Mumbai Pune Live Updates Today, 27 September 2024 : विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीच्या आधीच राज्यात राजकारण तापलं आहे. यातच बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच पुण्यातील मेट्रोच्या उद्घाटनावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राजकारण तापलं आहे. दरम्यान, यासह राज्यातील आणि देशातील घडणाऱ्या घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Live Today, 27 September 2024

16:50 (IST) 27 Sep 2024
Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने खाते उघडले; मयूर पांचाळ विजयी

Mumbai University Senate Election 2024 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागत आहे. या सिनेट निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. आता मतमोजणी सुरु असून शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने खाते उघडले असून मयूर पांचाळ ओबीसी प्रवर्गामधून विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. मयूर पांचाळ यांना ५ हजार ३५० मते मिळाली आहेत. दरम्यान, अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.

16:43 (IST) 27 Sep 2024
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला

कल्याणीनगर अपघात प्रकरणात गु्न्हा दाखल झालेला बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेने प्रवेश नाकारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. सविस्तर वाचा…

16:42 (IST) 27 Sep 2024
पुणे : चोरट्यांचा आंबा बर्फीवर ताव; मिठाई विक्री दुकानातून रोकड, अडीच किलो आंबा बर्फी चोरीस

मिठाई विक्री दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोकड आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याबाबत मिठाई विक्रेते सैतानसिंग सवाईसिंग देवडा (वय ४८, रा. एकता हाऊसिंग सोसायटी, गोल्फ क्लब रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचा…

16:42 (IST) 27 Sep 2024
लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण उद्योग विभागात! उद्योगमंत्री म्हणतात…

नागपुरातील कार्यक्रमातही लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण झाले. उद्योगाशी संबंधित कार्यक्रमात या योजनेच्या सादरीकरणावर खुद्द उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.

सविस्तर वाचा…

16:33 (IST) 27 Sep 2024
अकोला: शीतपेयात गुंगीचे औषध टाकून मुलीवर सामूहिक अत्याचार

शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात उघडकीस आली.

सविस्तर वाचा…

16:26 (IST) 27 Sep 2024
काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

धुळे : काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील (८४) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलेग, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

सविस्तर वाचा…

16:01 (IST) 27 Sep 2024
ठाणे : शेअर बाजारातील गुतंवणूकीच्या माध्यमातून दोघांची लाखो रुपयांना फसवणूक

ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे सांगून भामट्यांनी ठाण्यातील दोघांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा…

15:57 (IST) 27 Sep 2024
रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी – डॉक्टरविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत परशुराम बाळकृष्ण वाडेकर (वय ५३, रा. कुंदन हेरिटेज, मुंबई-पुणे रस्ता, खडकी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा…

15:57 (IST) 27 Sep 2024
पुणे: जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान मृत्यू

नाना पेठेत एका जुगार अड्ड्यावर पोलिस कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्यांमधील एकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि त्या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वाचा…

15:55 (IST) 27 Sep 2024
Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक; ओबीसी प्रवर्गामधून युवासेनेचे मयूर पांचाळ विजयी

Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागणार आहे. या सिनेट निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे मयूर पांचाळ ओबीसी प्रवर्गामधून विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे.

15:53 (IST) 27 Sep 2024
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने व सर्व राज्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष काढून घेतले आणि ते स्वतःकडे घेतले आहे. सविस्तर वाचा…

15:45 (IST) 27 Sep 2024
मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

मुंबई: मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री लोकल विस्कळीत झाली आणि कार्यालयीन काम आटोपून घरी निघालेल्या असंख्य कर्मचाऱ्यांची कोंडी झाली. परिणामी, लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमुळे लोकलमधून पडून एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा….

15:32 (IST) 27 Sep 2024
बदलापूर, अंबरनाथला मिळणार अतिरिक्त पाणी उल्हास नदीतून आरक्षण मंजूर, योजना मार्गी लागणार

बदलापूर: अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी उल्हास नदीतून अतिरिक्त ७ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

15:22 (IST) 27 Sep 2024
वसईतील खदाणी धोकादायक! वसई नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू

वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा खदाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.

सविस्तर वाचा…

15:21 (IST) 27 Sep 2024
नागपूर : ती ‘फाईल’ बंद! नागपूर विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने…

विमानतळ विकास कंत्राटाची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आल्यानंतर जीएमआर एयरपोर्ट व जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एयरपोर्ट या कंपन्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 27 Sep 2024
डोंबिवलीत घरडा सर्कल ते पेंढरकर महाविद्यालय रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहनतळ, धावणाऱ्या वाहनांसाठी एकेरी मार्गिका उपलब्ध

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी भागातील घरडा सर्कल ते के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा वाहन चालक दुचाकी, मोटारी उभ्या करून ठेवत आहेत.

सविस्तर वाचा…

14:50 (IST) 27 Sep 2024
पुणे, कोल्हापूर, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

सविस्तर वाचा….

14:46 (IST) 27 Sep 2024
बोरणे घाटात दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात; दोन महिलांसह तीन पुरुष गंभीर जखमी

साताऱ्यातील ठोसेघर या ठिकाणी बोरणे घाटात भीषण अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातानंतर गाडी दोनशे फूट दरीत कोसळली आहे. यामध्ये दोन महिला व तीन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत

14:40 (IST) 27 Sep 2024
नागपूमध्ये आदिवासी गोंड गोवारी समाजाचे आंदोलन, हजारो नागरिक आंदोलनात सहभागी

गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपूरमध्ये आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. या आंदोलनात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यावेळी सरकारकडे काही प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नागपूरमधील या आंदोलनानंतर आता राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

14:11 (IST) 27 Sep 2024
चंद्रपूर: घुग्घुसवासियांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरणार

घुग्घुस आणि परिसरातील नागरिकांना प्रदूषणामुळे गाव सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू केला आहे.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 27 Sep 2024
पुणे : डॉ. बिबेक देबराय यांचा गोखले संस्थेच्या कुलपती पदाचा राजीनामा

पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत सुरू असलेल्या प्रकरणात नवेच वळण आले आहे. डॉ. बिबेक देबराय यांनीच पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 27 Sep 2024
नागलाबंदर खाडी किनारा सुशोभिकरण कामाला महिनाभरात सुरुवात, दोन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होणार

ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागातील खाडी किनारी भागात चौपाटी विकसित करण्यात आली असतानाच, त्यापाठोपाठ आता या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात गायमुख ते नागलाबंदर खाडी किनारा विकसित करून आरामाराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

13:58 (IST) 27 Sep 2024
कोल्हापूर: मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा सासू, सासऱ्याने काटा काढला; दोन्ही आरोपी जेरबंद

मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या डायरीनुसार त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे स्पष्ट झाले. त्याच डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाइल नंबर मिळाला.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 27 Sep 2024
Video: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

13:36 (IST) 27 Sep 2024
वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल पुरविणारा सराइत गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा….

13:35 (IST) 27 Sep 2024
खबरदार…! रस्त्यावर न दिसल्यास होणार कारवाई, आयुक्तांचा इशारा

पुणे : शहरातील पावसाळी गटारांची स्वच्छता संबंधित ठेकेदारांकडून करून घ्यावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

सविस्तर वाचा….

13:35 (IST) 27 Sep 2024
वैज्ञानिक संशोधन आता अधिक वेगवान… संशोधन संस्थांमध्ये स्वदेशी बनावटीचे महासंगणक

पुणे : प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) विकसित केलेले भारतीय बनावटीचे ‘परम रुद्रा’ ही महासंगणन प्रणाली देशातील तीन संशोधन संस्थांना देण्यात आली आहे. या महासंगणन प्रणालीमुळे विविध प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनाला गती मिळणे शक्य होणार आहे.

सविस्तर वाचा…..

13:26 (IST) 27 Sep 2024
नाशिक : लाच स्वीकारताना तलाठीस अटक

नाशिक : शेतजमिनीवर कर्ज काढण्यासाठी नोंदीत फेरफार करून देण्यासाठी लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिंडोरी तालुक्यातील वणी येथील तलाठी शांताराम गांगुर्डे यास ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 27 Sep 2024
कल्याणच्या राधानगरमधील दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील राधानगर भागातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या सततच्या वाहन कोंडीमुळे या भागातील रहिवासी हैराण आहेत

सविस्तर वाचा…

12:40 (IST) 27 Sep 2024
भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात पडला, दोन लहान मुली गेल्या वाहून, १३ किरकोळ जखमी

साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव मार्गावरील वडगाव नाल्यावर आज पहाटे ही घटना घडली.

सविस्तर वाचा…

पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यानंतर पुण्यात राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांनी या मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला.