केंद्र शासनाच्या पीएम ई बस सेवा योजनेंतर्गत १०० अशा एकूण १८६ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या वर्षभरात परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले असून आज धाराशिव येथे मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षण विषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली. यानंतर तब्बल दहा ते पंधरा मिनिटे मराठा आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी आरक्षणाविषयी बोलताना महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
चंद्रपूर : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या कल्याण जवळील मोहिली जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्राचा महावितरणच्या कांबा (म्हारळ) उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून बंद झाला आहे.
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव, मोठागाव भागातील उल्हास खाडीत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या बोटी, वाळू उपशाचे पंप, बार्जेस महसूल विभागाच्या डोंबिवली विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नष्ट केले. खाडी किनारी महसूल अधिकाऱ्यांना पाहताच वाळू तस्कर बोटीतून खाडीत उड्या मारून माणकोली गाव बाजुला पोहत पसार झाले.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आव्हान दिले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला विलंब करण्याच्या उद्देशाने ही याचिका केल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी सोमवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र अजित पवार गटाने वेळ वाढवून मागितल्यानंतर सरन्यायाधीशांनी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यानंतर ही सुनावणी पार पडेल.
CJI: shiv sena the papers are all complete.
— Live Law (@LiveLawIndia) August 6, 2024
Counsels of NCP matter ask for additional time
CJI: on request of Sr Adv NK Kaul, time to file counter extended for 3 weeks, in the meantime nodal counsels shall prepare compilation in 2 weeks #ShivSena #NCP #SupremeCourt
पुणे : काडीपेटी न दिल्याने मद्यालयातील सुरक्षारक्षकासह रोखपालाला टोळक्याने मारहाण केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. टोळक्याने मद्यालयातील रोखपालाच्या डोक्यात बाटली फोडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मराठा ठोक मोर्चातर्फे आज मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अडविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.