Mumbai Maharashtra Today : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( २ ऑक्टोबर ) समोर आली. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासह राज्यातील विविध बातम्या जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News in Marathi : महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी एका क्लिकवर…
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे : गणेशोत्सवानंतर दोन दिवसांत मंडप, कमानी काढण्याच्या हमीवर परवानगी घेतलेल्या सार्वजनिक मंडळांचे मंडप, कमानी आणि विसर्जन मिरवणुकीतील रथ रस्त्यावरच उभे आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असून, त्याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यास सुरुवात झाली आहे.
अमरावती: वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतातील तारांच्या कुंपणामध्ये जिवंत विद्युत प्रवाहित केल्यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो.
कवींना कधी काय सुचेल सांगता येत नाही. म्हणूच ‘ जो ना देखे रवी, ओ देखे कवी!’ ही म्हण अस्तित्वात आली असावी. त्यामूळेच सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात संताप व्यक्त करताना आर्णी येथील कवी विजय ढाले यांनी शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात शासनाला गुन्हेगार ठरविले आहे. या निर्णयाविरोधात सरकारविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. शासनाने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. यात राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळा दत्तक देण्याचे घोषित केले.
हुंड्यासाठी विवाहितेचा झळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी विवाहितेने पतीपासून घटस्फोट घेत हुंड्यासाठी पती, सासू व सासऱ्यांनी छळ केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई: गव्हाणफाटा वाहतुक शाखेच्या – हददीतील चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील चिरनेर ब्रिज हा धोकादायक झाला आहे. सदर ब्रिजचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे.
मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला. लहान मुलगी मित्र – मैत्रिणींसोबत खेळत असताना आरोपीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसींच्या मागण्यांसाठी २० दिवस अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सरकारला ओबीसींच्या मागण्या मान्य करायला लावणारे टोंगे नेमके आहेत तरी कोण, ते काय करतात, याबाबत जाणून घेण्यास तुम्हालाही उत्सुकता असेलच.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज सोलापुरातील मोहोळमध्ये धनगर समाजाकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्रिपल इंजिन सरकार हे खुनी सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्याच्या सरकारचा कारभार आपण सर्व जण पाहत आहात.
कराड : पुण्याच्या खडकवासला परिसरातील बिबट्याच्या शिकारप्रकरणी वन विभागाने कराड शेजारील ओगलेवाडी-हजारमाची येथे संशयिताच्या घरावर टाकलेल्या छाप्यात बिबट्याचे कातडे, गवा, भेकर, हरिण यांची शिंगे यासह अन्य साहित्य मिळून आले.
उरण: न्हावा शिवडी सागरी (पारबंदर) पुलामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे सर्वात नजीकचे उपनगर म्हणून उरणच्या विकासाला वेग येणार आहे.
डोंबिवली: येथील एमआयडीसीतील मिलापनगर भागातील एक बंगल्याच्या शेजारी विजेचा एक खांब गंजला आहे.
“नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली….!,” असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
बुलढाणा : शेतातील दैनंदिन कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पाईपातून फुस्स आवाज आला अन त्याची बोबडी वळली! भयभीत झालेल्या कास्तकाराने मग धावा केल्यावर घटनास्थळी आलेल्या ‘श्रीराम’ ने त्यांना संकटमुक्त केले.
देशभरासह राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरीही अद्याप राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कल्याण: महादेव कोळी अनुसूचित जमातीचे बनावट जात प्रमाणपत्र पालिकेत दाखल करुन त्या आधारे नोकरी मिळविणारे कल्याण डोंबिवली पालिकेतील अधिसंख्य पदावरील (कंत्राटी) चार कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) साठी विविध विषयांच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. शुल्क २९ ऑक्टोबरपर्यंत जमा केले जाईल.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. कधी रिमझिम पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कडक ऊन पडतं असल्याने सर्दी, ताप, खोकल्यासह साथरोग बळावले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे.
ठाणे: महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी केली जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटाच्या मतदार यादीची काटेकोर छाननी करण्यात आली होती. मात्र, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी यादीबाबत घेतलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा यादीच्या छाननीचा आग्रह धरला आहे. मतदारांची संख्या आणि आक्षेपांचे स्वरूप यामुळे एका दिवसात छाननी करणे आणि त्याचा अहवाल सादर करणे शक्य झाले नसते. त्यामुळे, निवडणूक पुढे ढकलण्यात आली, असा दावा मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयात केला आहे.
पुणे : कात्रज बाह्यवळण मार्गावर मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ललिता विजय बोरा (वय ६५, रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक अनिरुद्ध खैरनार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर: अंबाझरी तलावात उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. शंकर रामदास बडवाईक (३०) रा. माऊलीनगर, वाडी असे मृताचे नाव आहे.
मुंबई : राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असली तरी मुंबई मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर वार्षिक सरासरीच्या १०४ टक्के तर सांताक्रूझ केंद्रावर १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदा चार महिन्यांत ४६ ते ५० दिवस पाऊस पडला.
नाशिक – जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १३ दिवसांनंतर मंगळवारी कांदा लिलाव पूर्ववत झाले. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत सकाळी १० वाजेपर्यंत ४०० वाहने दाखल झाली. या माध्यमातून सहा हजार क्विंटलची आवक झाली. प्रारंभीच्या लिलावात सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला. जिल्ह्यातील पिंपळगावसह अन्य सर्व बाजार समित्यांमध्ये लिलावाला सुरुवात झाली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले. यापूर्वी या जलतरण तलावाच्या परिसरात साप, अजगर आढळले आहेत. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
कवींना कधी काय सुचेल सांगता येत नाही. म्हणूच ‘ जो ना देखे रवी, ओ देखे कवी!’ ही म्हण अस्तित्वात आली असावी. त्यामूळेच सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात संताप व्यक्त करताना आर्णी येथील कवी विजय ढाले यांनी शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात शासनाला गुन्हेगार ठरविले आहे.
बिहारमधील जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर होताच जातीच्या आधारे देशात फूट पाडली जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी राज्यात ओबीसी जनगणनेचे समर्थन करण्याची वेळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आली.
नागपूर: बहिणीने मोबाईल देण्यास नकार दिल्यावरून एका ११ वर्षीय मुलाने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत डिगडोह परिसरात घडली. या घटनेवरून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई: पावसाळा सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये डोळे येण्याची साथ पसरली होती. राज्यामध्ये दिवसाला साधारणपणे दररोज १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले होते.
"वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. या स्थळी महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा पदस्पर्श झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील," असं विधान खासदार सुप्रिया सुळे केलं आहे.