Mumbai Pune Live Updates Today, 27 September 2024 : विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीच्या आधीच राज्यात राजकारण तापलं आहे. यातच बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच पुण्यातील मेट्रोच्या उद्घाटनावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राजकारण तापलं आहे. दरम्यान, यासह राज्यातील आणि देशातील घडणाऱ्या घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Live Today, 27 September 2024

14:50 (IST) 27 Sep 2024
पुणे, कोल्हापूर, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

सविस्तर वाचा....

14:46 (IST) 27 Sep 2024
बोरणे घाटात दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात; दोन महिलांसह तीन पुरुष गंभीर जखमी

साताऱ्यातील ठोसेघर या ठिकाणी बोरणे घाटात भीषण अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातानंतर गाडी दोनशे फूट दरीत कोसळली आहे. यामध्ये दोन महिला व तीन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत

14:40 (IST) 27 Sep 2024
नागपूमध्ये आदिवासी गोंड गोवारी समाजाचे आंदोलन, हजारो नागरिक आंदोलनात सहभागी

गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपूरमध्ये आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. या आंदोलनात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यावेळी सरकारकडे काही प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नागपूरमधील या आंदोलनानंतर आता राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

14:11 (IST) 27 Sep 2024
चंद्रपूर: घुग्घुसवासियांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरणार

घुग्घुस आणि परिसरातील नागरिकांना प्रदूषणामुळे गाव सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू केला आहे.

सविस्तर वाचा...

14:00 (IST) 27 Sep 2024
पुणे : डॉ. बिबेक देबराय यांचा गोखले संस्थेच्या कुलपती पदाचा राजीनामा

पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत सुरू असलेल्या प्रकरणात नवेच वळण आले आहे. डॉ. बिबेक देबराय यांनीच पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 27 Sep 2024
नागलाबंदर खाडी किनारा सुशोभिकरण कामाला महिनाभरात सुरुवात, दोन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होणार

ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागातील खाडी किनारी भागात चौपाटी विकसित करण्यात आली असतानाच, त्यापाठोपाठ आता या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात गायमुख ते नागलाबंदर खाडी किनारा विकसित करून आरामाराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

13:58 (IST) 27 Sep 2024
कोल्हापूर: मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा सासू, सासऱ्याने काटा काढला; दोन्ही आरोपी जेरबंद

मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या डायरीनुसार त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे स्पष्ट झाले. त्याच डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाइल नंबर मिळाला.

सविस्तर वाचा...

13:57 (IST) 27 Sep 2024
Video: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

13:36 (IST) 27 Sep 2024
वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल पुरविणारा सराइत गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा....

13:35 (IST) 27 Sep 2024
खबरदार…! रस्त्यावर न दिसल्यास होणार कारवाई, आयुक्तांचा इशारा

पुणे : शहरातील पावसाळी गटारांची स्वच्छता संबंधित ठेकेदारांकडून करून घ्यावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

सविस्तर वाचा....

13:35 (IST) 27 Sep 2024
वैज्ञानिक संशोधन आता अधिक वेगवान… संशोधन संस्थांमध्ये स्वदेशी बनावटीचे महासंगणक

पुणे : प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) विकसित केलेले भारतीय बनावटीचे ‘परम रुद्रा’ ही महासंगणन प्रणाली देशातील तीन संशोधन संस्थांना देण्यात आली आहे. या महासंगणन प्रणालीमुळे विविध प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनाला गती मिळणे शक्य होणार आहे.

सविस्तर वाचा.....

13:26 (IST) 27 Sep 2024
नाशिक : लाच स्वीकारताना तलाठीस अटक

नाशिक : शेतजमिनीवर कर्ज काढण्यासाठी नोंदीत फेरफार करून देण्यासाठी लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिंडोरी तालुक्यातील वणी येथील तलाठी शांताराम गांगुर्डे यास ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

12:47 (IST) 27 Sep 2024
कल्याणच्या राधानगरमधील दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील राधानगर भागातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या सततच्या वाहन कोंडीमुळे या भागातील रहिवासी हैराण आहेत

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 27 Sep 2024
भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात पडला, दोन लहान मुली गेल्या वाहून, १३ किरकोळ जखमी

साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव मार्गावरील वडगाव नाल्यावर आज पहाटे ही घटना घडली.

सविस्तर वाचा...

12:35 (IST) 27 Sep 2024
मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात एका महिलेकडून नासधूस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयामधील कार्यालयात जाऊन एका अज्ञात महिलेने गुरुवारी नासधूस केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर या अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील त्यांच्या नावाचा बोर्ड देखील काढून फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

12:28 (IST) 27 Sep 2024
मेट्रोचे उद्घाटन, पाऊस अन् मोदींचा दौरा रद्द; जे नागपुरात घडले होते तेच पुण्यात…

जे नागपुरात घडले तेच पुण्यात घडले. पाऊस, मोदी आणि मेट्रो यांचा एकत्रित योग याची चर्चा सध्या मेट्रो वर्तुळात जोरात आहे.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 27 Sep 2024
ओबीसी प्रीमॅट्रिक शिष्यवृत्तीचा १६ कोटींहून अधिकचा निधी परत का गेला?

ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचा १६ कोटींहून अधिकचा निधी परत गेला (व्यपगत) आहे.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 27 Sep 2024
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव

ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्याच ठिकाणी तो उभा राहिला पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

11:59 (IST) 27 Sep 2024
पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी सुरु केलेलं महाविकास आघाडीचं आंदोलन मागे

पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती. पुणे शहरातील नागरिकांना शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? असा सवाल महाविकास आघाडीने केला होता. तसेच मेट्रो मार्गाचे उद्घाटन आजच करा, आम्ही उद्घाटन करतो, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला होता. मात्र, प्रशासनाबरोबरील चर्चांनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यात सुरु केलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह आदी नेत्यांनी सहभागी झाले होते.

11:47 (IST) 27 Sep 2024
मेट्रो सुरु करा, पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन

प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 27 Sep 2024
वर्धा: जलाशयातून विसर्ग, पुरस्थितीमुळे बचाव पथके सज्ज

लहान मोठी सर्वच धरणं तुडुंब भरली असून सातत्याने पाण्याचा विसर्ग सूरू आहे.

सविस्तर वाचा...

11:45 (IST) 27 Sep 2024
Jayakwadi Dam: नाशिकमधून मराठवाड्याकडे ४८ टीएमसी पाणी, गंगापूरसह १२ धरणांमधून विसर्ग

पावसाने नव्याने जोर धरल्याने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमधून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

11:45 (IST) 27 Sep 2024
मुनगंटीवार म्हणाले, “जागा वाटपाबाबत महायुतीत एकमत…”

महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत आहे .कुठलेही मतभेद नाही. महायुतीतील तिन्ही नेत्यांशी मी व्यक्तिगत बोललो आहे.

सविस्तर वाचा...

11:44 (IST) 27 Sep 2024
‘कॅन्सर’च्या वेदना असह्य; ‘त्यांनी’ घेतला गळफास, आईने दरवाजा…

जीवनात थोडी स्थिरता लाभली, पोरं कमावती झाल्याचे समाधान मिळाले. मात्र नियती म्हणा की नशिबाला म्हणा हे मंजूर नव्हते!

सविस्तर वाचा...

11:44 (IST) 27 Sep 2024
MPSC Result: वडिलांचे छत्र हरपले, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष; वैष्णवी झाली उपजिल्हाधिकारी

वैष्णवी बावस्करची सहा महिन्यांपूर्वीच मंत्रालयातील गृह विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली.

सविस्तर वाचा...

11:43 (IST) 27 Sep 2024
शिवसेनेतील बंडाचे कारण केवळ हिंदुत्व, ‘धर्मवीर’ मध्ये हेच अधोरेखित

चित्रपटाच्या सुरुवातीलाच पालघर मधील दोन साधू हत्या घटनेने व्यतीत झालेले तात्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झोपेतून दचकून जागे झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

11:40 (IST) 27 Sep 2024
"मेट्रोचे उद्घाटन आजच करा, अन्यथा...", महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पुण्यात आंदोलन

पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. पुणे शहरातील नागरिकांना शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? असा सवाल करत मेट्रो मार्गाचे उद्घाटन आजच करा, आम्ही उद्घाटन करतो असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यात आंदोलन सुरु केले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह आदी नेत्यांनी सहभागी झाले आहेत.

11:33 (IST) 27 Sep 2024
"आम्हाला मेट्रो स्थानकात प्रवेश करून द्यावा, अन्यथा...", प्रशांत जगतापांचा इशारा

"पुणेकरांची फसवणूक आम्ही सहन करणार नाहीत. राज्य सरकारने पुणे पोलिसांना पुढे करून आम्हाला मेट्रोचे उद्घाटन करण्यापासून रोखलं आहे. मात्र, आम्ही उद्घाटन केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत. पोलिसांवर सरकारचा दबाव आहे. आम्हाला मेट्रो स्थानकात प्रवेश करून द्यावा, त्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत", असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलतान दिला.

11:16 (IST) 27 Sep 2024
पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी

पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकलले आहे. मात्र, यावरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे शहरातील नागरिकांना शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? असा सवाल करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यात आंदोलन सुरु केले आहे. येत्या २४ तासांत हा मेट्रोमार्ग सुरु करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.

10:41 (IST) 27 Sep 2024
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार? मतमोजणीला सुरुवात

Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ९ वाजता सुरुवात झाली आहे. ठाकरे गट युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये ही निवडणूक झाली आहे. त्यामुळे आता या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यानंतर पुण्यात राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांनी या मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Pune Metro

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला.