Mumbai Maharashtra Today : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( २ ऑक्टोबर ) समोर आली. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासह राज्यातील विविध बातम्या जाणून घेणार आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra Live News in Marathi : महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी एका क्लिकवर…

11:27 (IST) 3 Oct 2023
सिंदेवाहीत शेतात हत्ती मृतावस्थेत आढळला; वन खात्यात खळबळ

चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून सिंदेवाही तालुक्यात हत्तीने धुमाकूळ घातला असताना मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी एक हत्ती मृतावस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 3 Oct 2023
नागपूर : शेजारच्या वहिणीवर जडला युवकाचा जीव अन्…

नवविवाहित असलेल्या ३० वर्षीय शेजारच्या वहिणीवर १८ वर्षांच्या युवकाचा जीव जडला. त्याने घरी येणे-जाणे वाढवून मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल नंबर घेऊन वहिणीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, वहिणीने पती घरी येताच मॅसेज दाखवला. पारा चढलेल्या अवस्थेतच त्याने शेजारच्या युवकाची जबरदस्त धुलाई केली. त्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली.

वाचा सविस्तर…

11:20 (IST) 3 Oct 2023
महामार्गावर अपघातामुळे कोंडी

ठाणे: पूर्व द्रुतगती महामार्गावरील माजिवडा भागात मंगळवारी सकाळी चालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावर उलटला. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 3 Oct 2023
नवे विमानतळ मुंबईच्या आणखी जवळ; शिवडी न्हावा शेवा पुलापासून विमानतळापर्यत थेट सागरी किनारा मार्ग

नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबई या दोन महत्वाच्या शहरांना जवळ आणणाऱ्या बहुचर्चित शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणारा सात किलोमीटर अंतराचा नवा सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला असून महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने या महत्वकांक्षी प्रकल्पास हिरवा कंदील दाखविल्याने या मार्गातील पुल उभारणीसाठी आवश्यक निवीदा प्रक्रिया सिडकोने सुरु केली आहे.

सविस्तर वाचा…

10:46 (IST) 3 Oct 2023
स्पर्धा परीक्षेत अपयश; खचलेल्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…

स्पर्धा परीक्षेत सतत येत असलेल्या अपयशाने खचून जात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुसद येथे उजेडात आली. धनश्री मधुकर राठोड (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

10:34 (IST) 3 Oct 2023
दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीचे विस्तारीकरण; १२१.५८ हेक्टर वनजमीन…

शहरालगत वेकोलिची दुर्गापुर खुली कोळसा खाण काही वर्षांपासून सुरू आहे. या खाणीमुळे जल जंगल व वाघांचा अधिवास कमी झाल्याचा आरोप पर्यावरणवादींकडून होत असतानाच राज्य शासनाने मंगळवारी कोळसा खाण विस्तारासाठी १२१.५८ हेक्टर वनजमीन वळती करण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर वाचा

10:33 (IST) 3 Oct 2023
“निवडणुका लढणार नाही, पण…”, योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केली भूमिका

भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक व विचारवंत योगेंद्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलतांना संघटनेची भूमिका स्पष्ट केली. आज देश व संविधान वाचविण्याची गरज आहे. त्यासाठी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप सरकारला पराभूत करण्याचा चंग बांधला आहे.

सविस्तर वाचा

10:33 (IST) 3 Oct 2023
सोहमच्या शिक्षणासाठी ऑफ्रोट फाऊंडेशनकडून ५० हजारांची मुदत ठेव

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यासोबत झालेल्या संवादाच्या चित्रफितीमुळे राज्यात लोकप्रिय झालेल्या पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी येथील ध्येयव्येडा सोहम उईके याची ऑफ्रोट फाऊंडेशन दखल घेतली असून त्याच्या पुढील शिक्षणासाठी ५० हजार रुपयांची मुदत ठेव करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

10:32 (IST) 3 Oct 2023
“राज्यातील ट्रिपल इंजिनचं सरकार खूनी”, नांदेडमधील प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका

नांदेडमधील घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “राज्यातील ट्रिपल इंजिनचं सरकार खूनी आहे. तीन महिन्यांत कुठली चांगली कामे झाली आहेत? या बळींना पूर्ण महाराष्ट्र सरकार जबाबदार आहेत. संबंधित विभागाच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

10:32 (IST) 3 Oct 2023
पितृमोक्ष! मृत्यू तिथी माहीत नसेल तर काय करावे…

२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोंबर हा काळ पितृमोक्ष  पंधरवाडा म्हणून पाळल्या जात आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, महालय आदी विधी करण्याची धार्मिक परंपरा आहे. पण पूर्वजांची मृत्यूतिथीच माहीत नसण्याची पण काहींना अडचण असते.

सविस्तर वाचा

10:31 (IST) 3 Oct 2023
पक्षाने संधी दिल्यास वर्ध्यातून लोकसभा लढणार-सुप्रिया सुळे

गांधी जयंतीनिमित्त वर्धा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवनार व सेवाग्राम आश्रमात भेट देत अभिवादन केले. त्यानंतर काही भेटी आटोपून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की वर्धा हा पवित्र जिल्हा आहे.

सविस्तर वाचा

10:25 (IST) 3 Oct 2023
नांदेडमधील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू, विरोधकांचं सरकारवर टीकास्र; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

नांदेडमधील मृत्यूप्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा सविस्तर…

10:24 (IST) 3 Oct 2023
“शरद पवारांचा हात धरुन राजकारणात आलो सांगणारे मोदी त्यांच्या…”, ठाकरे गटाचा टोला!

“राहुल गांधी सांगतात त्याप्रमाणे भाजपा ही कंपनी कंपनी ‘हम दो और हमारे दो’पुरतीच मर्यादित बनली. या प्रायव्हेट कंपनीला…!”

वाचा सविस्तर

10:23 (IST) 3 Oct 2023
“देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात, हे…”, नितीन देशमुखांची सडकून टीका

अकोला जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हापरिषद सदस्याला अपात्र करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाकडे पाठवला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात, अशी टीकाही नितीश देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

वाचा सविस्तर…

10:23 (IST) 3 Oct 2023
“तीन तीन इंजिनं लागूनही…”, राज ठाकरेंचा नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर हल्लाबोल!

राज ठाकरे म्हणतात, “सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?”

वाचा सविस्तर

10:23 (IST) 3 Oct 2023
“नांदेडमध्ये रात्रभरात आणखी ७ मृत्यू; मृतांची संख्या ३१वर”, अशोक चव्हाणांचा खळबळजनक दावा!

अशोक चव्हाण म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी फक्त निर्देश देऊन चालणार नाही. करोना काळात ज्याप्रमाणे…!”

वाचा सविस्तर

"वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. या स्थळी महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा पदस्पर्श झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील," असं विधान खासदार सुप्रिया सुळे केलं आहे.