Marathi News Updates : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह एनडीएमधील काही नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर काही नेत्यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता एनडीए सरकारची मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक आज होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रीपद मिळालं नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. याबरोबरच आज राष्ट्रवादीचा पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये होत आहे. यासह आदी घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा.

Live Updates

Mumbai Maharashtra News

19:34 (IST) 10 Jun 2024
शाह, गडकरी, राजनाथ यांच्याकडील जुनी खाती कायम, नड्डांकडे आरोग्य मंत्रालय

नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात अमित शाह (गृह), राजनाथ सिंह (संरक्षण), निर्मला सीतारामण (अर्थ), एस. जयशंकर (परराष्ट्र) आणि नितीन गडकरी (रस्ते वाहतूक आणि महामार्ग) यांच्याकडील जुनी खाती कायम ठेवण्यात आली आहेत. तर जे. पी. नड्डा यांना आरोग्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.

17:56 (IST) 10 Jun 2024
“आमच्यात कुठेही मतभेत नाहीत”; केंद्रात मंत्रि‍पद न मिळाल्यानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते म्हणाले, “राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. झालेल्या चूका दुरुस्त करून पुढ जायचं आहे. महायुतीत असलो तरी शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार सोडणार नाही. गाव पातळीवर एकत्र काम करा, लोकसभा निवडणुकीत अनेकांचे अंदाज चुकले. केंद्रात मंत्रि‍पद न मिळाल्यानंतर काही चर्चा होत आहेत. पण आमच्यात कुठेही मतभेत नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.

17:31 (IST) 10 Jun 2024
“पुणेकरांना मंत्रीपद मिळालं त्यांचा आनंद, पण…”; सुप्रिया सुळेंचा मुरलीधर मोहोळ यांना टोला

“पुणेकरांना मंत्रीपद मिळालं त्यांचा आम्हाला आनंद, पण त्याचा उपयोग कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा”, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लगावला. त्यावर प्रत्युत्तर देत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी चिंता करू नये, पुणेकरांसाठी आम्ही आहोत”, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं.

16:42 (IST) 10 Jun 2024
“अनुभवावरून अजित पवारांना मुख्यमंत्रिपद का नाकारलं?”; सुनील तटकरेंचा शरद पवारांना सवाल

राष्ट्रवादी पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. या मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. “तुम्हाला मंत्रि‍पदाचा अनुभव होता आणि अजित पवारांनाही मंत्रि‍पदाचा अनुभव होता. मग तरीही अनुभवावरुन मुख्यमंत्रिपद का नाकारलं?”, असा सवाल सुनील तटकरे यांनी केला.

16:03 (IST) 10 Jun 2024
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू

राष्ट्रवादी पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडत असून राष्ट्रवादीचे नेते काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकार्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात येण्याची शक्यता आहे.

15:04 (IST) 10 Jun 2024
‘विधानसभेसाठी कामाला लागा’; ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांना आदेश

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

15:01 (IST) 10 Jun 2024
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला मान्सूनच्या तयारीचा आढावा

राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यात बियाणे, खतांचा साठा उपल्बध आहे ना, तसेच मान्सूनच्या तयारीचा आढावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

14:08 (IST) 10 Jun 2024
शिवसेना शिंदे गटाला केवळ एकच मंत्री पद; श्रीरंग बारणे यांनी जाहीर केली नाराजी

एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक- एक खासदार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं, असे बारणे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

14:03 (IST) 10 Jun 2024
‘शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं’; श्रीरंग बारणेंनी व्यक्त केली खदखद

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत घेतली. यावेळी एनडीमधील पक्षाच्या काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राती शिवेसना शिंदे गटाला फक्त एक राज्यमंत्रीपद मिळालं. यावर आता शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी खदखद बोलून दाखवली आहे. “केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना एनडीएने न्यायिक भूमिका घ्यायला हवी होती. अजित पवारांच्या पक्षालाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यायला हवं होतं. शिंदे गटाला राज्यमंत्रिपद देऊन दुजाभाव करण्यात आला. पण आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं”, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं.

13:51 (IST) 10 Jun 2024
Mumbai Coastal Road : मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून कोस्टल रोडची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोस्टल रोडची पाहणी केली आहे. यानंतर कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला होणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते हाजीअली फक्त काही मिनिटांमध्ये गाठणे शक्य होणार आहे.

12:43 (IST) 10 Jun 2024
“आरक्षणाविरोधात बोलल्यास काँग्रेसच्या सर्व जागा पाडणार”, मनोज जरांगे यांचा इशारा

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. यावर काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. “मराठा आरक्षणाच्याविरोधात आणि मराठ्यांच्या विरोधात बोलू नका. अन्यथा विजय वडेट्टीवार यांना आणि काँग्रेसच्या सर्व जागा पाडल्याशिवाय थांबणार नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

11:43 (IST) 10 Jun 2024
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह एनडीएमधील काही नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर काही नेत्यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी शेतकरी सन्मान निधीचा १७ हप्ता जारी करण्यात आला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
11:23 (IST) 10 Jun 2024
“सर्व गुन्हे मागे घेतले, अजून काय पाहिजे?”; संजय राऊतांचा अजित पवार गटाला टोला

एनडीए सरकारमध्ये अजित पवार गटाला एक राज्यमंत्री पद देण्यात येत होते. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पद देऊ केलं होतं. परंतु, अजित पवार गटाने हे मंत्रिपद नाकारलं. यावरून संजय राऊतांनी मोठा दावा केला. “अजित पवारांच्या बाबतीत आम्हाला असं समजलंय की, दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची १५० कोटींची प्रॉपर्टी क्लिअर केली. अजून काय पाहिजे? ईडीने जप्त केलेली ही प्रॉपर्टी क्लिअर केली. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. मग मंत्रिपद कशाला पाहिजे?”, असं संजय राऊत म्हणाले.

11:13 (IST) 10 Jun 2024
अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा मित्रपक्षांशी…”

नरेंद्र मोदींनी रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजता देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. तर भाजपासह एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. या शपथविधीत काही जणांचा पत्ता कट झाला आहे तर काही जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही. याबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

इथे वाचा सविस्तर बातमी

11:12 (IST) 10 Jun 2024
Modi 3.0: गुजरातमधल्या ‘या’ मराठी खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, ‘असा’ आहे राजकीय प्रवास

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आज नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळात विविध खासदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. देशभरात हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. तसंच जगातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांनीही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. आता चर्चा होते आहे ती गुजरातमधल्या मराठी खासदाराची. गुजरातमधल्या एका मराठी खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

इथे वाचा सविस्तर बातमी

11:08 (IST) 10 Jun 2024
संजय राऊतांचा अजित पवार गटाला टोला, म्हणाले…

एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रीपद मिळालं नाही. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. “हे एनडीए सरकार आहे. मोदींचे नाही. यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आश्रयाला आहेत”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

11:02 (IST) 10 Jun 2024
Modi 3.0: पहिल्या शपथविधीत ७० पैकी ६० मंत्री भाजपाचे; नितीश कुमार, चंद्राबाबूंच्या पक्षांना काय मिळालं? वाचा पक्षनिहाय यादी!

PM Narendra Modi Oath Taking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रविवारी एकूण ७१ खासदारांनी शपथ घेतली. त्यातील ७० मंत्र्यांपैकी ६० एकट्या भाजपाचे आहेत.

वाचा सविस्तर

10:57 (IST) 10 Jun 2024
एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक होण्याची शक्यता

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता आहे. यावेळी या बैठकीत काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

10:57 (IST) 10 Jun 2024
राष्ट्रवादी पक्षाचा २५ वा वर्धापन दिन दोन्हीही गटाकडून साजरा

राष्ट्रवादीचा पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये होत आहे. या वर्धापन दिनाच्या मेळाव्याकडे राज्याच लक्ष लागलेलं आहे.

राष्ट्रवादीचा पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये होत आहे. या वर्धापन दिनाच्या मेळाव्याकडे राज्याच लक्ष लागलेलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार