Maharashtra Latest News Live Updates, 24 January 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच डाव्होस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात झालेल्या अवाढव्य खर्चावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चार दिवसात साधरणत: ३५ ते ४० कोटी रुपये खर्च केल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवाय या डाव्होस दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत अधिकृतपणे कोण गेलं होतं? आणि अनधिकृतपणे कोण गेलं होतं? यावरूनही सवाल उपस्थित केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आदित्य ठाकरे यांच्या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
Maharashtra Live Updates : देश, विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर….
प्रजास्ताक दिनानिमित्त गुप्तचर विभागाने राज्यात घातपात होण्याची शक्यता वर्तविली असल्यामुळे नागपूर पोलीस ‘अलर्ट मोड’वर आहेत. नागपुरात ३ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
‘पठाण’ चित्रपटाचा फलक मधुबन सिनेमागृहावरून हटविण्यात यावा यावरून बजरंग दलाच्या डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी चित्रपटगृह मालकाबरोबर चर्चा करून सिनेमागृहावरील ‘पठाण’ चित्रपटाचा फलक काढण्यात आला.
सविस्तर वाचा…
पुणे – कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. शिवसेनासह राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बिनविरोध निवडणुकीऐवजी या मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याची चर्चा आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार, मात्र विनंती मान्य करायची की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित करत सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्यातून निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतची माहितीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आली आहे.
नगरः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तथा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावरच पक्षाने अन्याय केल्याची भूमिका घेत त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
भिवंडी येथील शांतीनगर भागात एका तीन वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. गळा दाबून तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती भिवंडीचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली.
सविस्तर वाचा…
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप या दोघांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.
ठाणे : सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मोठे समर्थन मिळाले असून पक्षातील या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच ठाणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सध्या मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उद्धव यांचा पहिलाच दौरा होणार असून या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर : एसटी महामंडळाला (एसटी) पंचवीस वर्षांहून जास्त काळ अपघातरहित सेवा देणारे ८२० चालक आहेत. यापैकी आधीच सन्मानित ३० चालक वगळून इतर ७२० चालकांचा २६ जानेवारीला प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस देऊन सपत्नीक विभागनिहाय सत्कार केला जाणार आहे. शिस्तीने वाहन चालवून अपघात टाळता येत असल्याचे एसटीतील अनेक चालकांनी दाखवून दिले आहे.
उन्हाळ्यात एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांची मागणी अधिक असते, परंतु सध्या कडाक्याची थंडी पडली असल्याने रसाळ फळांची मागणी २० ते २५ टक्के रोडावली आहे. सध्या बाजारात अंजीर आणि स्ट्रॉबेरीची मागणी वाढली असून सफरचंद, मोसंबी-संत्रा, कलिंगडकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
प्रवासी क्षमता वाढवणे आणि लोकल प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येत असतानाच मध्य रेल्वेवर मात्र अतिरिक्त फेऱ्यांना खिळ बसला आहे. मध्य रेल्वेवर १५ डबा जलद लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी नवीन मार्गिकेची गरज असून सध्याच्या वेळापत्रकातही स्थान मिळू शकलेले नाही.
मुंबईमध्ये तीन तास ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवून ५१ पाहिजे/फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून, अन्य काही गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्यात आली. त्याचबरोबर अवैध मद्य विक्री, अनधिकृत फेरीवाले, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
कल्याण जवळील आंबिवली मधील इराणी वस्तीतील एक सराईत चोरटा मोक्का कायद्याने न्यायालयीन कोठडीत होता. त्याला दोन वर्षापूर्वी करोना महासाथीच्या काळात करोनाची लागण झाल्याने कल्याण डोंबिवली पालिके्च्या भिवंडी जवळील टाटा आमंत्रा करोना काळजी केंद्रात उपचारासाठी ठेवले होते.
पापडाखुर्द हत्याकांडाचे व्रण ताजे असतानाच लाखनी तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गराडा गावातील एका अल्पवयीन मुलाने गावातील ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी पुस्तकाचे ‘भारत मार्ग’ या नावाने मराठी अनुवाद करण्यात आले आहे. या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन जयशंकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (२८ जानेवारी) होणार आहे.
गोवरचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने दिलेल्या सूचनेनुसार दोन टप्प्यांमध्ये नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा चेंबूर परिसरात प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करणारी एक आरोग्य सेविका मंगळवारपासून बेपत्ता झाली आहे. आरोग्य केंद्रात ती सकाळी येऊन गेली. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही.
गृहप्रकल्पाची संकेतस्थळावरून विक्री करणाऱ्या विविध वेब पोर्टल्सची रिएल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी बंधनकारक करण्याचा महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण म्हणजे महारेराचा आदेश योग्य की अयोग्य असा निर्णय न देता, याबाबतची संदिग्धता महाराष्ट्र अपीलीय लवादाने कायम ठेवली आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार लाकडाऐवजी विद्युत दाहिन्यांवर करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न चालविले असले तरी त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
ठाणे शहराजवळील दिवा भागात महाराष्ट्र- उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष सुशील पांडे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या निलेश पाटील यांच्यासह सात जणांवर मारहाणीचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीतील (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) ‘मुंबई १’ कार्डद्वारे आता बेस्ट बसमधून प्रवास करता येणार आहे.
शहरातील भूईकोट किल्ल्याभोवती झालेली अतिक्रमणे हटवून या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यात यावे, या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत आणि दुरूस्ती पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील पुनर्रचित इमारतीतील २० हजारांहून अधिक रहिवाशांना थकीत सेवाशुल्क भरण्यासंबंधी नोटीस बजावली होली. ७० ते ८० हजार रुपये रक्कम भरण्यासंबंधीची ही नोटीस पाहून रहिवाशी हवालदिल झाले होते.
भीमा नदीत बीडमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, अखेर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. या सातही लोकांची आत्महत्या नसून हत्या झाली आहे. यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
मानवी हस्तक्षेप कमी करून गतीने सेवा देण्यासाठी महसूल विभागाकडून ई-फेरफार प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र सातबारा उताऱ्यावरील खरेदी आणि वारस नोंदींचे फेरफार जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील पाच तलाठ्यांना नोटीस बजावत जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
सध्या देशात धीरेंद्र कृष्ण महाराज आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या वादात आता नाशिकच्या साधूंनी उडी घेत धीरेंद्र कृष्ण महाराजांचे समर्थन केले आहे. तसेच जादूटोणाविरोधी कायदाच रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, कायदा करतानाच त्यातील धार्मिक विधींसह अनेक बाबी वगळण्यात आल्या होत्या. साधूंना हा कायदा का नकोसा वाटतो आणि त्यातील कोणत्या तरतुदी धीरेंद्र कृष्ण महाराजांना अडचणीच्या ठरू शकणाऱ्या आहेत याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ५९ हजार ७४६ जणांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. मात्र, नव्या संगणकप्रणालीनुसार यंदाची सोडत निघणार असल्याने केवळ १८७१ नागरिकांच्या अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित अर्ज प्रक्रियेत आहेत. त्यामुळे नव्या संगणकप्रणालीचा फटका म्हाडाच्या सोडतीला बसल्याचे समोर आले आहे.
पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने तीन महिन्यांपूर्वी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रेट निकोबार बेटावरील महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली. हा प्रकल्प सुमारे ७२ हजार कोटी रुपयांचा आहे आणि पुढील ३० वर्षांत तो टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. विशेषकरून सागरी जैवविविधतेवर त्याचा परिणाम होणार असल्याने पर्यावरणवाद्यांनी त्याला विरोध केला असला, तरी सरकारचा निर्धार कायम आहे.
गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार संबंधित महिलेचाच आहे. तो कायद्याने अनिवार्य केलेल्या वैद्यकीय मंडळालाही नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका विवाहितेला ३२व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी देताना उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. विशेष म्हणजे गर्भात गंभीर विकृती असल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाल्यानंतरही, गर्भधारणा अंतिम टप्प्यात असल्याच्या कारणास्तव ती कायम ठेवण्याची शिफारस वैद्यकीय मंडळाने केली होती. ती अमान्य करून न्यायालयाने या विवाहितेला गर्भपाताची परवानगी दिली. ही परवानगी का महत्त्वाची हेही न्यायालयाने नमूद केले. थोडक्यात, या निर्णयामुळे गर्भधारणा कायम ठेवायची की गर्भपात करायचा याबाबतचा स्त्रीचा अधिकार पुन्हा एकदा प्रामुख्याने अधोरेखित झाला. तिच्या या निर्णयात अन्य कोणालाच स्थान नाही, हेही स्पष्ट केले आहे.
पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावा, अशी आमची भूमिका असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सविस्तर बातमी